TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
भिक्षा

तृतीय परिच्छेद - भिक्षा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


भिक्षा

आतां भिक्षा सांगतों

अथभिक्षा विधूमेसन्नमुसलेव्यंगारेभुक्तवज्जने कालेपराह्णभूयिष्ठेनित्यंभिक्षांयतिश्चरेदित्युक्तेकालेउद्वयमितिचतसृभिरादित्यमुपस्थायतेनैक्यंध्यात्वा आकृष्णेनेतिप्रदक्षिणंकृत्वायेतेपंथानइतिजप्त्वायोसौविष्ण्वाख्यआदित्येपुरुषोंतर्ह्रदिस्थितः सोहंनारायणोदेवइतिध्यात्वाप्रणम्यतम् त्रिदंडंदक्षिणेत्वंगेततः संधायबाहुना पात्रंवामकरेक्षिप्त्वाश्लेषयेद्दक्षिणेनत्वितिबौधायनोक्तदिशात्रीन्पंचसप्तवागृहान्गत्वाभवत्पूर्वंभिक्षांयाचित्वापूर्णमासिपूर्णंमेभूयाइत्यागत्यशुचिरन्नंप्रोक्ष्य ॐभूः स्वधानमइत्यादिव्यस्तसमस्तव्याह्रतिभिः सूर्यादिदेवेभ्योभूतेभ्यश्चभूमौक्षिप्त्वाभुक्त्वाप्रणवेनषोडशप्राणायामान्कुर्यादितिसंक्षेपः गौतमव्याख्यायांभृगुः यतिहस्तेजलंदत्वाभैक्ष्यंदद्यात्पुनर्जलं भैक्षंपर्वतमात्रंस्यात्तज्जलंसागरोपमं अत्रसर्वत्रमूलंमाधवापरार्कमदनरत्नस्मृत्यर्थसारादौज्ञेयम् ।

" लोकांच्या घरांतून धूर येईनासा झाला , मुसळाचे आघात बंद झाले , चुलींत निखारे नाहींसे झाले , सर्वांनीं भोजन केलें , अशा अपराण्हप्राय कालीं यतीनें नित्य भिक्षा मागावी . " ह्या मनूनें सांगितलेल्या कालीं ‘ उद्वयं० ’ ह्या चार ऋचांनीं आदित्याचें उपस्थान करुन आदित्य व आपण एक आहें , असें ध्यान करुन ‘ आकृष्णेन० ’ ह्या मंत्रानें प्रदक्षिणा करुन ‘ येते पंथानः० ’ याचा जप करुन " जो हा विष्णुरुपी पुरुष सूर्यमंडलामध्यें आहे तोच ह्रदयांत असलेला नारायण देव मी आहें , असें ध्यान करुन त्याला नमस्कार करुन नंतर उजव्या अंगावर त्रिदंड घेऊन बाहूनें तो धरुन वामहस्तांत पात्र घेऊन उजवा हात त्यास लावून " या बौधायनानें सांगितलेल्या प्रकारानें तीन , पांच किंवा सात घरीं जाऊन ‘ भवान् भिक्षांददातु ’ अशा रीतीनें भवच्छब्दपूर्वक भिक्षा मागून ‘ पूर्णमसि पूर्णंमेभूयाः ’ या मंत्रानें अभिमंत्रण करुन येऊन शुद्ध त्या अन्नाचें प्रोक्षण करुन ‘ ॐभूः स्वधानमः ’ इत्यादिक व्यस्त व समस्त व्याह्रतींनीं सूर्यादि देवांना आणि भूतांना भूमीवर अन्न ठेऊन भोजन करुन नंतर प्रणवानें सोळा प्राणायाम करावे , असा हा प्रकार थोडक्यांत सांगितला आहे . गौतमाच्या व्याख्येतं भृगु - " संन्याशी भिक्षेस आला असतां संन्याशाच्या हातांत उदक देऊन नंतर भिक्षा द्यावी आणि पुनः उदक द्यावें . असें दिलें असतां दिलेली भिक्षा पर्वतासारखी होते आणि उदक सागरासारखें होतें . " या सर्वांविषयींचीं मूळ वचनें माधव , अपरार्क , मदनरत्न , स्मृत्यर्थसार इत्यादिकांत पहावीं .

कण्वः एकरात्रंवसेद्ग्रामेनगरेपंचरात्रकं वर्षाभ्योन्यत्रवर्षासुमासांस्तुचतुरोवसे‍त् जाबालश्रुतौ शून्यागारदेवगृहतृणकुटीवल्मीकवृक्षमूलकुलालशालाग्निहोत्रगृहनदीपुलिनगिरीकुहरनिर्झरस्थंडिलेष्वनिकेतनइति मात्स्ये अष्टौमासान्विहारः स्याद्यतीनांसंयतात्मनां एकत्रचतुरोमासान्वार्षिकान्निवसेत्पुनः अविमुक्तप्रविष्टानांविहारस्तुनविद्यते अत्रिः भिक्षाटनंजपंस्नानंध्यानंशौचंसुरार्चनं कर्तव्यानिषडेतानिसर्वथानृपदंडवत् मंचकंशुक्लवस्त्रंचस्त्रीकथांलौल्यमेवच दिवास्वापंचयानंचयतीनांपतनानिषट् आसनंपात्रलोभश्चसंचयः शिष्यसंग्रहः दिवास्वापोवृथाजल्पोयतेर्बंधकराणिषट् दक्षः नाध्येतव्यंनवस्तव्यंनश्रोतव्यंकथंचन यतिपात्राणिमृद्वेणुदार्वलाबुमयानिच मदनरत्नेअत्रिः पित्रर्थंकल्पितंपूर्वमन्नंदेवादिकारणात् वर्जयेत्तादृशींभिक्षांपरबाधाकरींतथा बृहस्पतिः नतीर्थवासीनित्यंस्यान्नोपवासपरोयतिः नचाध्ययनशीलः स्यान्नव्याख्यानपरोभवेत् एतद्वेदार्थभिन्नपरम् अत्रिः स्नानंसुरार्चनंध्यानंप्राणायामोबलिस्तुतिः भिक्षाटनंजपः संध्यांत्यागः कर्मफलस्यच एतेयतिधर्माइत्यर्थः अन्येपिमाधवमिताक्षरादौज्ञेयाः यतिधर्मसमुच्चये नस्नानमाचरेद्भिक्षुः पुत्रादिनिधनेश्रुते पितृमातृक्षयंश्रुत्वास्नात्वाशुध्यतिसांबरः ।

कण्व - " संन्याशानें वर्षाकालावांचून इतरकालीं एका गावांत एक दिवस राहावें . आणि एका नगरांत पांच दिवस राहावें , जास्ती राहूं नये . वर्षाकालीं एक ठिकाणीं चार महिने राहावें . " जाबालश्रुतींत - " शून्यगृह , देवालय , तृणकुटी , वारुळ असलेलें वृक्षाचें मूळ , कुंभाराची शाळा , अग्निहोत्राचें घर , नदीचें वाळवंट , पर्वताची गुहा , पाण्याचा झरा असलेलें स्थान , आणि स्थंडिल यांचेठायीं संन्याशानें वास करुं नये . " मात्स्यांत - " संन्याशांनीं इंद्रियें स्वाधीन ठेऊन आठ महिने फिरावें . आणि वर्षाकालाचे चार महिने एका स्थानीं वास करावा . अविमुक्तक्षेत्र वाराणसी त्या ठिकाणीं जे गेले असतील त्यांनीं दुसर्‍या ठिकाणीं फिरुं नये . " अत्रि - " भिक्षेला फिरणें , जप , स्नान , ध्यान , शौच , देवपूजा , हीं सहा कृत्यें संन्याशांनीं राजाज्ञेप्रमाणें अवश्य करावीं . मंचकावर निद्रा , शुक्लवस्त्रपरिधान , स्त्रियांच्या गोष्टी , लौल्य ( चंचल स्वभाव किंवा कोणत्याविषयीं आकांक्षा असणें ), दिवसा निद्रा , वाहन हीं सहा कृत्यें संन्याशांना पतन करणारीं आहेत . आसनाचा लोभ , पात्रांचा लोभ , संचय करणें , शिष्य जमविणें , दिवसा निद्रा , योग्य कारणावांचून फार बोलणें , हीं सहा कृत्यें संन्याशाला बंध करणारीं आहेत . " दक्ष - " संन्याशानें कोणत्याही ग्रंथाचें अध्ययन करुं नये . कोणत्याही ठिकाणीं एकत्र वास करुं नये . कोणाच्याही गोष्टी व कथाभाग श्रवण करीत असूं नये . संन्याशाचीं पात्रें मातीचीं , वेळूंचीं , काष्ठाचीं व पांढर्‍या दुधभोंपळ्याचीं असावींत . ताम्रादि धातूंचीं संन्याशांनीं वापरुं नयेत . " मदनरत्नांत अत्रि - " पूर्वीं पितरांसाठीं तयार केलेल्या अन्नाची , आणि देवादिकांसाठीं तयार केलेल्या अन्नाची , भिक्षा संन्याशानें वर्ज्य करावी . तशीच ज्या भिक्षेपासून दुसर्‍यास पीडा होईल अशा तर्‍हेची भिक्षा संन्याशानें वर्ज्य करावी . " बृहस्पति - " संन्याशानें नित्य तीर्थाचे ठिकाणीं वास करुं नये . फार उपवास करुं नयेत . सतत अध्ययन करुं नये . आणि सतत व्याख्यान करुं नये . " या वचनानें व्याख्यानाचा निषेध केला हा वेदार्थव्यतिरिक्तविषयक आहे . अत्रि - " स्नान , देवपूजा , ध्यान , प्राणायाम , बलिस्तुति , भिक्षाटन , जप , संध्या आणि केलेल्या कर्माच्या फलाचा त्याग हीं संन्याशानें नित्य करावीं . " हे संन्याशाचे धर्म समजावे . दुसरेही संन्याशाचे धर्म आहेत ते माधव , मिताक्षरा इत्यादि ग्रंथांतून जाणावे . यतिधर्मसमुच्चयांत - " संन्याशानें पुत्रादिकांचें मरण श्रवण केलें असतां स्नान करण्याचें कारण नाहीं . माता व पिता यांचें मरण श्रुत झालें असतां संन्याशी वस्त्रसहित स्नान करुन शुद्ध होतो . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:26.7070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

squamopetrosal

  • पट्टकाश्म- 
RANDOM WORD

Did you know?

विवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.