मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
रजस्वलेच्या मरणाविषयीं

तृतीय परिच्छेद - रजस्वलेच्या मरणाविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


रजस्वलेच्या मरणाविषयीं सांगतो -

रजस्वलायास्तुवृद्धशातातपः रजस्वलायाः प्रेतायाः संस्कारादीनिनाचरेत् ऊर्ध्वंत्रिरात्रात्स्नातांतांशवधर्मेणदाहयेत् अतः प्रक्षाल्यकाष्ठवद्दग्ध्वात्र्यहोर्ध्वंदहेत् संकटेतुमदनरत्नेस्मृत्यंतरे उदक्यासूतिकावापिमृतास्याद्यदितांतदा आशौचेत्वनतिक्रांतेदाहयेदंतरायदि उद्धृतेनतुतोयेनस्नापयित्वातुमंत्रतः आपोहिष्ठेतितिसृभिर्हिरण्यवर्णाश्चतसृभिः पवमानानुवाकेनयदंतीतिचसप्तभिः ततोयज्ञपवित्रेणगोमूत्रेणाथतेद्विजाः स्नापयित्वान्यवसनेनाच्छाद्यशवधर्मतः दाहादिकंततः कुर्यात्प्रजापतिवचोयथा यज्ञपवित्रमापोअस्मानिति मिताक्षरायां पंचभिः स्नापयित्वातुगव्यैः प्रेतांरजस्वलां वस्त्रांतरावृतांकृत्वादाहयेद्विधिपूर्वकं गृह्यकारिकायां अंतरिक्षमृतायेचवह्नावप्सुप्रमादतः उदक्यासूतिकानारीचरेच्चांद्रायणत्रयं ततोयवपिष्टेनानुलिप्याष्टोत्तरशतंशूर्पोदकैः संस्नाप्यभस्मगोमयमृत्कुशोदकपंचगव्यशुद्धोदकैरापोहिष्ठापावमानीभिः संस्नाप्यान्यवस्त्रेधृतेदहेदितिभट्टाः ।

वृद्ध शातातप - " रजस्वला मृत असतां तिचा संस्कार ( समंत्रक दाह ) वगैरे करुं नये . तीन दिवसांनंतर स्नान केल्यावर समंत्रक दाह करावा . " तीन दिवसांचे आंत समंत्रक दाह नाहीं म्हणून तिचें शरीर धुवून काष्ठाप्रमाणें जाळून तीन दिवसांनंतर अस्थींचा समंत्रक दाह करावा . संकट असेल तर मदनरत्नांत स्मृत्यंतरांत - " रजस्वला अथवा सूतिका जर मृत असेल व त्या वेळीं त्यांचें आशौच ( अशुचित्व ) समाप्त नसेल व त्या अशुचित्वांत त्यांचा दाह करावयाचा असेल तर आणलेल्या उदकानें त्यांस स्नान घालून नंतर ब्राह्मणांनीं ‘ आपोहिष्ठा० ’ ह्या तीन ऋचांनीं , ‘ हिरण्यवर्णा० ’ या चार ऋचांनीं , ‘ पवमानः० ’ या अनुवाकानें , ‘ यदंति० ’ ह्या सात ऋचांनीं , ‘ आपोअस्मान्० ’ या मंत्राचें स्नान घालून गोमूत्रानें स्नान घालून दुसरें वस्त्र नेसवून व आच्छादन घालून शवाच्या धर्मानेंज दाहादिक करावें , असें प्रजापतीचें वचन आहे . " मिताक्षरेंत - " रजस्वला मृत असतां तिला पंचगव्यांचीं स्नानें घालून वस्त्रानें आच्छादित करुन तिचा यथाविधि दाह करावा . " गृह्यकारिकेंत - " अंतरिक्षांत मृत झालेले , अग्नींत व उदकांत प्रमादानें मृत झालेले , रजस्वला व सूतिका ( बाळंतीण ) मृत झालेली स्त्री यांना तीन चांद्रायणें प्रायश्चित्त करावें . " तदनंतर जवांचें पीठ अंगाला लावून सुपांतून आणलेल्या उदकानें एकशें आठ स्नानें घालून भस्मस्नान , गोमयस्नान , मृत्तिकास्नान , कुशोदकस्नान , पंचगव्याचें स्नान आणि शुद्धोदकाचें स्नान घालून नंतर ‘ आपोहिष्ठा० , पावमानी० ’ या मंत्रांनीं स्नान घालून अन्य वस्त्रें नेसवून नंतर दाह करावा , असें भट्ट सांगतात .

अत्रप्रायश्चित्तमाहबौधायनः उदक्यासूतिकामृत्यौचरेच्चांद्रायणत्रयमिति सूतिकायास्तुमिताक्षरायां सूतिकायांमृतायांतुकथंकुर्वंतियाज्ञिकाः कुंभेसलिलमादायपंचगव्यंक्षिपेत्ततः पुण्यर्ग्भिरभिमंत्र्यापोवाचाशुद्धिंलभेत्ततः तेनैवस्नापयित्वातुदाहंकुर्याद्यथाविधि अब्लिंगाभिर्मंत्रिताभिर्वामदेव्याभिरेवच अन्यैश्चवारुणैर्मंत्रैः संस्नाप्यविधिनादहेत् गृह्यकारिकायां सूतिकामरणेप्राप्तेसर्वौषध्यनुलेपनं असूतकीतुसंस्पृष्टः शूर्पाणांतुशतंक्षिपेत् प्रायश्चित्तेविशेषस्तत्रैव सूतिकातुयदासाध्वीविस्नातामरणंगता त्रिवर्षपूर्णपर्यंतंशुद्ध्येत्कृच्छ्रेणसर्वदा इदंचाद्यत्र्यहे सूतिकातुयदानारीरजसातुपरिप्लुता म्रियेतचेत्तुसानारीद्विवर्षंकृच्छ्रमाचरेत् इदंद्वितीयत्र्यहे सूतिकातुयदासाध्वीविस्नातामरणंगता अब्दंकृच्छ्रेणशुध्येतव्यासस्यवचनंयथा इदंतृतीयत्र्यहे अत्राशक्तौपक्षांतरमुक्तंतत्रैव सूतिकातुयदानारीविस्नातामरणंगता त्रिषण्नवदिनादर्वागेकाब्देनविशुध्यति ऊर्ध्वंतु सूतिकातुयदानारीप्राणांश्चैवपरित्यजेत् मासमेकावधिंयावत्र्त्रिभिः कृच्छ्रैर्विशुध्यति ।

यांच्याविषयीं प्रायश्चित्त सांगतो बौधायन - " रजस्वला व सूतिका मृत असेल तर तीन चांद्रायणें करावीं . " सूतिकेला तर सांगतो मिताक्षरेंत - " सूतिका मृत असेल तर याज्ञिक कसें करितात ? कुंभांत उदक घेऊन त्यांत पंचगव्य टाकून पुण्यकारक वेदमंत्रांनीं त्या उदकाचें अभिमंत्रण करुन त्यानेंच स्नान घालून ब्राह्मणांच्या मुखांतून शुद्धि झाली असें म्हणवून नंतर यथाविधि दाह करावा . आपोहिष्ठा० , वामदेव्य , आणि वरुणदेवताक मंत्र यांनीं स्नान घालून यथाविधि दाह करावा . " गृह्यकारिकेंत - " सूतिका मृत असतां सर्व औषधी वाटून तिच्या अंगास लावाव्या . सुतकी नसेल त्यानें स्पर्श करुन शंभर सुपें पाणी तिच्या अंगावर ओतावें . " प्रायश्चित्ताविषयीं विशेष सांगतो तेथेंच - " साध्वी स्त्री बाळंतीण असून स्नान केल्यावांचून जेव्हां मृत होईल त्या वेळीं त्र्यब्दकृच्छ्र प्रायश्चित्तानें तिची शुद्धि होईल . " हें प्रायश्चित्त पहिल्या तीन दिवसांत मृत असतां समजावें . " ज्या वेळीं सूतिका स्त्री रजानें भरलेली असून ती मरेल त्या वेळीं दोन वर्ष कृच्छ्र प्रायश्चित्तानें तिची शुद्धि होते . " हें दुसर्‍या तीन दिवसांत मृत असतां समजावें . " ज्या वेळीं सूतिका स्त्री स्नान केल्यावांचून मृत होईल त्या वेळीं ती एक वर्ष कृच्छ्र प्रायश्चित्तानें शुद्ध होईल , असें व्यासाचें वचन आहे . " हें प्रायश्चित्त तिसर्‍या तीन दिवसांत मृत असतां समजावें . ह्या प्रायश्चित्ताविषयीं अशक्ति असतां दुसरा पक्ष तेथेंच सांगितला आहे तो असा - " ज्या वेळीं सूतिका स्त्रीं स्नान केल्यावांचून तीन , सहा , नऊ दिवसांचे आंत मृत होईल तेव्हां ती एक अब्द ( वर्ष ) कृच्छ्रानें शुद्ध होईल . नऊ दिवसांपुढें एक मासपर्यंत सूतिका स्त्री जेव्हां प्राणत्याग करील तेव्हां ती तीन कृच्छ्रांनीं शुद्ध होते . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP