TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह १०

ओवीगीते - संग्रह १०

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

माहेरपणाची हौस पिता केल्याविना राहिना

राम अवतारी डोरल्याचा साज खिशात मावना ।

सासू सासर्‍याची सेवा करावी आदरानं

माझी तू बाळाबाई पाय पुसावं पदरानं ।

सासू नी सासयिरा माझ्या सोन्याच्या आडभिंती

सयाला सांगू किती त्यांचा आधार मला अती ।

सासू नी सासरा दोन्ही देवाच्या मूरती

दीर दाजीबा गणपति जाऊ गुजरी पारबती

नंद कामिनी भागिरथी रामचंदर माझा पति ।

बुंदी परायास मला बेसन लाग ग्वाड

सासर्‍या परायास मला माहेराच भारी याड ।

बाळ सासर्‍याला जाती तिच्या वटीला पिवळी पानं

हवशा बंधुजी संग मुरळी पैलवान ।

ज्या गावात आईबाप, त्या गावाच मला याड

सयानू किती सांगू तिथं गारव्याचं झाड ।

लगीनचिठ्‌ठी लिवा, माझ्या त्या माहेराला

बया मालनीची मुंगी पैठण आहेराला ।

लगीनचिठ्‌ठी लिवा सासूबाई कागदात

बया मालन बोलयीती लेक जावई मांडवात ।

जीवाला भारी जड कोर्‍या कागदावरी लिवा

बया माझ्या मालनीला आधी जेऊद्या मग दावा ।

जीवाला भारी जड बया मालनी कसं कळ

दारी लिंबूनी रस गळ ।

माहेराचं गावात ईसरली सया

पोटीच्या पुतराला म्हणीती बाबा बया ।

जोडव्याची चांदी झिजली झरा झरा

दीर दाजीबा किती सांगू अंगणी भुई करा ।

माहेरची पिकं शेतसरी जन बोलता राहीना

माझ्या त्या बंधूजीचा गूळ वाफ्यात माईना ।

जुंधळ्याची रास रास तिवडया बसविली

सासर मामंजींनी तिला पासुडी नेसविली ।

जुंधळ्याचा गाडा गाडा येशीत दाटला

दीर दाजीबा कंतानी दंडा भुजांनी रेटीला ।

काळ्या ग वावरात मेंढयाबायांची दावन

सासर मामंजींची नव्या ऊसाची लावण ।

बंधु सासर्‍याला गेलं मेहुणी म्हणती र्‍हावा र्‍हावा

बंधूजी बोलत्याती जातो बहिण्याच्या गावा ।

ऊंच ऊंच चोळ्या माझ्या वलनी झाल्या जुन्या

बयाच्या माझ्या बाळा दोन दिवाळ्या गेल्या सुन्या ।

डाळी डोरलं मधी सरी मला हावस सरायाची

मामंजीची सून हायी मीच ग तालीवाराची ।

अंगणात उभी कोण जरीच्या पातळाची

पित्या माझ्या दौलताची सून लाडकी सासर्‍याची ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:22:30.0200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

purposefully

  • हेतुपूर्वक 
  • हेतुपुरस्सर 
  • हेतुपुरस्पर, हेतुपूर्वक 
  • knowingly 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.