मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद ९१ ते १०० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीरामाचीं पदें - पद ९१ ते १०० भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पद ९१ ते १०० Translation - भाषांतर अभंग ९१ वाशुकसरिका डोलती ॥ नाम रामाचें बोलती ॥१॥त्यांचा न दिसे उद्धार ॥ नामें मुक्तीचा उद्धार ॥२॥मुक्ति होणें नाहीं नेमें ॥ नामें आळवावें प्रेमें ॥३॥माझ्या अनुभवा आलें ॥ चित्त नाहीं राम जालें ॥४॥राम नाम जपे सती ॥ तीसी काय होते गती ॥५॥तिचा जीव प्राणनाथ ॥ त्याचा धरूनी गेली हात ॥६॥पाहाती कौतुक जे लोक ॥ तेही करिती तिचा शोक ॥७॥म्हणती धन्य पतिव्रता ॥ जैसी रामाची जे सीता ॥८॥त्यासी न येती विमानें ॥ गेलें नामाचें महिमान ॥९॥उत्तरेचा जो प्रणाम ॥ त्यासी म्हणती रामराम ॥१०॥तेही कांहो नुद्धरती ॥ सांगा खरें रघुपती ॥११॥मध्वनाथ म्हणे रामा ॥ तुझ्या स्मरेना मी नामा ॥१२॥अभंग ९२ वातुम्हीं उद्धरिला गांव ॥ मुक्तत्रिभुवन नांव ॥१॥हाही अनर्थ आघवा ॥ कळूं आला जी राघवा ॥२॥नामें तारिली गणिका ॥ गोष्टी सांगाव्या आणिका ॥३॥अजामेळ पुत्रनांवें ॥ स्मरतां वैकुंठासी जावें ॥४॥याही गोष्टीचें हीनत्व ॥ गेलें नामाचें महत्त्व ॥५॥येक नांव दोघांजणा ॥ पाचारितां तर्के शहाणा ॥६॥हें तों तुम्हांसी कळेना ॥ बुद्धियोगासी मिळेना ॥७॥स्मरतां वज्री रवि फणी ॥ धाऊनि यावें तिघांजणीं ॥८॥हें तों न पडे उचितांत ॥ गोष्टी समजावी चित्तांत ॥९॥आम्ही जाणुनी म्हणतों ॥ भवचक्रांत शीणतों ॥१०॥ऐसें तुम्हां न पाहिजे ॥ धरुनि अबोला राहिजे ॥११॥परिसा देवाजी सर्वज्ञा ॥ येईल घडोनी अवज्ञा ॥१२॥जीवेंभावें जगन्नाथा ॥ द्यावें अज्ञान माझ्या माथां ॥१३॥तुम्हीं नामरूपातीत ॥ तेथें कैचें जी पतीत ॥१४॥मध्वनाथा नलगे मुक्ति ॥ द्यावी सद्गुरुची भक्ति ॥१५॥अभंग ९३ वाचित्रकार लिहितो चित्रें । नाना अवतार चरित्रें ॥१॥त्यासि कांहो नव्हे गति । सत्य सांगा रघुपति ॥२॥स्मरण मानसाचा धर्म । चितार्याचें शुद्ध कर्म ॥३॥नामस्मरण ऐलिकडे । सोपें सुगम पक्षी पढे ॥४॥आम्ही करितों वर्णोच्चार । नेणों प्रेमाचा विचार ॥५॥नामस्मरणाची किल्ली । नाहीं माझ्या हातीं आली ॥६॥नुघडे मुक्तीचें कवाड । फिरतों मायेच्या पडद्याघाड ॥७॥मध्वनाथ म्हणे देवा । न कळे प्राक्तनाचा ठेवा ॥८॥अभंग ९४ वाअनंत पातकी मोडुनि घडिले । बाहेर दवडिलों प्रायश्चित्तीं ॥१॥माझ्या पदरीं पुण्य असतें उत्तम । तरि मी तुझें नाम आठवितों ॥२॥रामनामीं रत तो नर विरक्त । म्हणती जीवन्मुक्त संत त्यासी ॥३॥नामासि विन्मुख तो महापातकी । विश्वासघातकी अमंगळ ॥४॥माझ्या पातकाचा मातंगसंभार । करूं त्याचा संहार नामसिंह ॥५॥मदोन्मत्त गज वैरिया पाचारी । मग काय संहारी सिंह त्यासी ॥६॥जो ज्या स्वभाव तो नव्हे अन्यथा । गुरुमुखें मध्वनाथा कळलें ऐसें ॥७॥अभंग ९५ वानाममहिमा लटिका म्हणे । त्याच्या पूर्वजांसी उणें ॥१॥जेथें उच्चारिती नाम । तेथें प्रगटे श्रीराम ॥२॥धन्य धन्य साधु संत । ज्यांसी भेटे भगवंत ॥३॥नामासरसीं वाजे टाळी । होते पातकांची होळी ॥४॥एका पायाळाच्या गुणें । दिसतीं पाताळींचीं धनें ॥५॥तैसें सद्गुरुच्या संगें । निवतीं साधकांचीं अंगें ॥६॥नाथ म्हणें अनुतपें । नाम स्मरतां जातीं पापें ॥७॥अभंग ९६ वादाता सकळांचा म्हणवितो आपणां । सदावर्ती जाणा दुकळांत ॥१॥दारापासी नाहीं कोणासी आडकाठी । आपल्या हातें वांटी अन्नोदक ॥२॥तेथें येक आलें भुकेलें भिकारी । अधीर हांका मारी पोटासाठीं ॥३॥सांडून सर्व काम आधीं द्यावें त्यासी । दीन उपवासी चरफडी तें ॥४॥न देतां तयासे करील अमर्यादा । धाल्या स्तुतिवादा करील ते ॥५॥मध्वनाथ म्हणे हेचि माझी दशा । तुम्हांसी जगदीशा कळों द्यावी ॥६॥अभंग ९७ वाजरी महापुरीं बुडतां चांडाळ । देखुनि दयाळ उडी घाली ॥१॥लाउनियां कासें देउनियां धीरा । नेतो पलतीरा दीनबंधु ॥२॥तैसें तुझें नाम तारक उदार । तरी माझा उद्धार करूं देवा ॥३॥परि मी तयाचें करीना स्मरण । आलिया मरण एक वेळे ॥४॥मध्वनाथ धरुनिया माझ्या कंठा । मज ने वैकुंठा बलात्कारें ॥५॥पद ९८ वेंरामउपासक धन्य सजणी रामउपासक धन्य ॥ध्रु०॥पुनरपि जननीजठरीं रिघे ना । प्राशन न करी स्तन्य ॥१॥तन मन धन जन तृणवत मानी । शरण गुरूसि अनन्य ॥२॥नाम जपे निज पुण्यतपें करि । मारि यमाचें सैन्य ॥३॥ऐशा नराच्या दर्शनमात्रें । गेलें दिगंता दैन्य ॥४॥मध्वमुनीश्वर म्हणतो त्याचें । काय वदों सौजन्य ॥५॥पद ९९ वें पहा रे जन हो रमणीय रूप रामाचें ॥ध्रु०॥दुस्तर तरले प्रस्तर भारी । सामर्थ्य हें नामाचें ॥१॥किंकर होउनि शंकर जपतो । निःकामाच्या कामाचें ॥२॥नारद तुंबर सादर गाती । कीर्तनछंद सामाचें ॥३॥मध्वमुनीश्वर पूजुनि मागे । दास्य मेघश्यामाचें ॥४॥पद १०० वें जन मूढ तूं भज राम रे ॥ मानवी तनु पावलासि विमळ हे अभिराम रे ॥ध्रु०॥नयन झांकुनी काय घोरसी स्मरुनी कामिनीकाम ॥ उठुनी सत्वर होईं सावध विझवी जळतें धाम रे ॥१॥जप सदा रघुनाथजीचें पतितपावन नाम ॥ सगुण सुंदर मध्वनाथा ध्याई जळधरश्याम रे ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP