TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २०

ओवीगीते - संग्रह २०

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

जिवाला भारी जड बाई म्या हुंबर्‍या दिलं ऊसं

गौळणी माजी बया तुला कळालं न्हाई कसं ।

जिवाला भारी जड पाय ठरना जमिनीला

बया माझ्या त्या मालनीला कसं कळालं हरनीला ।

थोरल्या जात्याचं ग नाव ठेवीलं हत्तीरथी

बया माझ्या मालनीच्या सुना दळील्या भागीरथी ।

बया बी म्हनू बया बया तोंडाला येती ग्वाड

बया मनूबीक्याचं झाड ।

पारवं घुमत्याती पित्या माज्याच्या माडीचं

पाटचं दळानं ग भावज गुजर लाडीचं ।

पान्याला जाती नार, नार हिकडं कुनीकडं

चल बंदूच्या हिरीकडं चाफा चंदन दुहीकडं ।

पान्याला जाती नार, नार कावरी बावयीरी

बंदु ऊसाच्या वावयीरी ।

पानंबी खातावन्या तुझ्या रंगीला दातदाडा

ताईता बंदु माजा चंद्र वाडयात उगवला ।

साकबीरीचा लाडू बाई मी भुईला कशी फोडूं

बारा वर्षाची गडयीन एका शब्दाला कशी तोडूं ।

गाईचा गाईराखा गवळ्या येशीत झाली दाटी

ताईता बंदु माज्या तोड चंदन सोप्यासाठी ।

सरगीच्या देवा तुजं एवड काय केलं

चुलता माजा पंडीयीत झाड गुजाचं माजं नेलं ।

सासर्‍या जाती भैना वाट लागली कुसळयाची

माजी त्या भैनाची ग बोटं नाजूक मुसळ्याची ।

पायाबी पडूं आली पड हितच अंगनात

ताईता बंदु माजा हिरा झळकीतो बिल्वरात ।

मारक्या बैलाला ग सारं भेतया माजं गाव

ताईता बदुं माज्या धन्या लाडक्या दावं लाव ।

वळवाच्या पावसात ईज झालीया कावयीरी

बंदु माझ्याच्या शेतात ग कुरी झालीया न्हवयीरी ।

थोरल्या जात्याची ग म्या ग केलीया भिंगरीटी

बयाचं पेली दूध माज्या खेळतं मनगटी ।

वाट ग वरली हीर चाक करीत भिरीभिरी

नटवा बंदु माजा मनमोहन मोटवरी ।

नेनता मुराळी ग येतो वाटेनं खेळयीत

राघु मैना बोलती जरीपटका लोळवीत ।

हावस मला भारी बंदुसगट जेवायाची

आजी माजी ती गवळण दुरडी येळीती सेवायाची ।

मावळण भाच्यायाचा गेला झगडा गंगवरी

तानं माझं बाळराज चेंडू फेकितो मामावरी ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:45.5130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

inundant

 • जलमय 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.