TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ५९

ओवीगीते - संग्रह ५९

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


माहेर

सीता भावजई - पाय धुवून पाणी पेली

बापाजी राजानं - कोण्या अशीलाची केली ।

तोडया पैंजणाचा - आवाज येतो घाऊ घाऊ

सीता भावजई - घाली सासर्‍याला जेवूं ।

तोडया पैंजणाची - कोण वाडा उतरती

बापाजीची सून - दिवा मारुतीला नेती ।

सासर्‍याला सून - आवडली मनातून

तोडे पायजिण्या - हळू उतर जिन्यातून ।

सीता भावजई - कुंखाची लाव चिरी

तुह्या चिरीसाठी - नौस केले नानापरी ।

सीता भावजई - कुंखू लाव कोरणीचं

पाठीचा भाऊ मव्हा - सोनं मह्या मोरणीचं ।

सीता भावजई - कुंखू लाव ग टिकला

अंजिराच्या बागा - बंधू राखतो एकला ।

सीता भावजई - कुंखू लाव पिंपळपान

तुह्या कुंखावरी - दादा रंगील्याचं ध्यान ।

बारा बयलाचं शेण - हाये भागेरथी सून

साखळी भावजई - न्हाई पडू देत उणं ।

शिण्याच्या साताला - चोळ्या फाडी उडदाणी

रंगीळा दादा मव्हा - वैनी सांगी एक शिणी ।

दुरुन पुसते - मव्हा सोयरा सुखाचा

सीता भावजईला - पुडा धाडते कुंखाचा ।

मपले आऊख - मह्या बंधवाला देते

हळदीवरी कुंखू - सीता भावजई लेते ।

सीता भावजई - नको पडू मह्या पाया

वडील भाऊराया - आशीर्वाद जातो वाया ।

सीता भावजई - जशी गुलालाची पुडी

रंगीला दादा मव्हा - अभीर तिच्या चडी ।

पातळ पुतळ - कंबर मुठीच्या मोजाची

भाऊच्या ग मह्या - राणी चतुर भुजाची ।

सीता भावजई - तुहा मला राग येतो

रंगीला दादा मव्हा - हातानं पाणी घेतो ।

भाऊ घेतो चोळी - भावजई गुमानात

दोघांच्या इचारानं - चोळी बांधी रुमालात ।

भाऊ घेतो चोळी - भावजय डोळे मोडी

चोळाची काय गोडी - शिंपीदादा घाल घडी ।

बोलला ग भाऊ - बह्यणीला कर रोटी

बोलली भावजय - गहू जमीनीच्या पोटी ।

भाई राजस ग माझा - समुद्र जायफळ

सावळी भावजय - लवंग मोठी आगजाळ ।

सीता भावजई - तुह्या भावामंधी मळ ।

पाटीचा दादा मव्हा - चांद कसा निरमळ

सीता भावजई - हाय कोणाची कोण

भाऊच्या करीता - तिला दिलं मोठेपण ।

सीता भावजई - उचल उष्टे दुरण

जेऊनिया गेले - तुहे नंदई बाम्हण ।

सीता भावजई - उचल उष्टया ताम्हणी

जेऊनिया गेल्या - तुह्या नणंदा बाम्हणी ।

नणंदा भावजया - हैती एका ग चालीच्या

लोक ग बोलती - लेकी कोण्या मावलीच्या ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:24:16.0730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंधारी

 • स्त्री. १ काळ्याकुट्ट ढगांमुळें पडलेला अंधार . २ घोडा किंवा रहाटाचा , घाण्याचा बैल यांच्या डोळ्यांस लावण्याची झांपड . ' अंधारी भरगच्चीची निमजरी .' - ऐरापुप्र ९ . ५१३ . ३ पित्तक्षोभानें डोळयापुढें एकाएकीं भासणारा अंधार किंवा चक्कर ; मूर्च्छा ; तसेंच उतारवयामुळें व ( ल .) आढ्यतेमुळें डोळ्यांवर येणारी धुंदी . ( क्रि०येणें ). ( गो .) ' ताज्या डोळ्याकडेन अंधारी आयली .' 
 • स्त्री. १ रहाटगाडग्याच्या चाकाच्या दोन दात्यामधील जागा ; दंतांतर ; खांबा . २ कडीपाटाच्या दोन कड्यां मधील जागा झांकण्याकरितां बसविलेली आडवी फळी ; खांडे व दांडे यांच्यामधील फळी . ३ लांकडी जिन्याच्या दोन पायर्‍यांमध्यें मागच्या बाजूस असलेली पोकळ जागा बंद करण्याकरितां बसवावयाची फळी . ' अंधारी उंच ठेवूं नका . ' ४ तुरुंग ; अंधार . कोठडी ; तळघर . ५ अंधार ; काळोख ; ( क्रि० येणें ; पडणे ). - परमा १० . ११ . ७ बळद ; भिंतींत काढलेली कपाट ; तळघर . 
 • ०कुधारीं कोधांरीं - क्रिवि . १ काळोखांत ; अंधारात ; सांधीकोंदेंत कोन्याकोपर्‍यांत . २ ( ल .) गुप्तपणें ; चोरुन ; आडुन ; ( अंधार्र द्वि .). 
 • f  Dimness. A blind. Darkness coming over the eyes. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.