मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १११ ते १२० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १११ ते १२० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १११ ते १२० Translation - भाषांतर पद १११ वें परिसा कळयुगीचें पाखंड । निंदाद्वेष अखंड । कपटी चेटकी कळभंड । स्थापिती अपुलें बंड ॥१॥घाणा गाळीतो उसाला । परि तो नेणें रसाला । गोचिड टाकोनि दुधाला । सेवी अशुद्धाला ॥२॥चोरा चांदणें साहेना । उलूक रवी पाहीना । पापी देवाला बाहीना । कीर्तनरसीं राहीना ॥३॥असतां कमळाजवळीं । दर्दुर मास्या कवळीं । ऐसें जयाच्या कपाळीं । कोण तयाचे टाळीं ॥४॥ऐसें ऐकुनि दृष्टांत । दुष्ट जनाचा अंत । तयास भेटेना भगवंत । मध्वनाथ महंत ॥५॥अभंग ११२ वा कळयुगींचें ब्रह्मज्ञान । कोण्ही न करी संध्यास्नान ॥१॥कर्मकांड उपासना । हे तों कोठेंही दिसेना ॥२॥शैव शाक्त आगमी । म्हणती जीवन्मुक्त आम्ही ॥३॥धूर्त तार्किक उदंड । ज्ञान बोलती प्रचंड ॥४॥ज्ञान बोलावें तोंडें । अनुभव नसतां कानकोंडें ॥५॥ऐसे ज्ञानी अनेक । गेला नाहीं अविवेक ॥६॥हे तो ज्ञानी कोण मानी । स्वसंप्रदायीं अभिमानी ॥७॥त्यासी न करावी चावटी । नाथ म्हणे ते कपटी ॥८॥जीवन्मुक्ताप्रमाणें । सद्गुरु मध्वनाथ जाणे ॥९॥पद ११३ वें देवा केलें फार बरें । रघुपति केलें फार बरें ॥ध्रु०॥गोगलगाय गरीब तयाला । तोडिती उधया येकसरें ॥१॥येक मृगीचें पाडस त्याला । फाडिती श्वानें प्रेमभरें ॥२॥जेथें सुखरतिलेश मिळेना । दाटुनि फिरविसी तेचि घरें ॥३॥जेथें वृश्चिक तक्षक विषधर । तेथें निजविसी तूं स्वकरें ॥४॥भूतदया तुज तिळभर नाहीं । परदुःख सीतळ हेंचि खरें ॥५॥मध्वमुनीश्वर म्हणतों पळभरि । घेई जीवदशा निकुरें ॥६॥अभंग ११४ वा येकां जना जग दीसे । येका भासे जगदीश ॥१॥येका बाधक नवदाहा । येका बाधक न वदा हा ॥२॥येक विषयविश मागे । येक शमशमविष मागे ॥३॥येक नुमजे अधराशि । येक समजे स्वघरासि ॥४॥येका जीवीं वेदना गे । येका स्तवी वदना गे ॥५॥येक नमुजे यमकाळा । येक समजे यमकाला ॥६॥येकमेकां ऐसा भेद । स्थापी स्वामी माझा भेद ॥७॥येक मध्वनाथ न भी । येक हरपुनि गेला नभीं ॥८॥पद ११५ वें वैराग्यहीन संन्यास काय करावा ॥ध्रु०॥अज्ञान मूळ दृढ । वेदांतशास्त्रीं मूढ । उगीच चरफड । बाहेर ब्रीदमिरवा ॥१॥भगवें माजा सगुडी । मिष्टान्नरस धुंडी । संतास निंदी दंडी । हातीं रंगीत गरवा ॥२॥दंडास बांधी मुद्रा । अखंड साधी निद्रा । नेणें समाधिमुद्रा । चित्तांत पूर्ण हिरवा ॥३॥पद ११६ वें मी येक ज्ञानी नेटका । ऐसें म्हणे तयाचा गुरु लटका ॥ध्रु०॥विद्वांस वयवृद्ध । सर्वांत मीच सिद्ध । आणिक मानी बद्ध । त्याचीच नव्हे सुटिका ॥१॥तो मुक्त जीव नव्हे । ऐसी जयासि सवे । तयास कोण सिवे । जैसा कलश फुटका ॥२॥ऐशांसि मध्वनाथ । जोडुनि दोन्ही हात । करुनि प्रणिपात । लावितसे चुटका ॥३॥अभंग ११७ वा मनामध्यें पाहे वनीं काय आहे । जनामधें राहे सुखरूप ॥१॥करिसी जे उपाय होते ते अपाय । सद्गुरुचे पाय चिंती सदा ॥२॥घेईं उपदेश नको फिरूं देश । आहे अनिर्देश वेगळाचि ॥३॥स्वामी मध्वनाथ शिरीं ठेविल हात । होसिल कृतार्थ तेचि काळीं ॥४॥अभंग ११८ वा तुझा दास जाय दूर देशावरा । ऐसे विश्वंभरा करूं नको ॥१॥तुझा दास हात आणिखां पसरी । ऐसें तूं श्रीहरि करूं नको ॥२॥तुझ्या दासालागीं संसाराची चिंता । ऐसें रमाकांता करूं नको ॥३॥तुझा दास वर्णी मानवाची कीर्ति । ऐसें कृपामृर्ति करूं नको ॥४॥मध्वनाथ म्हणे भूपतिच्या बाळा । पितळ्याचा वाळा दूषण तें ॥५॥अभंग ११९ वा अजगर काय जाय देशावरा । त्यासि विश्वंभरा कोण पोसी ॥१॥जळ उबगूनी म्हणे जळचरा । तुम्ही पोट भरा वनामध्यें ॥२॥पाखांवीण लोला आहे जें पाखरुं । त्याचा आंगिकारु कोण करी ॥३॥मायबाप त्यासि आणुनि देती चारा । त्याच्या समाचारा दोघे घेती ॥४॥तान्ह्यापरिस तान्हें गर्भींचें लेंकरूं । उदीम व्यवहारू काय जाणे ॥५॥मध्वनाथ म्हणे उंबरांतील जीव । जीव जीवा कींव काय भाके ॥६॥अभंग १२० वा नको पडूं मना कवित्वाचे भरीं । रामकृष्णहरि गाई गीत ॥१॥व्यर्थ कवित्वाचा काढिशी कसिदा । छंदबंद सदा विचारुनि ॥२॥येणें फार तुज वाटतें श्लाघ्यता । मिरविसीं योग्यता सभेमध्यें ॥३॥मध्वनाथ म्हणे कल्पनेच्या अंतीं । होईल विश्रांती कवीश्वरा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP