TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह १८

ओवीगीते - संग्रह १८

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

पंढरीची बाई कुंकू मी ग एकटी कशी लेवू

यक्षदेवी पद्‌मावती आधी तिलाच मान देवू ।

पंढरीचं कुंकू मला महिन्याला लागी शेर

जावा नंदाचं माजं घर ।

सरलं दळयानू माज्या सुपात येडी गंगा

द्रुपति वव्या गाती तुला पिरतीच्या पांडुरंगा ।

चवघी आम्ही जावा पाचवी माझी सासू

नंद कामीनी मदी बस माज्या चुडयाला शोभा दिस ।

माझ्या ग अंगणात कुनी सांडीला दहीभात

माजा तो बाळराज बाळ जेवीला रघुनाथ ।

सदरी सोर्‍यामंदी नारुशंकर तांब्या लोळे

सावळा बाळराज नातू जावळीचा खेळे ।

शेजी तू आईबाई तुजा संभाळ सोनचाफा

माजा अवकाळ बाळराज बाई मोडील त्येचा चाफा ।

बाळ चालतं रांगयीतं बाळ धरीतं धोतराला

माज्या त्या बंधुजीला कन्या सोबती चातुराला ।

लुगडयाची घडी बाई यीना ग माझ्या मना

पित्या माज्या दवलता बापा नेसू दे तुज्या सुना ।

लुगडयाची ग घडी दोनी पदर रामसीता

घडी घालतो माझा पिता नेस म्हनीती माझी माता ।

लुगडयाची ग घडी म्या का टाकीली बाकावरी

माजा रुसवा बापावरी ।

काळी ती चंद्रकळा दोनी पदर रेशमाचे

माज्या ग बाळकाचे चाटी मैतर निपानीचे ।

काळी ती चंद्रकळा दोनी पदर सारयीक

हौशा कांताची पारयीक ।

भरील्या बाजारात बंदु ओळखी पैल्या तोंडी

हाती छतरी पिवळी दांडी ।

भरल्या बाजारात चोळी फुटानं मला दीती

बयाच्या माज्या बाळा तुला गोटानं दावू किती ।

बारिक बांगडी बारा आन्यानं लेती जोडी

बंदु हसत चंची सोडी ।

बारीक बांगडी मला भरुसी वाटली

हौवश्या भ्रतारानं तार पुन्याला पाटवीली ।

बारिक बांगडी गोर्‍या हातात चमक्या मारी

माजा तो बाळराज केस कुरळ मागं सारी ।

माळ्याच्या मळ्यामंदी माळी मळ्यात येऊ दीना

माजा तो बाळराज फुलं जाईला राहू दीना ।

सोन्याची अंगठी ग अंगठी कशानं झिजयिली

पित्या माझ्या त्या गुजरानं रास गव्हाची मोजीयीली ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:42.6270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चकाकणें

 • स्त्री. ( चकचकीचा अतिशय ) १ चकचकीतपणा ; लकाकणें ; झळझळणें ; चकचकाट . २ एकसारखा पडणारा मोठा , प्रखर , प्रकाश ; तेज ; प्रभा . खनिज पदार्थांच्या अंगीं चकाकी असते . - पदाव १ . ५ . 
 • चकाकते तेवढें सोनेच नसतें 
 • All that glitters is not gold.याचा अनुवाद. चांगल्‍या गोष्‍टीचा काही गुण एखाद्यात असला म्‍हणजे सर्व प्रकारे त्‍या गोष्‍टीप्रमाणेच विशिष्‍ट वस्‍तु असते असे नव्हे. 
 • v i  To gleam or flash; also to glare or shine brightly. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.