मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ५१ ते ६० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे ५१ ते ६० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पदे ५१ ते ६० Translation - भाषांतर पद ५१ वें घनाक्षरी ( काव्यपाठकी ) पढोनी छंदोरत्नाकार । जाणे शिखरिणी सधर । मुखरणिचा अधर । चुंबूं लागे नेटका ॥१॥काव्यपाठक कुशल । मुग्धांगनेसी रुसेल । नृत्यांगनेसी पुसेल । कांहीं देउनी टका ॥२॥शकुंतला प्रहसन । याचें लागलें व्यसन । नाटकाचें अभ्यासन । करूं जाणे चेटका ॥३॥इतएं पढुनी चतुर । पंडीत जाला कामातुर । मध्वनाथा आहे दूर । जीवन्मुक्त तोटका ॥४॥पद ५२ वें घनाक्षरी ( पंडित ) गेला सक्षेपें काशीस । राहोनिया दोन दीस । कांहींयेक वादार्थ दहा वीस । पाठ करुनी निघाला ॥१॥देशा आलासे पंडीत । गर्वताठा अखंडीत । भाग्यवंतासी धुंडीत । त्याचे घरीं पागिला ॥२॥करी अर्थाचा अनर्थ । जन्म गमांविला व्यर्थ । आपुल्याहुनी जे समर्थ । छळूं यास लागला ॥३॥मध्वनाथ म्हणे फार । पंडीत हे अनिवार । आपला पोसितो परिवार । प्रतिग्रहीं चांगला ॥४॥पद ५३ वें घनाक्षरी ( पुराणीक ) गीता भारत रामायण । केलें त्यांचें पारायण । कळला नाहीं नारायण स्वामी कोण कायसा ॥१॥अवींस देखुनी कावकाव । तैसा दावी हावभाव। भोगी अमंगळ ठाव । जैसें ध्यान वायसा ॥२॥चहूं आश्रमा अवतंस । करुनी संसाराचा ध्वंस । ते येक धन्य परमहंस । सेविती जे पायसा ॥३॥मध्वनाथी प्रमाणीक । श्रीशुकयोगी पुराणीक । वरकड आहेत जे आणीक । त्यांची व्यर्थ वयसा ॥४॥पद ५४ वें घनाक्षरी ( नैयायिक ) नैयायिकाचा अभिमान । देवाविषयीं अनुमान । ऐसा वादी बैमान । नाहीं दुसरा देखिला ॥१॥पदार्थाचें विचारण । शोधी घटाचें कारण । अंतर्यामीं नारायण । जैसा तैसा लेखिला ॥२॥धुरें भरले लोचन । न करी आपलें मोचन । तर्कवादें त्रिलोचन । पर्वतावरी टाकिला ॥३॥ऐसा पंडीत मशक । कोण मानी आवश्यक । जीवन्मुक्तिविनाशक । मध्वनाथीं ठोकिला ॥४॥पद ५५ वें घनाक्षरी ( मीमांसक ) कर्मकुशल मीमांसक । स्वर्गांगनाउपासक । साधन संपत्तिनाशक शुद्ध निरीश्वरवादी ॥१॥आंभोनी ज्योतिष्टोम । ऋत्विज करिताती होम । शेवटीं प्राप्त नाहीं रोम । विधिनिषेध बाधी ॥२॥देव करिताती विघ्न । यज्ञमार्ग केला भग्न । भवसागरीं निमग्न । जाले आपण अपराधी ॥३॥त्याचें पाहतांचि मुख । होतें माझ्या मनास दुःख । निवृत्तींत आहे सुख । मध्वनाथ आराधी ॥४॥पद ५६ वें घनाक्षरी ( वेदांती ) काय पढोनि वेदांत । म्हणे कळला सिद्धांत । केला विषया निभ्रांत । नेणें अद्यापि अर्थ ॥१॥ऐसा वेदांती अभाग्य । नाहीं विषयीं वैराग्य । देशामध्यें जाला श्लाघ्य । केलें साधन व्यर्थ ॥२॥कैचा जीवशिवासि भेद । यासी प्रमाण आहे वेद । आपण करितोहे खेद । केवढा पहा अनर्थ ॥३॥ऐसे वेदांती उदंड । घेऊनि फिरताती दंड । त्यांसी दूषितो अखंड । मध्वनाथ समर्थ ॥४॥पद ५७ वें घनाक्षरी ( संन्यासी ) काया विटंबुनी व्यर्थ । केवढा केलाहे अनर्थ । स्वामी असोनि समर्थ । न पुसे शोध आपला ॥१॥घेऊनि दंडकमंडल । भिक्षेसाठींच हिंडेल । भाग्यवंताशीं भांडेल । विषयामध्यें रापला ॥२॥कैचें इंद्रियां दंडण । वरवर करितो मुंडण । न करी अविद्याखंडन । गृहस्थावरी कोपला ॥३॥म्हणवी संन्यासी आपण । घेतो लोकांचे अवगुण । मध्वनाथ सांगे खूण । परमहंस लोपला ॥४॥पद ५८ वें घनाक्षरी ( ज्योतिषी ) पढोनि मुहूर्तचिंतामण । जाला ज्योतिषी ब्राह्मण । सर्वकाळ राशींत मन । पंचांगासी वागवी ॥१॥जाणे प्राक्तन ग्रहबळ । पुढें वर्णीं वर्षफळ । ऐसा जोशी अनर्गळ । व्यतीपातीं नागवी ॥२॥देखुनि सभाग्य मनुष्य । त्याचें वर्णितो भविष्य । न कळे आपलें आयुष्य । निपुण ग्रहलाघवी ॥३॥पाहे गुरुचा अतिचार । आपण करी वेडे चार । मध्वनाथ म्हणे सार । प्रीति नाहीं राघवीं ॥४॥पद ५९ वें घनाक्षरी ( वैद्य )पढोनिया वाग्भट । जाला वैद्य हा उद्भट । द्रव्य करुनिया गट । करी पोटाची यात्रा ॥१॥उगाच पाहातसे हात । म्हणे तुमची जाते धात । कांहीं आहे पित्तवात । नांवें घेतोहे सत्रा ॥२॥कोण्हा गोक्षुरुचा पाक । कोण्हास चुलीची ते राख । रोग्यापाशीं मारी हांक । ताम्रभस्माची मात्रा ॥३॥ऐसे वैद्य हे समस्त । जे ते आपल्या ठायीं मस्त । मध्वनाथासी नेमस्त । कोण्ही नेदीचइ मात्रा ॥४॥पद ६० वें घनाक्षरी आयका कळयुगींची रीत । अवघें जालें विपरीत । कोठें उरली नाहीं नीत । धर्ममार्ग मोडला ॥१॥चहूंकडे ब्रह्मज्ञान । कोण्ही न करी संध्यास्नान । मनीं विषयाचें ध्यान । दुर्जनसंग जोडला ॥२॥जिकडे तिकडे वरपंग । कोठें नाहीं रसर्म्ग । उरला नाहीं संतसंग । वेदवाद उडाला ॥३॥मध्वनाथ म्हणे लोक । नम विषयासी वोक । अंतीं करील हा शोक । भवपुरीं बुडाला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP