TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ८

ओवीगीते - संग्रह ८

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

कुंकवा परायास मेणाची ग बंदोबस्ती

नंद कामिनीच्या घरी चुडयान केली वस्ती ।

समोरल्या सोप्या जान पासूडी कुणायाची

सासू निजली सुनायाची ।

लेण्यामंदी लेणं, मणी डोरलं कानी फुल

लेकी बाळीचा भरतार आगाशी चंद्र डुल ।

मायालेकीचं भांडान जसी दुधाची उकळी

बया मनाची मोकळी ।

जुंदळ्या परायास काय अंबाडी लांब फोक

मायलेकींची शीन एक ।

फाटला पालव बाई निर्‍यात झाकावा

आब कंताचा राकावा ।

दुबळ्या भरताराची सेवा करीती आदरान

पाय पुसुनी पदरान ।

पाठीवैली वेणी जन म्हनीती काळा साप

माजे तू भैनाबाई माजे वानीनी रुप झाक ।

माळ्याच्या मळ्यामंदी केली नारळी भैनीभैनी

लाडका बाळराजं मंदी केवडा अवगुनी ।

गावाला गेला बाळ एक महिना तीनवार

माजा बाळराज माजा जोडीचा बिलवार ।

उगवला नारायण उगावताना लाली लाल

मावली मातूसरी राधा बाळाला पाणी घाल ।

सकाळच्या पारी आदी शेणाच्या पाया पड

सावळ्या भाऊराया मग गुरांची पेंडी फोड ।

काळ्या इठ्‌ठलाला गोरी रुक्मीणीनं कशी दिली

वीस पुतळ्याची माळ चंद्रहाराच्या खाली गेली ।

भरल्या बाजारात मायलेकींची पडली गाठ

चाटीदादा दावीतो ग रंग गुलाबी चोळी दाट ।

पहाटीच्या दळपाला न्हाई मी कुनाला हार गेली

बया माज्या गौळणीच दूध वाघिणीच पेली ।

बग्गाहाळच्या तलाव्यानं माळरानाचं झाल मळ

सांगते तुला भना सासू सुनांचं पिवळं गळ ।

पिकल पिकल जन बोलतो येशियीत

माझा बंधुजीचा तीवडा बुडाला राशीत ।

पिकल पिकल जन बोलती चावडीला

माझ्या बंधूजीची रास लागली वावडीला ।

बाळ सासर्‍याला जाती, घोडं धरील ज्याचं त्यांनी

माझ्या त्या ग तान्हीयीचं पाय झाकिलं बंधवांनी ।

बाळ सासर्‍याला जाती, घोडं लागलं वाळवंटी

माता गुजरी बोल, बया गळयाची सोड मीठी ।

बाळ सासर्‍याला जाती घोडं बुत्तीचं गेलं पुढं

बहिणा माझ्या त्या गुजरीचा जीव लागला बयाकडं ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:24.6330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

individualist

 • सा. व्यक्तिवादी 
 • सा. व्यक्तिवादी 
 • सा. व्यक्तिवादी 
 • पु. व्यक्तिवादी 
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,108
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 326,018
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.