मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
स्त्रियांविषयीं

तृतीय परिच्छेद - स्त्रियांविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां स्त्रियांविषयीं सांगतो -

अथस्त्रीषूच्यते हेमाद्रौबृहस्पतिः भर्तृगोत्रेणनाम्नाचमातुः कुर्यात्सपिंडनम् यत्तुभविष्ये पितृगोत्रंसमुत्सृज्यनकुर्याद्भर्तृगोत्रतइतितदासुरादिविवाहोढापरं आसुरादिविवाहेषुपितृगोत्रेणधर्मविदितिवृद्धशातातपोक्तेः तच्चानेकवचनेषु पितामह्यापत्यामातामहेनवासहोक्तं तत्रव्यवस्थोक्ताभविष्ये जीवत्पितापितामह्यामातुः कुर्यात्सपिंडनं प्रमीतपितृकः पित्रातत्पित्रापुत्रिकासुतः तत्पित्रामातुः पित्रा लौगाक्षिः पितामह्यादिभिः सार्धंमातरंतुसपिंडयेत् पितरिध्रियमाणेतुतेनवोपरतेसति शंखः मातुः सपिंडीकरणंकथंकार्यंभवेत्सुतैः पितामह्यादिभिः सार्धंसपिंडीकरणंस्मृतं येनकेनापिमातुः सापिंड्येयत्रान्वष्टकादौमातुः श्राद्धंपृथगुक्तं तत्रपितामह्यासहकार्यं नांदीमुखेष्टकाश्राद्धेगयायांचमृतेहनि पितामह्यादिभिः सार्धंमातुः श्राद्धंसमाचरेदितिशातातपोक्तेः अपुत्रायांतुपैठीनसिः अपुत्रायांमृतायांतुपतिः कुर्यात्सपिंडनं श्वश्वादिभिः सहैवास्याः सपिंडीकरणंभवेत् यत्तुलघुहारीतः पुत्रेणैवतुकर्तव्यंसपिंडीकरणंस्त्रियाः पुरुषस्यपुनस्त्वन्येभ्रातृपुत्रादयोपियेइति यच्च मार्कंडेयपुराणे सपिंडीकरणंस्त्रीणांपुत्राभावेनविद्यतइति तत्पुत्रपत्यभावेज्ञेयं अत्रसपत्नीपुत्रोपिज्ञेयः बह्वीनामेकपत्नीनामेकाचेत्पुत्रिणीभवेत् सर्वास्तास्तेनपुत्रेणप्राहपुत्रवतीर्मनुरितिमनूक्तेरेतत्परत्वात् यत्तु शातातपः मृतेपितरिमातुस्तुनकार्यासहपिंडता पितुरेवसपिंडत्वेतस्याअपिकृतंभवेदितितदशक्तपरं केषांचिद्वामतमितिहेमाद्रिः ।

हेमाद्रींत बृहस्पति - " मातेचें सपिंडन भर्त्याच्या गोत्रानें व तिच्या नांवानें करावें . " आतां जें भविष्यांत - " स्त्रियेचें सपिंडन पित्याचें गोत्र टाकून भर्त्याच्या गोत्रानें करुं नये " असें सांगितलें तें आसुरादि विवाहानें विवाहित स्त्रीविषयक आहे . कारण , " आसुरादि विवाहानें विवाहित स्त्रियांविषयीं पित्याच्या गोत्रानें करावें . " असें वृद्धशातातपवचन आहे . तें सपिंडीकरण अनेक वचनांमध्यें अनेक प्रकारानें म्हणजे पितामहीसह , पतीसह , किंवा मातामहासह सांगितलें आहे . त्याविषयीं व्यवस्था भविष्यांत सांगितली आहे ती अशी - " जीवत्पितृकानें मातेचें सपिंडन पितामहीबरोबर करावें . मृतपितृकानें आपल्या पित्यासह मातेचें सपिंडन करावें . पुत्रिकापुत्रानें मातेचें सपिंडन तिच्या पित्याशीं ( मातामहाबरोबर ) करावें . " लौगाक्षि - " पिता जीवंत असतां पितामही इत्यादिकांसह मातेचें सपिंडन करावें . " आणि पिता मृत असतां त्यासहच करावें . " शंख - " मातेचें सपिंडीकरण पुत्रांनीं कसें करावें ? पितामही इत्यादिकांसह सपिंडीकरण सांगितलें आहे . " मातेचें सपिंडन कोणाबरोबरही केलें असलें तरी ज्या अन्वष्टक्यादिश्राद्धांत मातेचें श्राद्ध पृथक् सांगितलें आहे , त्या ठिकाणीं तें पितामहीबरोबर करावें . कारण , " वृद्धिश्राद्धांत , अष्टकाश्राद्धांत , गयेचेठायीं आणि मृतदिवशीं इतक्या ठिकाणीं मातेचें श्राद्ध पितामही इत्यादिकांसह करावें . " असें शातातपवचन आहे . स्त्री निपुत्रिक असेल तर सांगतो पैठीनसि " पुत्ररहित स्त्री मृत असेल तर तिचें सपिंडन पतीनें करावें . सासूबरोबर हिचें ( निपुत्रिक स्त्रियेचें ) सपिंडन होतें . " आतां जें लघुहारीत - " स्त्रियेचें सपिंडीकरण पुत्रानेंच करावें . पुरुषाचें सपिंडन तर पुत्राच्या अभावीं जे कोणी भ्रातृपुत्रादिक अधिकारी असतील त्यांनींही करावें . " आणि जें मार्कंडेय पुराणांत - " पुत्रांच्या अभावीं स्त्रियांचें सपिंडन होत नाहीं . ’’ असें सांगितलें तें पुत्र व पति यांच्या अभावीं जाणावें . या सपिंडीकरणाविषयीं सापत्नपुत्रही अधिकारी आहे . कारण , " एकाच्या बहुत पत्न्या असून त्यांमध्यें एक जर पुत्रवती होईल तर त्या पुत्रानें त्या सर्व स्त्रिया पुत्रवती होतात , असें मनु सांगतो . " हें मनुवचन सापत्नपुत्राला सपिंडीकरणाचा अधिकारबोधक आहे . आतां जें शातातप - " पिता मृत असेल तर मातेचें सपिंडन करुं नये . कारण , पित्याचेंच सपिंडन केलें असतां तिचेंही सपिंडन केल्यासारखें होतें . " असें सांगितलें तें सपिंडनाला सामर्थ्य नसेल त्याविषयीं आहे . अथवा तें कितीएकांचें मत आहे . असें हेमाद्रि सांगतो .

अन्वारोहणेतुभर्त्रैवसापिंड्यं मृतायानुगतानाथंसातेनसहपिंडतां अर्हतिस्वर्गवासंचयावदाभूतसंप्लवमिति शातातपोक्तेः पत्याचैकेनकर्तव्यंसपिंडीकरणंस्त्रियाः सामृतापिहितेनैक्यंगतामंत्राहुतिव्रतैरितियमोक्तेस्च अत्रैकशब्दः पितामह्यादिपक्षनिवृत्त्यर्थः पतिपदंवर्गपरं सपिंडनस्यपार्वणैकोद्दिष्टरुपत्वादितिमाधवकल्पतरुमदनरत्नादयः अन्येतुभर्त्रैवैकेनाहुः स्वेनभर्त्रासहैवास्याः सपिंडीकरणंभवेदित्येवकारश्रवणात् पृथ्वीचंद्रोदयेपिविकल्पउक्तः इदंतुतत्त्वं यदाहेमाद्यादिमतेद्वयोरेकः पिंडस्तदावर्गेणसह यदामाधवपृथ्वीचंद्रादिमतेपृथक् पिंडस्तदैकेनपत्यैकवचनाचैकेनापि अतोमातृपिंडमसपिंडीकृतेनैवपतिपिंडेनसंयोज्यैकीकृतंपिंडद्वयंतत्पित्रादिभिः संयोजयेत् अंत्यपक्षएवयुक्तः स्मृत्यर्थसारेतु अन्वारोहणेनैकदिनमरणेस्त्रियाः पृथक् सपिंडनंनास्ति भर्तुः कृतेस्त्रियाअपिकृतंभवतीत्युक्तंतन्मतांतरमस्तु इदंब्राह्मादिविवाहेषुज्ञेयं ।

मातेचें अनुगमन असेल तर भर्त्यासहच सपिंडन होतें . कारण , " जी स्त्री भर्त्याच्या मागांहून जाऊन मृत झाली ती त्या भर्त्यासह सापिंड्याला योग्य होते व ती भूतांचा प्रलय होईपर्यंत पतीसह स्वर्गवासालाही योग्य होते . " असें शातातपवचन आहे . आणि " स्त्रियेचें सपिंडीकरण एकापतीसह करावें . कारण , ती मृत झाली तरी समंत्रक आहुति व व्रतें यांहीं करुन पतीशीं ऐक्य पावली आहे . " असें यमवचनही आहे . या वचनांत ‘ एकेन ’ हें पद वरील वचनानें पितामहीत्रयाबरोबर जें सपिंडीकरण सांगितलें त्या पक्षाची निवृत्ति करण्याकरितां आहे . आणि ‘ पत्या ’ ह्याचा अर्थ - पतिवर्गासह असा समजावा . कारण , सपिंडीकरण हें पार्वण व एकोद्दिष्टरुप आहे , असें माधव , कल्पतरु , मदनरत्न इत्यादि ग्रंथकार सांगतात . इतर ग्रंथकार तर एका भर्त्याबरोबरच सपिंडन सांगतात . कारण , " स्त्रियेचें सपिंडीकरण स्वकीय् भर्त्यासहच होतें " या वचनांत ‘ एव ’ कराचें श्रवण आहे . पृथ्वीचंद्रोदयांतही - विकल्प ( पतीसह किंवा पतिवर्गासह करावें असा विकल्प ) सांगितला आहे . याचा खरा प्रकार म्हटला म्हणजे असा आहे कीं , ज्या वेळीं हेमाद्रि इत्यादिकांच्या मतीं अन्वारोहण असतां दोघांना ( स्त्री - पुरुषांना एक पिंड सांगितला आहे त्या वेळीं ( त्यापक्षीं ) पतिवर्गासह सपिंडीकरण समजावें , ज्या वेळीं माधव , पृथ्वीचंद्र इत्यादिकांच्या मतीं दोघांना वेगवेगळा पिंड सांगितला आहे त्या वेळीं ( त्यापक्षीं ) पतीच्या पिंडाबरोबर मिळवावा . आणि वरील यमवचनांतही ‘ पत्या एकेन ’ असें सांगितल्यावरुनही एक सपिंडाबरोबरही सपिंडीकरण होतें . या कारणास्तव पित्याच्या पिंडाचें संयोजन करण्याच्या पूर्वीं मातेचा पिंड त्यांत मिळवून त्या दोन पिंडांचा एक पिंड करुन नंतर पितामहादिपिंडांशीं त्याचें संयोजन करावें . या वरील दोन पक्षांमध्यें दुसरा पक्ष ( माधवादिकांनीं सांगितलेला ) च युक्त आहे . स्मृत्यर्थसारांत तर - अनुगमनेंकरुन एकदिवशीं स्त्री मृत असतां तिचें पृथक् सपिंडन नाहीं . भर्त्याचें सपिंडन केलें असतां स्त्रियेचेंही केल्यासारखें होतें , असें सांगितलें आहे . तें निराळें मत असो . हें सपिंडीकरण ब्राह्मादिविवाह असतां समजावें .

आसुरादिषुतुशातातपः तन्मात्रातत्पितामह्यातच्छ्वश्वावासपिंडनं आसुरादिविवाहेषुविन्नानांयोषितां भवेत् मातामह्यामातुः पितामह्यातत्प्रपितामह्याचेत्यर्थः सुमंतुः पितापितामहेयोज्यः पूर्णेसंवत्सरेसुतैः मातामातामहेतद्वदित्याहभगवान् शिवः इदमासुरादिपरंपुत्रिकापुत्रपरंचोक्तंप्राक् हेमाद्रिस्तुब्राह्मादिष्वपिसर्वत्र देशभेदाद्विकल्पमाह अतः गुर्जरेषुकोकिलमतानुसारिणांमातृमातामहप्रमातामहाइतिश्राद्धप्रयोगः सपिंडनंचदृश्यते हेमाद्रावापस्तंबोपि कोकिलस्ययथापुत्राअन्यसंचयजीविनः पुष्टास्तेस्वकुलंयांतिएवंनारीमृतासती यदपि विज्ञानेश्वरो मातामहेनमातुः सापिंड्येपितृश्राद्धवन्मातृश्राद्धंनित्यमित्याह यच्चवृद्धिश्राद्धेछंदोगपरिशिष्टं षडभ्यः पितृभ्यस्तदनुश्राद्धदानमुपक्रमेदिति तदेतद्विषयमेव मातुः पृथक् श्राद्धाभावात् अतएवहेमाद्रौभविष्ये मातुः सपिंडनंप्रक्रम्य उदितेनुदितेचैवहोमभेदोयथाभवेत् तथाकुलक्रमायातमाचारंचचरेद्बुधइत्युक्तं अस्यवृद्धावपवादमाहतत्रैवव्याघ्रपात् कुर्यान्मातामहश्राद्धंसर्वदामातृपूर्वकं विधिज्ञोविधिमास्थायवृद्धौमातामहादिवत् केचिदेतत्पुत्रिकापुत्रपरमाहुः ।

आसुरादिविवाह असतील तर सांगतो शातातप - " आसुरादि विवाहानें विवाहित स्त्रियांचें सपिंडन तिच्या ( मातेच्या ) मातृपितामहीप्रतितामहींबरोबर होतें . " सुमंतु - " पिता मृत होऊन पूर्ण संवत्सर झालें असतां पुत्रांनीं त्याचें पितामहाशीं संयोजन करावें . त्याप्रमाणें मातेला मातामहाचे ठायीं संयोजन करावें , असें भगवान् शंकर सांगतात . " हें वचन आसुरादिविवाहविषयक व पुत्रिकापुत्रविषयक आहे , असें पूर्वीं सांगितलें आहे . हेमाद्रि तर - ब्राह्मादिक सर्वविवाहांमध्यें देशभेदानें विकल्प सांगतो . म्हणून गुर्जरदेशांत कोकिलमताला अनुसरणारांचा ‘ मातृमातामहप्रमातामहाः ’ असा उच्चार करुन श्राद्धप्रयोग व सपिंडन दिसत आहे . हेमाद्रींत आपस्तंबही - " कोकिलाचे जसे पुत्र अन्यांनीं केलेल्या संचयानें उपजीवन करुन पुष्ट होऊन ते आपल्या कुलांत येतात . तशी मृत झालेली स्त्री आपल्या कुलांत येते . " आतां जें विज्ञानेश्वर - मातामहाबरोबर मातेचें सपिंडन केलें असतां पितृश्राद्धाप्रमाणें मातेचें श्राद्ध नित्य आहे , असें सांगतो तें , आणि जें वृद्धिश्राद्धाविषयीं छंदोगपरिशिष्ट - " तदनंतर सहा पितरांना श्राद्धदानाचा उपक्रम करावा " असें आहे तें ह्या ( कोकिलमता ) विषयींच आहे . कारण , मातेचें पृथक् ( मातामहावांचून ) श्राद्ध नाहीं . मातेचें मातामहाशीं सपिंडन आहे म्हणूनच हेमाद्रींत भविष्यांत - मातेच्या सपिंडनाचा उपक्रम करुन " उदिते , जुहोति , अनुदिते जुहोति " अशा दोन वाक्यांवरुन कितीएक सूर्योदयोत्तर होम करितात , कितीएक अनुदय असतां होम करितात . ते जसे कुलपरंपरागत आहेत तसें कुलपरंपरेनें आलेल्या आचाराचें आचरण करावें " असें सांगितलें आहे . याचा वृद्धिश्राद्धांत अपवाद सांगतो तेथेंच व्याघ्रपात् - " विधि जाणणारानें विधीचा आश्रय करुन सर्वदा मातामहश्राद्ध मातृपूर्वक करावें आणि वृद्धिश्राद्धांत मातामहपूर्वक करावें . अर्थात् मातामहश्राद्ध मातृपूर्वक करुं नये . " केचित् विद्वान् हें वचन पुत्रिकापुत्रविषयक सांगतात .

पत्युः सापिंड्यमाहलौगाक्षिः सर्वाभावेस्वयंपत्न्यः स्वभर्तृणाममंत्रकम् सपिंडीकरणंकुर्युस्ततः पार्वणमेवचेति यत्तुवचनं अपुत्रस्यपरेतस्यनैवकुर्यात्सपिंडतामिति यच्चापस्तंबः अपुत्रायेमृताः केचित्पुरुषावास्त्रियोपिवा तेषांसपिंडनाभावादेकोद्दिष्टंनपार्वणमिति तत्पुत्रोत्पादनविधिप्रशंसार्थमितिमाधवः सपिंडीकरणादूर्ध्वमेकोद्दिष्टंविधीयते अपुत्राणांचसर्वेषामपत्नीनांतथैवचेतिहेमाद्रौप्रचेतसोक्तेश्च अन्येतुद्विविधवाक्यदर्शनाद्विकल्पमाहुः स्मृत्यर्थसारेपि ब्रह्मचारिणामनपत्यानांचसपिंडनंनास्ति तेषांसदैकोद्दिष्टमेव व्युत्क्रममृतानांसापिंड्यंकार्यंनवा केचित्सर्वत्रसपिंडनमाहुरिति अपुत्रेव्युत्क्रममृतेविशेषोरेणुकारिकायां भ्रातावाभ्रातृपुत्रोवासपिंडः शिष्यएववा सपिंडीकरणंकुर्यात्पुत्रहीनेमृतेसति सर्वबंधुविहीनस्यपत्नीकुर्यात्सपिंडतां ऋत्विजंकारयेद्वापिपुरोहितमथापिवा वसुरुद्रादितिसुतैः कार्यातेषांसपिंडता व्युत्क्रमाच्चप्रमीतायेतद्विनाप्रेतताध्रुवं पुनः सपिंडनंतेषांकुर्यात्प्रेतेपितामहइति अत्रमूलंमृग्यं यतीनांसपिंडनंनास्ति किंत्वेकादशेह्निपार्वणंकार्यं तदपित्रिदंडिनः एकदंड्यादीनांतदपिनेत्युक्तंप्राक् दंडग्रहणात्पूर्वंमृतेतुदाहादिसपिंडनांतं सर्वकार्यमितिभट्टचरणाः ।

पतीचें सपिंडीकरण सांगतो लौगाक्षि - " सर्व कर्त्यांच्या अभावीं पत्नीनें स्वतः आपल्या भर्त्याचें सपिंडीकरण अमंत्रक करावें . तदनंतर पार्वणही करावें . " आतां जें वचन - " निपुत्रिक मृताचें सपिंडन करुं नयेच . " आणि जें आपस्तंब - " जे कोणी पुरुष किंवा स्त्रिया निपुत्रिक मृत असतील त्यांचें सपिंडन नसल्यामुळें एकोद्दिष्ट करावें . पार्वण करुं नये " असें सांगितलें तें पुत्र उत्पन्न करण्याच्या विधीचे स्तुतीकरितां आहे , असें माधव सांगतो . अर्थात् हें वचन सपिंडनाचें निषेधक नाहीं , म्हणून लौगाक्षिवचनानें सपिंडन करावें असें झालें . आणि " सर्व निपुत्रिक व पतिरहित स्त्रिया यांचें सपिंडीकरणानंतर एकोद्दिष्ट सांगितलें आहे " असें हेमाद्रींत प्रचेतसाचें वचनही आहे . यावरुन निपुत्रिकांचें सपिंडीकरण आहे . इतर विद्वान् तर - करावें व न करावें , अशीं दोन प्रकारचीं वाक्यें दृष्टीस पडतात म्हणून विकल्प सांगतात . स्मृत्यर्थसारांतही - " ब्रह्मचारी व अपत्यरहित यांचें सपिंडन नाहीं , त्यांचें सर्वदा एकोद्दिष्टच आहे . उलट क्रमानें मृतांचें सपिंडन करावें किंवा न करावें . किती एक विद्वान् सर्वांचें सपिंडन सांगतात , असें सांगितलें आहे . निपुत्रिक मृत असतां व उलट क्रमानें मृत असतां विशेष सांगतो रेणुकारिकेंत - " पुत्रहीन मृत असतां भ्राता किंवा भ्रात्याचा पुत्र , अथवा सपिंडांतील पुरुष , किंवा शिष्य यानें त्याचें सपिंडन करावें . सर्वांनीं रहित जो मृत असेल त्याचें सपिंडन पत्नीनें स्वतः करावें . किंवा पत्नीनें ऋत्विजाकडून किंवा उपाध्यायाकडून करवावें . जे उलट क्रमानें मृत असतील त्यांचें सपिंडन वसु , रुद्र , आदित्य यांच्याशीं करावें . कारण , सपिंडन केलें नाहीं तर प्रेतत्व जात नाहीं , असा निश्चय आहे . उलटक्रमानें मृतांचे पितामह मृत असतां त्याच्याशीं पुनः सपिंडन करावें . " ह्या वचनाविषयीं मूल शोधावें . उपलब्ध नाहीं . संन्याशांचें सपिंडन नाहीं . तर अकराव्या दिवशीं पार्वण करावें . तें देखील त्रिदंडी जे असतील त्यांचें करावें . एकदंडी वगैरे जे संन्याशी त्यांचें पार्वण देखील नाहीं . असें पूर्वीं सांगितलें आहे . दंड ग्रहण करण्याचे पूर्वीं मृत असेल तर दाहादिक सपिंडनापर्यंत सर्व कृत्य करावें , असें भट्टचरण - ( नारायणभट्ट ) सांगतात .

सपिंडनविधिमाहबैजवापः समाप्तेसंवत्सरेचत्वार्युदपात्राणिप्रयुनत्त्क्येकंप्रेतायत्रीणिपितृभ्यः प्रेतपात्रं पितृपात्रेष्वासिंचतियेसमानाइतिद्वाभ्यामेवंपिंडोऽथाभिमृशत्येषवोनुगतः प्रेतः पितरस्तंददामिवः शिवंभवतुशेषाणांजायंतांचिरजीविनः समानीवः संगच्छध्वंसंवदध्वमिति यद्यपि तच्चापिदेवरहितमेकार्घ्यैकपवित्रकं नैवाग्नौकरणंतत्रतच्चावाहनवर्जितमितिमार्कंडेयेनोक्तं तथापि सपिंडीकरणंश्राद्धंदैवपूर्वंनियोजयेदित्यादिविरोधाद्विकल्पः प्रेतांशेवाज्ञेयम् अत्रकामकालौविश्वेदेवावपीत्युक्तंप्राक् मैत्रायणीयपरिशिष्टे पित्र्यविप्रकरेहोमः साग्नेरपिभवेदिह यत्तुगोभिलः अनुक्तकालेष्वपितुव्युत्क्रमेणमृतावपि आमेनवापिसापिंड्यंहेम्नावापिप्रकल्पयेदिति तदापदिमातृपितृभिन्नपरम् आपन्नोपिनकुर्वीतश्राद्धमामेनकर्हिचिदितितेनैवोक्तेः शुद्धितत्त्वेकामधेनौचलघुहारीतः सपिंडीकरणंयावत्प्रेतश्राद्धंतुषोडशं पक्कान्नेनैवकर्तव्यंसामिषेणद्विजातिभिः विश्वप्रकाशे प्रेतः सपिंडनादूर्ध्वंपितृलोकेनुगच्छति कुर्यात्तस्यतुपाथेयंद्वितीयेह्निसपिंडनात् स्मृत्यर्थसारेप्येवं ततोवृद्धिश्राद्धंकुर्यात् एतन्मलमासेपिकार्यं अधिमासेनकर्तव्यंश्राद्धमाभ्युदयंतथा तथैवकाम्यंयत्कर्मवत्सरात्प्रथमादृतइतिहेमाद्रौहारीतोक्तेः इतिभट्टकमलाकरकृतेनिर्णयसिंधौसपिंडीकरणं ।

सपिंडनविधि सांगतो बैजवाप - " संवत्सर समाप्त झाल्यावर सपिंडनश्राद्ध करावें , तें असें - चार अर्घ्यपात्रें करावीं , एक अर्घ्यपात्र प्रेताला आणि तीन पितरांना , ( पितामहादिकांना ) असावीं . ‘ ये समाना० ’ ह्या दोन मंत्रांनीं प्रेतपात्रोदकपितरांच्या पात्रांत मिळवावें . याप्रमाणें वरील मंत्रांनीं प्रेतपिंड पितामहादिकांच्या पिंडांत मिळवावा . नंतर त्यांना स्पर्श करुन पुढील मंत्र म्हणावे . ते मंत्र - ‘ एष वोनुगतः प्रेतः पितरस्तं ददामि वः । शिवं भवतु शेषाणां जायंतां चिरजीविनः । ’ समानीव० संगच्छध्वं० ह्या दोन मंत्रांनीं स्पर्श्ह करावा . " जरी " तें सपिंडीश्राद्ध देवरहित , एक अर्घ्यानें व एकपवित्रकानें युक्त आहे . त्यांत अग्नौकरण नाहीं व आवाहन नाहीं . " असें मार्कंडेयानें सांगितलें आहे तरी " सपिंडीकरण श्राद्ध देवपूर्वक करावें " इत्यादि वचनांशीं विरोध येत असल्यामुळें विकल्प समजावा . अथवा मार्कंडेय वचनानें सांगितलेला देवराहित्य एकार्घ्यादि विधि प्रेताच्या एकोद्दिष्टाकडे समजावा . सपिंडीकरण श्राद्ध पार्वण - एकोद्दिष्टरुप आहे . त्यांत कामकाल विश्वेदेव आहेत , असेंही पूर्वीं श्राद्धप्रकरणीं सांगितलें आहे . मैत्रायणीयपरिशिष्टांत - " ह्या सपिंडन श्राद्धांत साग्निकाचाही पित्र्य ब्राह्मणांच्या हातांवर अग्नौकरणहोम होतो . " आतां जें गोभिल - " उक्त काल नसला तरी व्युत्क्रमानें ( उलट क्रमानें ) मरण असलें तरी सपिंडीकरण श्राद्ध आमान्नानेंही करावें किंवा हिरण्यद्वाराही सपिंडीकरण करावें . " तें आपत्कालीं माता पिता यांहून इतरविषयक आहे . कारण , " आपत्काल प्राप्त असला तरी मातापितरांचें श्राद्ध आमानें कधींही करुं नये " असें त्यानेंच ( गोभिलानेंच ) सांगितलें आहे . शुद्धितत्त्वांत व कामधेनुग्रंथांत लघुहारीत - " सपिंडीकरणापर्यंत जीं सोळा प्रेतश्राद्धें तीं ब्राह्मणांनीं आमिष ( माषान्न ) सहित पक्कान्नानेंच करावीं . " विश्वप्रकाशांत - " प्रेत सपिंडनानंतर पितृलोकास जातो , त्याला सपिंडनाच्या दुसर्‍या दिवशीं पाथेयश्राद्ध करावें . " स्मृत्यर्थसारांतही असेंच सांगितलें आहे . तदनंतर वृद्धिश्राद्ध करावें . हें सपिंडनश्राद्ध मलमासांतही करावें . कारण , " अधिक मासांत श्राद्ध करुं नये , तसेंच आभ्युदयिक कर्म ( विवाहादि ) मलमासांत करुं नये , आणि काम्यकर्म मलमासांत करुं नये . हा निषेध प्रथम वर्षांतील श्राद्धाला समजूं नये . " असें हेमाद्रींत हारीतवचन आहे .

इति निर्णयसिंधौ महाराष्ट्रीयटीकायां सपिंडीकरणम् .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP