मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ९१ ते १०० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे ९१ ते १०० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे ९१ ते १०० Translation - भाषांतर अभंग ९१ वा सविकार ज्याची दृष्टी । त्यासि भासे द्वैतसृष्टी ॥१॥ते काय होय जी प्रमाण । येक असतां दिसतें आन ॥२॥येक्या वल्लभाच्या ठाईं । पतिव्रतेस लाभ काई ॥३॥दोघे मिळुनि ते येक । डोळे झांकुनि घेती सुख ॥४॥जेथें जालें साम्य । तेथें कैचें तारतम्य ॥५॥म्हणे मध्वनाथदेव । द्वैत भ्रांतीचें वैभव ॥६॥अभंग ९२ वा आम्ही सर्व कर्मभ्रष्ट । आम्हां दिसतें जें तें नष्ट ॥१॥आम्ही लटक्याचे साक्षी । आमुची मुद्रा विरूपाक्षी ॥२॥आत्मस्तुती परनिम्दा । करितां पावतों आनंदा ॥३॥आधीं करुनि जीवहत्त्या । मग पावलों त्या सत्या ॥४॥मध्वनाथ पुण्यव्म्त । मान्य करिती अवघे संत ॥५॥अभंग ९३ वा द्वैतसिद्धांताची युक्ति । परिसावी जीवन्मुक्तीं ॥१॥बुद्धिबळाचा तो खेळ । आली जिंकायाची वेळ ॥२॥प्यादा घोडा उंट हस्ती । काष्ठीं कल्पना ते नुसती ॥३॥दोही दळांत आगळे । राजा वजीर वेगळे ॥४॥प्यादा होउनि प्रधान । राहील राजा संन्निधान ॥५॥सार्वभौमाची विश्रांती । प्यादा पावेना कल्पांतीं ॥६॥ऐक्यमता जोडुनि हात । केली प्याद्याची ते मात ॥७॥आदिअंतीं द्वैतसिद्धी । उडविली सोऽहं बुद्धि ॥८॥मध्वनाथाचा अनुभव । जीव होईना तो शिव ॥९॥अभंग ९४ वा श्रावणांत आला पूर । गंगा चालली भरपूर ॥१॥कांहो तुम्हांसी नावडे । होऊं नका कानवडे ॥२॥घेउनि संगें आगमासी । पाहूं गेली उगमासी ॥३॥तेचि पश्चिमवाहिनी । जाली सद्गतिदायिनी ॥४॥गुरुपुत्रासि आवडे । जीवलग जे साबडे ॥५॥तैसी माझी द्वैतगंगा । जाउनि अद्वैत्यांसि सांगा ॥६॥उडती लाटा उफराट्या । तैशा गोष्टी या मठ्या ॥७॥मध्वनाथ मीनमार्गी । पोहतसे दोही भागीं ॥८॥पद ९५ वें आत्माराम मी गगनाचा बाप । माझ्या आंगीं कैचें पुण्यपाप ॥१॥गुरुरायें केलें भाग्यवान । पूर्णबोधें नेलें जगद्भान ॥२॥मिथ्या स्वर्गनरकाची वार्ता । माझ्या स्वरूपीं पाहातां परमार्था ॥३॥मृगजळ उतळ किंवा खोल । सूर्यापुढें बोलणें तें फोल ॥४॥मध्वनाथासन्मुख सर्वांसम । जाला तेव्हां कोठें अंधतम ॥५॥पद ९६ वें चिन्मय येकरसा सहसा न पडे द्वैतठसा ॥ध्रु०॥सूतचि तें उघडें त्याला म्हणताती लुगडें ॥ मातीविरहित कोण्या सुघडें घडणें ते सुगडें ॥१॥लाउनि गगनीं सुरंगा सोडुनि आणा सूर्यतुरंगा ॥ पाणी गाळुनि पाजा तरंगा स्मरूनी श्रीरंगा ॥२॥जैमिनीला दमुनी तार्किक वादाला शमुनी ॥ श्रीशुकयोगींद्राला नमुनी वदतो मध्वमुनी ॥३॥पद ९७ वें आवरूनी करणें मी निश्चय हा करणें ॥ध्रु०॥सद्गुरूच्या स्मरणें निरसा जन्म जरा मरणें ॥ विषयासाठीं व्यर्थचि भ्रमणें विष्णुपदीं रमणें ॥१॥संशय कां धरणें उठवा ममतेचें धरणें ॥ दुस्तर संसारांबुधि तरणें आपणा उद्धरणें ॥२॥मानस आवरणें छेदुनि विक्षेपावरणें ॥ मध्वमुनीश्वर वाक्यश्रवणें त्या मुक्ताभरणें ॥३॥पद ९८ वेंपरिसे गिरजे डोळसे । माझे बोल खोलसे ॥ अभाग्याला दिसतें धन । सर्प विंचु कोळसे ॥१॥नयनीं ल्याला ज्ञानांजन । त्यासी अवघे निरंजन ॥ अज्ञानाला स्वप्नामध्यें । न दिसे जनीजनार्दन ॥२॥रज्जुवरी जैसा व्याळ । स्वरूपीं तैसें मायाजाळ ॥ जैसीं बाळें गगनावरता घालिती नीलमेचा आळ ॥३॥शंकर पार्वती संवाद ऐकुनि । तुटला द्वैतवाद ॥ चिन्मयमकरंदाचा । मध्वनाथ जाणे रसास्वाद ॥४॥पद ९९ वें तो ज्ञानी न दिसे अभिमानी । सर्वही ब्रह्म मानी परम समाधानी ॥ स्वरूपीं समरस होउनि गेला त्याला कोण वानी ॥१॥तो साधु न कळे त्याचा शोधू । गेला भेदाभेदू ॥ कोणी वंदो कोणी निंदो अगाध त्याचा बोधू ॥२॥तो जाणा योगी राजसवाणा । साधकांचा राणा ॥ जीवेंभावें वोवाळावें अपुल्या पंचप्राणा ॥३॥तो स्वामी त्याचे सेवक आम्ही । तोचि गरुडागामी ॥ नेईल निजसुखधामीं सद्गुरुकृपें मध्वनाथी भासे अंतर्यामीं ॥४॥अभंग १०० वा कोठें कांहीं कोठें कांहीं । अवघें कैचें येके ठाईं ॥१॥जरी सुगंध चंदन । त्यासी भुजंग बंधन ॥२॥जरी सिंधु रत्नाकर । तर्ही त्याचें उदक क्षार ॥३॥मध्वनाथाचे अंतरीं । येक निर्दोष श्रीहरि ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP