TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ३५

ओवीगीते - संग्रह ३५

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


ओवीगीते

भावज गुजरीचं तिचं बोलणं अहंकाराचं

चतुर बंधुजीचं गोड बोलणं शंकराचं ।

पंचविसाची नोट माझ्या तबकी टाकीली

भावज गुजरी ती ग रागानं उठली ।

धाकटया दिरांची मर्जी राखूं मी कोठवरी

दीर माझे की चंदन उभे दाटून वाटेवरी ।

धाकटे माझे दीर सासूबाईंचं शेंडफळ

माझ्या चुडयाचं पाठबळ ।

काळ्या ग घोंगडीला तिला रवड चवधारी

दीर माझ्या की चंदनाला नाव सोबतं कारभारी ।

तिघं माझं दीर दैवावाचून कुठले

सासू माझ्या ग मालनीला चाफे जाईला फुटले ।

हौस मला मोठी दिरा भावात नांदायाची

माडी कौलारी बांधायाची ।

चंदन मैलगिरी नाव माझ्या बापाईचं

बया माझ्या माऊलीचं गोड दुध नारळीचं ।

भूक लागली पोटाला भूक बाई दम धर

पाण्याच्या वाटेवर माझ्या माऊलीचं घर ।

पाऊस पाणी नाही गंगा कोणीकडूनी आली

माझ्या ग माऊलीची अवचीत भेट झाली ।

भरतार नव्हे बाई ती ग आंब्याची सावली

नाही आठवू दिली परदेशाला माऊली ।

देवाला मागते पाच पुत्रांची पंगत

जन्माला जावी माझ्या चुडया हौशाची संगत ।

अहेव मेली नार कंतानं झाडली घोंगडी

बोलतो भाऊराया बाळं पडली उघडी ।

देवानं दिलं आगल्या नांगल्या दोघ ल्याक

तान्ही तू मैना माझी न्याहारी न्यायला रंभा लेक ।

अंगणी ग माझ्या आला मोगरा बहरा

सुकल्या फूलमाळा सई येईना माहेरा ।

भरल्या बाजारात चोळ्या फुलांच्या वलनी

सयाला किती सांगू बया घेतीया मालनी ।

बंधु यीवाई करु गेली दीर दाजीबा बोलेनात

सोयरे आम्हांला तोलेनात ।

बंधुजी पाहुणा शेजी सांगत आली पुढं

चतुर माझा बंधु सरजा हासत जोतं चढं ।

बंधुजी पाहुणा शेजी पुसती खचोटीनं

आधी येऊ द्या बंधवाला मंग सांगेन निचिंतीनं ।

बंधुजी पाहुणा मी ग ओळखीला माळावरी

सोन्याची छतरी बाई माझीया बाळावरी ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:23:08.9970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मोइन

 • स्त्री. वर्षाची नेमणूक ; ठराव ; नियम ; पगार ; तैनात ; कायम नेमणूक . इतकियावर मोईन प्रमाणें चौकीपहारा न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा . - मराआ १४ . [ अर . मुअय्यन ] 
 • ०जाबता पु. 
 • नेमणूक होतांना किंवा पगार निश्चित करतांना लिहून घेतलेला लेख : पगारपत्रक ; नोकर लोकांचें पत्रक . 
 • कराराचें पत्रक ; वांटणीपत्रक . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.