TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ४३

ओवीगीते - संग्रह ४३

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

नांदाई जाती बाळ मामाच्या त्या वाडयावरनं

माझी तू बाळाबाई पाणी मागती घोडयावरनं ।

नांदाई जाती बाळ ईळाचा गेला ईळू

माझी तू बाळाबाई लांब पल्याला गेली साळू ।

बापाला दिली लेक कामाच्या खटाल्यात

माझी ती बाळाबाई मधी लंवग मसाल्यात ।

बापानं दिली लेक वाटेच्या गोसाव्याला

बाळीच्या नशीबानं मिळे पालखी बसायला ।

बापानं दिली लेक न्हाई पाहिलं वतइन

माझी तू बाळाबाई जोडा पाहिला रतईन ।

सासू नी सासरा दोघं सोन्याची पाखरं

सोन्याच्या सावलीला आम्ही लोकांची लेकरं ।

पाचींनी उतरंडी तरतरेची झाकईनी

सासरी गेली बाळ जावा नंणदांत देखयीनी ।

सासू नी सासरा जाई मोगर्‍याचं आळं

त्या ग आळ्याच्या सावलीला परघरची आम्ही बाळं ।

बंधूजी पावईना शेजी बघती वसावसा

ताईता बंधु माझा, माझा गुलाबी पेरु जसा ।

हिरव्या चोळीचा ग पाच रुपये तिचा दर

ताईता बंधु माझा घेणार छातीखोर ।

आला बंधुजी पावईना शेजी नारीला विचारीती

बंधूच्या भोजनाला घड केळीचा उतरती ।

शेवग्याच्या शेंगा शिजविल्या मऊमऊ

हावशा माझ्या बंधू सोड बारस दोघं जेऊ ।

वाटवरला झरा पाणी येईल तसं प्यावं

बंधूच्या जिवावरी सोनं मिळल तसं घ्यावं ।

मैना सासरला जाती तुला मुराळी काय तोटा

तिलाबी आनायाला एका संगट चौघ नटा ।

जिवाला माझ्या जड डोकं दुखतं राहूईनी

ताईता बंधुजीला आणा वैदाला बोलावूनी ।

सासर्‍या आली लेक डोळे भरले पाण्यायानं

सांगते सखे तुला गाय बांधली दाव्यायानं ।

आईबापानं दिली लेक नाही पाहिली चालरीत

जाई अडकली चिलारीत ।

लेकीचा जलम जसा काचेचा बंगला

लेकीच्या जलमाला औल्या असावा चांगला ।

पायां बी पडूं आली म्यां का धरली वरच्यावर

तिच्या डोरल्याचा भार लोळे माझ्या पायावर ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:23:25.9300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

contradictory opposition

  • व्याघात प्रतियोग 
RANDOM WORD

Did you know?

सोळा मासिक श्राद्धें कोणती ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.