मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ४१ ते ५० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे ४१ ते ५० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे ४१ ते ५० Translation - भाषांतर पद ४१ वें कान्हो हुंबळी रे कान्हो तूं बळी रे । तुझी मुरली ऐकून यमुना तुंबली रे ॥ध्रु०॥भक्तिरसें वृत्ति जेव्हां तिंबली रे । तेव्हां तुझी मूर्ति हृदयीं बिंबली रे ॥१॥पिंड ब्रह्मांडाची उघडुनी संबळी रे । देव न पूजी त्याची जननी चुंबळी रे ॥२॥विषयतृष्णासर्पिण ज्याला झोंबली रे । गरुडध्वजा त्याची माय बोंबली रे ॥३॥प्रपंचाची अवघी गोडी आंबली रे । मध्वनाथा नलगे जड कांबळी रे ॥४॥पद ४२ वें त्यासी कांरे विसरसी शेवटीं मनुजारे ॥ध्रु०॥ गोकुळांत प्रगटला । नंद गोपासाठीं ॥१॥कल्पद्रुमातळीं खेळे । कालिंदीचे कांठीं ॥२॥निरालंब तो हा उभा । टेकुनियां काठी ॥३॥परब्रह्म व्यापक हा । धांवे गाईपाठीं ॥४॥गोपाळांच्या सोडितोहे । सिदोर्यांच्या गांठी ॥५॥येकवट करुनियां । दहीकाला वांटी ॥६॥मध्वनाथ नित्य तृप्त । उष्टे हात चाटी ॥७॥पद ४३ वें ( राग कल्याण )सावळा गे रमाकांत सनातन । परब्रह्म परात्पर पद्मनाह पुरातन ॥ध्रु॥कृष्ण विष्णु जनार्दन करीं धरी गोवर्धन । कालियमर्दन निजानंदवर्धन ॥१॥त्रिविक्रम वामन पतितपावन । पंकजलोचन संकत मोचन ॥२॥सनकसनंदन ज्यास करिती वंदन । नंदाचा जो नंदन तोडी भवबंधन ॥३॥करी दुष्ट दैत्यघात त्याची काय सांगूं मात । जोडुनिया दोन्ही हात नाथ करी प्रणिपात ॥४॥पद ४४ वें कानड्या कान्हो ठकड्या वौंशीवाल्या ॥ध्रु०॥येकीला रंजवणें । दुजीला गांजणें । यांही गोष्टी तुझ्या वांट्या आल्या ॥१॥विरहें व्याकुळ जाल्या । गौळणी वायां गेल्या । धन्य त्या अधरामृत प्याल्या ॥२॥गुरुसी जाउनि शरण । हृदयीं धरिले चरण । नयनीं ज्ञानांजन ल्याल्या ॥३॥तनधन विसरल्या । निजमनें अनुसरल्या । नाहीं या लौकिकासी भ्याल्या ॥४॥मध्वनाथास्वामी । तुझिया दासी आम्हे । जीवनमुक्त तेणें जाल्या ॥५॥पद ४५ वें गोविंदा कृष्णा गोपवेषा ॥ध्रु०॥यात्रिक घालिती घृतअवदाना । तव अभिधाना देउनी प्रेषा ॥१॥यज्ञेश्वर तो प्रगट तूं होसी । आरूढ होउनियां मेषा ॥२॥कंस केशी अघबक धेनुक । उद्धरिले ते करितां द्वेषा ॥३॥गोकुळपाळक गोवळबाळक । न कळे तुझा महिमा शेषा ॥४॥मध्वमुनीश्वर पुराणपुरुषा । निर्गुणरूपा निर्विशेषा ॥५॥पद ४६ वें गोकुळपाळक चाळक बालक नंदाचा ॥ध्रु०॥श्यामळ कोमळ वोतीव पुतळा केवळ सच्चिदानंदाचा ॥१॥कुंजवनीं मृदुमंजुल पावा । वाजवी मोहनछंदाचा ॥२॥मध्वमुनीश्वर साधक म्हणतो । छेदक जो भवबंधाचा ॥३॥पद ४७ वें गोपाळा वारी संसारमायाजाळा । गोविंदराया झडकरी निरसी या कळिकाळा ॥ध्रु०॥कामलोभें भालल्या तुज गोपीबाळा । त्या मुक्त केल्या नेल्या निजधामा वेल्हाळा ॥१॥वैरभावें स्वरूपीं मेळविलें त्या शिशुपाला । ध्रुवलेकराला अढळपदीं बैसविसी कृपाळा ॥२॥तां उद्धरिला पापी अजामीळ जातिनिराळा । देखुनि ज्याला यमदूतांचा संघ पळाला ॥३॥तूं मायबापा म्हणविसी या जगीं लेकुरवाळा । श्रीमध्वनाथा पाजी नामसुधासुरसाला ॥४॥पद ४८ वें आणा वो वृंदावना जाउनिया यादवराणा ॥ध्रु०॥माझा तळमळी जीव त्यास कैसी न ये कींव । ज्याच्या पायां सदाशिव । भावें वंदितोहे जाणा ॥१॥दुःख आदळतां आंगीं । क्षणक्षणां होतें जागी । मध्वनाथस्वामीलागीं । वोवाळीन पंचप्राणा ॥२॥पद ४९ वें काय करूं सये आतां जीव वेडा जाला ॥ध्रु०॥लौकिकाची लज्जा गेली । ऐसी करणी कृष्णें केली । अधरामतुरस प्याला जीव वेढा जाला ॥१॥शरीराचें भान नाहीं । ऐसी दशा जाली पाही । मदनमोहन दावा वंशीवाला ॥२॥मध्वमुनीश्वरहृदयविहारी । तोचि विरहबाधा वारी । तिळभरि नाहीं माझी दया त्याला ॥३॥पद ५० वें ( राग सोरट ) मोहन हा मतवाला भोंदु ऐचा कोठुनि आला वो ॥ध्रु०॥कुंजवनीं मज मोहित करुनी अधरामतरस प्याला वो ॥ हृदयग्रंथिस भेदुनि भोगितो धीट मवास हा जाला वो ॥१॥मध्वमुनीश्वरवरद विनोदी नाहीं कोण्हां भ्याला वो ॥ यमुनातटीं नट वंशीं वटावळीं अघटित करितो ख्याला वो ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP