TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २९

ओवीगीते - संग्रह २९

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

महादेवाच्या पिंडी बेल वाहिला जाता जाता

चुलता पंडित संगं होता ।

महादेवाच्या पिंडी फूल वाहिलं वडाचं

हात्तीच्या चुडयाचं सोनं दिडाच्या पाडयाचं ।

महादेवाच्या पिंडी बेल वाहिला तिकटीचा

बयाच्या जिवावरी न्हाई कुनाची परवचा ।

सोमवार दिशी बाई बाई आई लेकाची गहू दळी

नको निवदाला तुझी पोळी ।

सोमवार दिशी बाई आई लेकाची पाणी न्हाली

सदाशिवाला वर्दी गेली पूजा बेलाची ढासळली ।

महादेवाची पिंड कशानं ओली झाली

पुत्रासाठी मी सेवा केली ।

महादेवाच्या पिंडी बेल वाहिला असा कोणी

नटवा माझा बंधु पहिला पुत्र झाला त्यांनी ।

माझा तो बंधुराया वटी केली रुमालाची

पेट्‌टी पेरीतो इनामाची ।

पाटाचं पाणी सरळ सापावाणी

माझा तो बंदुराया ईमानी बापावाणी ।

नवस मी करीते बंधुला पुत्र व्हावा

भाचा मुरळी मला यावा ।

माझा तो भाऊराया नवरा मोतीयाचा घड

काय मागण्या तुमच्या चढ ।

जावेचा आला भाऊ काढीले सोनसळी गहू

दादा उपाशी नको जाऊ ।

नणंद आत्याबाई बाळ धरतो निरीयाला

मोती मागतो चुरीयाला ।

वर्‍हाड उतरीलं पानमळ्याच्या टिपरीखाली

नवरा सोन्याच्या छतरीखाली ।

बहिणीला बघू आले पुणे सातार तालुक्यात

बहिणा भिंगाच्या दरवाज्यात ।

बहिणीला बघू आले वीस मोटार तीस टांगा

बहिण आजोळा गेली सांगा ।

नंद कामीन भागीरती जाव गुजर धुरपती

दीर दाजीबा गणपती चांद सूख्या माजा पती ।

सकाळच्या पारी बाई मी लोटीते घरदार

पायी जोडवी भरदार ।

पाण्याला जाते नार तुझ्या घागरी लाल काई

नटबा बंधु माजा वरुन टाकतो फुलजाई ।

लेकाच्या आयीयीला तिला कशाची लाज लज्जा

उभा राहिली दरवाजा हाक मारती बाळराजा ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:58.7300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खेकडा

  • वि. १ वयस्क ; जख्ख ; खोकड ; जीर्ण , २ तुसडा ; खाष्ट ; हिरवट . ( खेकणें , खेकडा ) 
  • ०चाल्या वि. खेकड्याप्रमाणें चालणारा ; तिरप्या चालीचा . 
  • ०मेकडा वि. १ अव्यवस्थित ; वेडावांकडा ; गदळ ; ओंगळ ; नेभळा . २ कुरूप ; बेडौल ; वाईट . ( मनुष्य , वस्तु ) ( खेकडा द्वि .) 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.