TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह १२

ओवीगीते - संग्रह १२

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

अंगणी माझ्या काढीले मी चैत्रांगण

कलाकुसरीची बाळ तिच्याविना सारं सुन ।

बहिणा सासर्‍याला जाती नको रडूस माळावरी

घाल पदर बाळावरी ।

सासूरवासिनीला तिला आधार कुणायाचा

तिचा ग भ्रतार देव अवतारी गुणायाचा ।

सासूरवासिनीला तिचं वंगाळ लई जिणं

तिला बोलती सारी जणं ।

सहा महिन्याचं सासर तिला वरीस गेलं सज

बया मालन बोलती कशी लागली तुला नीज ।

अंगणी मला दिस क्षणोक्षणी माझी बाळ

सासरी सुखावली माहेर सुनं झालं ।

माहेराला जाती माझं बसणं जोत्याकाठी

पाया पडाया भावजयांची झाली दाटी ।

माहेरी जायायाला जीव माझा रंगयीला

भावज गुजरीला नाही नंदपणा दावीला ।

अंगणी माझ्या आला, आला केळीचा लोंगर

सासर्‍याला गेली बाई सोन केळ्याची खाणार ।

बाळ सासर्‍याला जाती तीका सार्‍यांच्या आवडीची

तिला ग घालवाया सभा उठली चावडीची ।

टिप्पूर चांदणं ते का पूनवी बाईयीचं

सुख माहेरी आईयीचं ।

राणी निघाली माहेरा उभा भ्रतार आंब्यातळी

कधी येशी चंद्रावळी ।

उजळलं माझं घर दीप लावितां समोर

हंबरली गोठीयात गाई आणिक वासरं ।

सासरी जाताना डोळ्याल आल्या गंगा

तिला महिन्याची बोली सांगा ।

सासरी जाताना लेक बघी मागं पुढं

तिच्या आजीची झोप मोड ।

सासरी जाताना लेक डोंगराच्या आड

मला तिथून पत्र धाड ।

सांगून मी ग धाडी मायबाई फार फार

तिनं लहानाची केली थोर ।

सांगून मी ग धाडी आल्या गेल्याला गाठून

झालं वरीस भेटून ।

सांगून मी ग धाडी परदेशीच्या कासाराला

ऊंच बांगडी मखराला ।

आई तवर माहेर बाप तवर माझी सत्ता

नको बोलूस आत्ता भाऊराया ।

आई तवर माहे बाप तवर जाऊ येऊ

मग आणतील माझे भाऊ ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:34.2470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खिळणें

  • स.क्रि. १ खिळेबंदी करणें ; डांभणें , न हालेसे करणें ; पक्कें करणें ; चिकटून राहिनें करणेम ; जखडुन ठाकणें ; ' काई बाणवरी खिळूं । वारयातें । ' - ज्ञा . ११ . ४६१ . ' गज खिळोनी केले अचळ । ' - मुआदि २३ . १३९ . २ खीळ किंवा अडसर लावणें , घालणें . ३ ( ल .) रोखणें ; अडकविणें . ' खिळण पहा . ' मंत्री महासप्र खिळिती । ' - दा ९ . ८ . ३७ . ४ चावणे ( विशिष्ट लहान कीटकांच्या चावण्याच्या आणि घट्ट धरण्याच्या संबंधी ) ५ ( व .) पावसाचें थोडेसे शिंतोडे पडणें . ६ ( व .) उभ्या पिकांतील मधलीं झाडें वाळणें . ( सं . कील ) 
  • v t  Nail down; fix; bolt. Fig. Detain. 
  • To nail down; to fix firmly; to fasten or fix gen. 2 To fasten by a bolt, to bolt. 3 fig. To detain, confine, fix. See the senses given under खिळण. 4 To bite, i. e. to nail down. Used of the biting and holding fast of certain small insects. 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.