मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद ३१ वें मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ परिशिष्ट पदे - पद ३१ वें मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी परिशिष्ट पदे - पद ३१ वें Translation - भाषांतर हिमालयाच्या घरिंच्या कारी । हांसती गौरायीला ॥१॥वरबापासी ठाव नाहीं वरमायीचें शून्य । नणदा नाहींत जावा नाहींत केवढें इचें पुण्य ॥२॥तामसगरळा ज्याला कंठामध्यें भरलें पीत । आतां रुखवत देखोनि याचें सुखावलें चित्त ॥३॥मूळ जावोनि आणिल मैना विचित्र ज्याची सेना । मिरवत पशुपति येईल मंडपांत उणें नाहीं शेणा ॥४॥प्रळयकाळीं त्रिभुवन ज्याचें म्हणवीतें खाद्यें । ऋषिपत्न्या सळितो याला सासरा घालील पाद्यें ॥५॥मधुपर्कासी गिळूणि येईल ढेंकर विश्वंभरा । दिव्यांबरें गौरवील हिमगिरी चिदंबरा ॥६॥लग्नघटिका घालुनि म्हणतील देवा सावधान । तेव्हां अकुळी करील कोण्या कुळदेवाचें ध्यान ॥७॥अंतरपाट निघोन जाई तैंच निष्ठाबाई । शिवस्वरूपीं शक्ति मिळाली ॐ प्रतिष्ठा पाही ॥८॥सुतउनी सगुण ब्रह्मकंकण बांधिती दोघाजणां । ज्ञानानलीं लाज्याहोमीं गृहस्थ यासी म्हणा ॥९॥पंचामृतें सिंपील जेव्हां गौरीहर आंबा । तेव्हां भुक्तीमुक्तीसहित अंगणीं नाचेल रंभा ॥१०॥खेचरी मुद्रा लावूनि बैसे अघोर ऐसा कसा । चंद्रम्याचा अर्ध टिकला भाळीं म्हैसा जैसा ॥११॥वळवळ करिती व्याळ अंगीं कंठीं हालाहल । मुळींच सळखळ सवतीपुढें इचें न चले बळ ॥१२॥व्योमकेशा ( न्हाणितील जेव्हां करवोल्या ) । कढत पाणी घालतील जेव्हां करवोल्या । तेव्हां शंकर म्हणेल गंगे अवघ्या करी वोल्या ॥१३॥अंबिकेची हळदी कैसी लाविल ब्रम्हगिरी । रुसून जाईला रागीट तेव्हां समजेल कन्या परि ॥१४॥अनंतकोटी ब्रह्मांडासी क्षणामात्रें गिळी । तोच बळकट आमुचा भाई याचा कान पिळी ॥१५॥जटामुगुटीं गंगा तेथें मुतल जेव्हां बोला । येईल कोपा तेव्हां ईची करील कोण जोपा ॥१६॥द्याकाराचा प्रसंग पडतां वांटिल कनकबीज । करंटे ते सभाग्य होतील धोतरबडवे द्विज ॥१७॥कुसुमशराला जाळुनि बसला देईल कोठुनि फळ । नारद सांगूं गेला याला आहे तोंडबळ ॥१८॥बिजवर नवरा गौराईसी हा कांहीं करिल चेष्टा । तेव्हां याची खोडी सांगूं लिंगाईतश्रेष्ठा ॥१९॥ते मग याला बांधतील कंठीं बाहु दंडीं । शिवशरणार्थ स्मरणमात्रें जन्ममरण खंडी ॥२०॥मध्वमुनीश्वर करील देवामध्यें तारतम्य । तृणप्राय लेखील यास वैष्णवमार्गी रम्य ॥२१॥ढवळ्या बैलावरता बसला शंकर उघडा जोगी । मसणवटीची नरवटी हातीं भिक्षा वैभव भोगी ॥२२॥घणघणघंटा नीळकंठापुढें वाजती शंख । वाजव्याला पैका न मिळे तो तों बेटा कंक ॥२३॥रुंडमाळा रुळती कंठीं व्याघ्रांबर वोढी । सुगंध केतकी सांडुनि धरि तो धतुराची गोडी ॥२४॥नागेशाचा वर्हाडी तो भंड जितुका तितुका । नाथपंठी कंथाधारी खांद्यावरता कुतका ॥२५॥भूतप्रेत पिशाच्याच्या वेताळाच्या फौजा । शाखिनी डाकिनी चौसष्टीं जोगिणी करिती मनींच्या मौजा ॥२६॥नगरामध्यें नवरा मिरवे छळना ज्याला त्याला । वर्हाडणीचीं पोरें भीति म्हणती बागुल आला ॥२७॥मध्वमुनीश्वरस्वामी दयानिधि सकळा रक्षा करी । विभूत लावुनि भूतेशाचा जापक पंचाक्षरी ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP