मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १०१ ते ११० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे १०१ ते ११० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे १०१ ते ११० Translation - भाषांतर पद १०१ वें सोडी सोडी रे कान्हा सोडी ॥ ध्रु०॥सारी रात्र मजला जागरण झालें ॥ अझुनि सुटेना गोडी ॥१॥ऐसी वार्ता कळेल पतिला ॥ मारील मजला छडी ॥२॥मध्वमुनीश्वरस्वामी रमापति ॥ अनन्यभावें हात जोडी ॥३॥पद १०२ वें बहु प्रीतीनें विनोदानें राधा काय बोलली ॥ मला भासतें हरि तुम्हापासून आज कांहीं गोष्ट घडली ॥ कांहो तुमचा नूर उतरला मुखावर पिवळकी चढली ॥ डोळे लावून शब्द बोलतां अशी अवस्था कां घडली ॥ कोण परनारी तुम्हीं भोगिली तुमची परीक्षा मज कळली ॥ हरि तुम्ही मनचे कपटी सांगत नाहीं बुद्धि आपुली ॥ चोरून मसी आणिकेसी भले खेळतां रंगढंगा ॥ मुखचंद्र तुमचा सुकून गेला हरि मजप्रति सांगा ॥१॥म्हणे राधिका यदुनायका तुम्ही ऐका श्रीरंगा ॥ध्रु०॥ऐक ऐक राधिके आतां मी खरें सांगतों तुजजवळी ॥ वनीं गोधनें चारुनि आलों मी घरासि संध्याकाळीं ॥ तशांत माझी गाय चुकली तिचें नांव धिकापोळी ॥ एकरात्र पाहात हिंडलों गांवामध्यें आळोआळीं ॥ नाहीं तिळभर पहा गवसली म्हणून सुरत जहली पिवळी ॥ जागृतीच्यामुळें डोळे झांकती गे वेल्हाळी ॥ उगाच लटका भ्रम धरुनी रुसूं नको आपुले जागा ॥२॥म्हणे सुंदरी ऐका हरि बोलते भीड सोडून ॥ पीतांबराच्या निर्या आतां ह्या कां गेल्या मोडून ॥ सुगंधाचा वास कशाचा येतो तुम्हांकडून ॥ गालाला काजळ लागलें पाहा डोळे उघडून ॥ गोपीचंदनामधें थोडेसें कुंकू राहिलें जोडून ॥ कसें हरि तुम्हीं नाहीं म्हणतां घेऊं सिकला पाडून ॥ कोण्या नारीसी दिधलें चुंबन दिसती खुण तुमच्या आंगा ॥३॥काल जाईच्या झाडांस बसलों होतों राधिके ॥ फूल आंगावर गळून पडलें ग येक ॥ पितांबराचा सोगा गुंतला निर्या मोडल्या त्या देख ॥ कानांत लेखणी खोविली शाई लागली तेव्हां कीं ग ॥ गोपीचंदनामध्यें तांबडी अक्षत आहे देख ॥ कांहो खोटा उगाच बट्टा बोलतां तुम्ही अनंता ऐकावें ॥ मोहनमाला उरास रुतली प्रत्यक्ष नयनीं पाहावें ॥ पाठीला बांगड्या रुतल्या कोठवर मजला सांगावें ॥ आतां इतकें राहिलें हरि वोढुन दुसर्या दावावें ॥ कांहो खोटा असा जबाब सवाल लागो द्याना आपलें आंगा ॥४॥हरि संपादणी करुनि बोलतां तुम्ही अनंता ऐकावें ॥ मोहनमाला उरास रुतली प्रत्यक्ष नयनीं पाहावें ॥ पाठीला बांगड्या रुतल्या कोठवर मजला सांगावें ॥ आतां इतकें राहिलें हरि वोढुन दुसर्या दावावें ॥ कांहो खोटा असा जबाब सवाल लागो द्याना आपले आंगा ॥५॥ऐक ऐक राधिके मघा एकासी झोंबी मज लागली ॥ त्याचे गळ्यामध्यें होती कंठी गे ती माझे उरास रुतली ॥ त्या गड्यानें बहु बळानें मजला कव घातली ॥ त्याचे हाताध्यें होतें कडें ते खुण पाठिसी उमटली ॥ मध्वनाथ रंगीं रंगला भगवच्चरणीं श्रीरंगा ॥६॥पद १०३ वें जय जय मंजुल मुरलीधारिन् । कंजदलेक्षण कुंजविहारिन् ॥ध्रु०॥केशव माधव वामन विष्णो । कृष्ण कपालय पालय जिष्णो ॥१॥नृहरे नरकासुरभयकारक । नारायण नरकार्नवतारक ॥२॥गोवर्धनश्वर गोकुलपालक । गोपवधूजनमानस चालक ॥३॥मदनमनोहर श्रीजलशायिन् । मध्वमुनीश्वरप्रिय वरदायिन् ॥४॥पद १०४ वें अनंतकोटि ब्रह्मांडचालक । तो हा जाला नंदाचा बाळक ॥ यमुनेच्या डोहांतील कालिक । मर्दुनि म्हणवी गोकुलपालक ॥१॥पहा वो बाई कैसें हें नवल । परब्रह्म जालें हें गोवळ ॥ गोवळांचें उच्छिष्ट कवळ । खाउनि न म्हणे सोवळें वोवळें ॥२॥क्षीरसागराचा जो जांवई । दहीं दूध चोरितो हें पाही ॥ गोपियांसी कवळीतो बाहीं । मध्वनाथ जाणें याची घाई ॥३॥ पद १०५ वें मुक्त पुरी द्वारका त्रिभुवनतारका । नाहीं दयाळ कृष्णासरिखा ॥१॥परिसे रे सखया ॥ध्रु०॥गोमतींत तनु हे तिंबो । मनमोहन हृदयीं बिंबो ॥ करुणेचा पूर मजवरी तुंबो ॥परि०॥२॥चक्रतीर्थी पडतां अस्थी । वैकुंठीं घडते वस्ती ॥ शंखचक्र जडती हस्तीं ॥परि०॥३॥पुण्यप्रत शंखोद्वार । जेथें वसे दामोदर ॥ मुक्तिदानीं परमोदार ॥परि०॥४॥धन्य देश गुर्जर । स्तविताति निर्जर ॥ भजनें हरती त्रिविध ज्वर ॥परि०॥५॥करितांचि तुझें स्मरण । हरपतें जन्ममरण ॥ तो तूं माझा रुक्मिणीरमण ॥परि०॥६॥धन्य क्षेत्र प्रभास । अविनाश श्रीनिवास ॥ पहातां हरपे चिदाभास ॥परि०॥७॥मध्वनाथ जयजयकार । करितांचि येकवार ॥ वृत्ति जाली चिदाकार ॥परि०॥८॥पद १०६ वें भज भज मनुजारे । शासन करि जो दनुजा रे ॥ध्रु०॥शंखासुर वधी होउनि मासा । तो सहकारी श्रीहरि माझा ॥१॥मंदर धरुनी वांटी सुधेतें । सूकरदांतीं धरि वसुधेतें ॥२॥संकट नानाविध निरसी हा । अंतरीं ध्याई श्रीनरसिंहा ॥३॥वामन होउनि बळिला ज्याची । न कळे महिमा निगमा ज्याची ॥४॥दुर्मद क्षत्रियवंशज जाळी । भार्गवरोषहुताशनजाळी ॥५॥दशरथनंदन भवभयहारी । दिव्य अयोध्यानगरविहारी ॥६॥निर्मळ ज्याचीं नामें गावीं । तो अवतरला गोकुळगावीं ॥७॥बौद्ध दयानिधि वर्णि अहिंसा । मारुनि म्लेंच्छा अंतरि हिंसा ॥८॥मध्वमुनीश्वर तो अवतारी । धर्म स्थापुनि त्रिभुवन तारी ॥९॥पद १०७ वें कृष्णा कृतघ्न तूं होसी । तुज येवढा नाहीं दोषी ॥१॥येवढ्य रचुनि असत्या । करिसी चराचर हत्या ॥२॥चोरजारशिरोमणी । कोण तुझे दोष गणी ॥३॥तुज अधर्म्याचें नांव । घ्यावें त्यानें जीवें जावें ॥४॥मध्वनाथ म्हणे पाही । तुझी सद्गति होणें नाहीं ॥५॥पद १०८ वें बहुतांचे तळतळाट । होती जेव्हां येकवाट ॥१॥त्याचें फळ आतां हरि । देखसील हातावरी ॥२॥तुझ्या पापें बुडेल गांव । यादवांचें नुरेल नांव ॥३॥पायां लागुनिया बाण । अवचित जाईल प्राण ॥४॥म्हणे नाथ अवधूत । मग होसील मद्भुत ॥५॥पद १०९ वें लेक तुझा अनिवार । बाइल फिरते दारोदार ॥१॥करुनि मेहुण्याचा नासु । आंगाखालीं घातली सासू ॥२॥पर्णियली गोत्रजीण । वृंदा म्हणवी बहीण ॥३॥फजितीचा तो संसार । करितां न लाजसी फार ॥४॥आंगीं साहेबीचें वारें । नाथ म्हणे कळलें सारें ॥५॥पद ११० वें ज्यासी होईल अनुताप । त्याचें जाईल महापाप ॥१॥त्यासी दिल्या प्रायश्चित्त । शुद्ध होईल निश्चित ॥२॥तुझी चौघां पडली चिंता । तिहीं सांगितलें संतां ॥३॥देव आहे हृदयशून्य । त्यासी कैचें पापपुण्य ॥४॥मध्वनाथें धरिलें मौन । अवघें मानियलें गौण ॥५॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP