TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ६१

ओवीगीते - संग्रह ६१

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

भावजयीच्या बोला भावू बहिणीवरी राग

अरुण्या वनात वधली राग राग ।

भाव आपुला धाकुला भावजयी लोकाची

दोन दिडक्यात नार आणली फुकाची ।

भावजयी बाई बोलणं हंकाराचं

माज्या बंधुजीचं मन धर शंकराचं ।

भावजयीबाई नको बोलू असं उणं

भाव शंकराच्या कसं सांगू तुला गुण ।

भावजई बाई कशाची नाई आस

माया परीस भावाची मोती पवळ्यांची रास ।

भावजयी नगं करू तू असा हेवा

भाव माजा भोळा सांब सुखी ठेव त्येला देवा ।

पिता माजा वड, माता माजी वड फांदी

येवढा पिंड झाला, दोहिंच्या कड-खांदी ।

येवढा माजा पिंड माज्या बाजीच्या मासाचा

शिरी झुंबडा केसाचा माज्या मायच्या सायसाचा ।

माजी माय बाई कशी म्हणू मी वंगाळ

जल्मले तुज्या पोटी चिखलातूनी कंबळ ।

माजी मायबाई पेली तुज थान

तुज्या कुशीत जल्मले पाडस मी ल्हान ।

माजी मायबाई उपकारी काशी

नव महिने ग वजं वागवीलं डाव्या कुशी ।

तुजी निदरा मोडली माज्या जल्मल्या दिशी

दुखा सुखात झाली ग लई लई येडी पिशी ।

मायचा उपकार फेडीशी येडया जिवा

मांडीचा चवरंग नेतराचा केला दिवा ।

मायची येडी माया तुज्या सर हाय देवा

मायच्या नशिबाचा तुला वाटतोया हेवा ।

माजी मायबाई माजी साकराची पुडी

पुडीत जलमली येवळी माजी कुडी ।

सरगीच्या देवा उघड सरगीचा झोपाटा

माय गंधारी काशीचा पाहू दे मुखवटा ।

अंबारीचा हत्ती हा लुटला जाईना

भावाची सर माझ्या कोणाला येईना ।

माझं दळण ग कोण्या वाडयात रांधतं

गोकुळी सखा ग माझं माहेर नांदतं ।

ल्योक पाजे पाणी सून गंगा मधी उभी

अजून ग नाही आली लेक संसाराची लोभी ।

बापाचे उपकार फेडिते काडोकाडी

आईचे उपकार भिनले हाडोहाडी ।

दिवाळीच्या दिवशी भाऊ केला मुसलमान

हातामधी खण पत्री लिहतो सलाम ।

बाप म्हणे लेकी माझी हरबर्‍याची डाळ

जाशील परघरां येथे होईल तुझी राळ ।

गावाच्या खालती टांगा कोणाचा पळतो

आक्का या बाईचा पदर शालूचा लोळतो ।

आली ग लक्ष्मी आल्या वाटेनं जाऊ द्या

बाळाचं माझ्या देवघर पाहू द्या ।

येथून दिसते माझ्या माहेराची वाट

निर्मळ ग पाणी हा गंगाबाईचा घाट ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:24:21.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उतटणें

  • अ.क्रि. उचंबळणें ; भरुन येणें . कीं हें सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदें उतटलीं । - दा १ . ७ . ३१ ऐकोनि उतटला समर्थां प्रेम । - दावि ३०२ . [ सं . उत + तट = वर येणें ] 
  • अ.क्रि. 
  • तडकणें ; उकलणें ; उलणें ; उसवणें ; ताणून फाटणें ; फुटणें ; तटतटणें ( ताणल्यानें , आंतून जोर झाल्यानें बंद , इ० ). मग शिवणी जैशी उतटे ॥ - ज्ञा ६ . २६६ . तयेच्या चोळीचे सकळ जवदाणें उतटती । - सारुह ८ . १६५ . नादें उतटलें आकाश । वेसीस्व २ . २४ . 
  • घट्ट होणें ; दाटणें ; अतिशय ताण बसून तुटणें . हे चोळी गेली उतटौनि । तैंचि जाणिलें मियां ॥ - शिशु २२५ . - सक्रि . उकलणें ; फाडणें ; ताणून तोडणें इ . [ सं . उत + तन ] 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.