मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २२

ओवीगीते - संग्रह २२

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


डोरल्याचा साज वर सराला नाही जागा

कंत हावशा मना जोगा ।

डोरल्याचा साज वर सराला जागा नाही

कंताच्या जिवावर वाट पाण्याची ठावं नाही ।

म्हायारची वाट मला दिसली सपाट

बयाचा माझ्या बाळ मला दिसतो पोपट ।

दुरुन दिसतं माझं माहेर सुंदर

दरवाज्याच्या तोंडी रामसीताचं मंदीर ।

दुरुन दिसतं माझं माहेर नेटकं

दरवाज्याच्या तोंडी रामसीताची बैठक ।

साखळ्याचा पाय पडला चिखलात

माझ्या ग बापाजींनी मला दिली गोकूळात ।

साकळ्याचा पाय पडला सावलीत

माझ्या ग बापाजींनी मला दिली म्हाऊलीत ।

साकळयाचा पाय हळूं टाकावा मालनी

कंत वळखितो चालनी ।

बंदूजी पावना मला आल्याला ठावं नाही

शेला वलनी झोकं खाई ।

बंदूजी पावना मला आल्याला कसं कळं

दारी लिंबाचा रस गळ ।

शेजी तू आईबाई दे ग उसनं वेलदोडं

बंदूजीची माज्या बाई उभी मोटार वाडयापुढं ।

शेजी तू आईबाई दे ग उसन्या मला कळ्या

बंदूंसंगं मैतबीराच्या होळ्या ।

शेजी तू आई बाई दे ग उसनी मला सोजी

बया पावनी आली माजी ।

पावना आला म्हणूं बया मालनीचा भाऊ

मामा उपाशी नका जाऊं देते तांदळा एक घावूं ।

बसाई बसकर सोप्यां टाकिती चांदबा

बस बयाच्या बंदवा ।

समोरल्या सोप्यां ज्यान टाकिती आकडयाचं

बंदूजीचं येनं अवचित फाकडयाचं ।

बसाई बसकर जेन टाकिती बारा तेरा

बंदूराया माजा लाल गादीचा धनी न्यारा ।

भैना सासर्‍याला जाती दोघ बंदूजी दुईकडं

माझे तू भैनाबाई मंधी चांदणी तुझं घोडं ।

बंधूजी पावईना जाऊ गुजरी तुझा माझा

बंधू हौशाच्या भोजनाला भात पुलावा करुं ताजा ।

बंधूजी पावईना काय करूं मी चवीदार

बंधू हौशाचा जेवनाला करती जिलेबी सुकमार ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP