TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २४

ओवीगीते - संग्रह २४

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

धाकलं माझं घर माझं आंगण फेराचं

बाळ खेळतं थोराचं ।

धाकलं माझं घर हंडयाभांडयाचा पसाबीरा

धनी हावशाला किती सांगू वाडा बांदावा दुसईरा ।

वाटबीवैला वाडा वाडा कुणाचा टोलेजंग

कांत माझ्या ग हावशाचा पुढं गिलावा मागं रंग ।

वाटबीबईला वाडा वाडा कुणा या वाण्यायाचा

कांता माझ्या त्या हावशाचा दारी हावद पाण्यायाचा ।

जाऊ गुजरीचं बाळ माझ्या बाळाच्या बरोबरी

मी कां सायास उतरीती एक लिंबू दोघावरी ।

साखबीरचं लाडू दुधा तुपाच्या संगतीचं

माझं ते बाळराज हैती राजाच्या पंगतीचं ।

साखबीरचं लाडू देती बांदून थोडं थोडं

बाळा माझ्याला किती सांगू भूक लागल तीत सोड ।

किती मी हाका मारू गावंदरीच्या नांगर्‍याला

बंदू माझ्या त्या हावशाला माझ्या संभाळ आगल्याला ।

बारा बैलाचा नांगूइर त्योका हारीबीटीच्या पडी

बंदू माझ्या त्या हावशाचं बारा बईल घरच गडी ।

बारा बैलाचा नांगूईर ताशी लावूनी उभा केला

माझा बंदूजी हावईशा माझा आगल्या कुठं गेला ।

बंदू माझ्यानं केली हौस बारा बैलांच्या जीवावरी

माझ्या त्या बंदूजीनं ऐन लावली धांववरी ।

माझ्या बंदूच्या पाटावरी नार सुंदर धुनं धुती

बंदू माज्याला विचारती तुला हाईत बहिनी किती

बंदूजी माझा बोल भैन एकली भागीरती ।

वाटबीवईला मळा आल्यागेल्याला मुकत्यार

बंदू माज्याला म्हणीत्यात धनी शेताचा समींदर ।

दोपाबीईर झाली माझ्या कुणब्याच्या जेवणाला

बदू माझ्या त्या हावशाचं शेत शिवच्या लवणाला ।

जेवबीनाची पाटी माझ्या कपाळी आला घाम

बंदू माझ्या त्या हावशाची शेत शिवची हाईती लांब ।

सासर्‍याला जाती भैना संगं दुरडी साखरची

लेक न्हवं ती नाचार्‍याची सून हाई ती पाटलाची ।

बया मालन विचारती बाई सासरवस कसा

बया मालनी किती सांगूं चित्ताकाचा फासा काढूनी दावूं कसा ।

सोनंबी झालं सस्त ह्या का चांदीचा काय भाव

माझं ते बाळराज कडी तोडयाचं बाजीराव ।

सोनंबी झालं सस्त चांदी कशानं म्हागयीली

कडी नी करदोर्‍याची मला आगत लागयीली ।

हावस मला मोठी तान्या बाळाच्या टकूच्याची

पिंपळ पानासाठी नथ मोडीते दीडशाची ।

अंगडया टोपडयानं पेठ करिती झगा झगा

माझा ग बाळ तान माझा चिल्लाळ टोपीजोगा ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:52.1600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कंजुष

 • वि. कद्रु ; कवडीचुंबक ; कृपण ; चिक्कू . ( सं . कर्ण + जुष् ; प्रा . कण्णझूस ?; हिं . कंजूस = कानांतील मळ खाणारा , कृपण ) 
RANDOM WORD

Did you know?

How to make essay about Hindu culture
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.