मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ११ ते २० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ सद्गुरुचीं पदें - पदे ११ ते २० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी सद्गुरुचीं पदें - पदे ११ ते २० Translation - भाषांतर पद ११ वें काय द्यावें सद्गुरुभाग्यवंता वो । जेणें माझी वारिली भवचिंता वो ॥ वारुनि चिंता लावियलें मोक्षपंथा वो । मोक्षपंथीं दाविलें भगवंता वो ॥१॥ज्याच्या भजनें जालें हें भवभंजन वो । करितां सेवा होतसे मनोरंजन वो ॥ नयनें माझ्य घालुनि ज्ञानांजन वो । जिकडे तिकडें दाविलें निरंजन वो ॥२॥शरण जातां वेधिलें जीवें प्राणें वो । परतुनि येतां खुंटलें येणें जाणें वो ॥ तन्मय जाल्या वर्तलें काय जाणें वो । मध्वनाथीं भाविका श्लाघ्यवाणें वो ॥३॥पद १२ वें तो मज दावा सद्गुरु दीनबंधु वो । ज्याच्या स्मरणें तरिजे भवसिंधु वो ॥ नांव त्यचें सच्चिदानंदकंदु वो । त्याचा मजला लागला सये छंदु वो ॥१॥कैसी चुकलें सद्गुरुमायबापा वो । त्याच्या विरहें पावलें अनुतापा वो ॥ न करी आतां सर्वथा काळक्षेपा वो । चुकवी माझ्या चौर्यासी लक्ष खोपा वो ॥२॥ऐकुनि धांवा पावला सद्गुरुराजा वो । जिवलग तो हा कैवारी या माझा वो ॥ दर्शनमात्रें तोडिला हवफांसा वो । मध्वनाथीम तारिलें निजदासा वो ॥३॥पद १३ वें त्याचा मजला लागला सये वेधु वो । जेणें निजस्वरूपीं केला बोधु वो ॥ ज्याचे स्वरूपीं तल्लीन अवघे साधू वो । समरस झालें गळला भेदाभेदु वो ॥१॥जागृति स्वप्न सुषुप्ति मजला नाहीं वो । काय जाली अवस्था माझी पाही वो ॥ समाधिसुख खेळतें माझे ठायीं वो । मायातीत दिसतें कांहें बाही वो ॥२॥गेली माझी तहान आणि भूक वो । आतां कैचें संसारभयदुःख वो ॥ महावाक्य ऐकतां गुरुमुखें वो । मध्वनाथीं पावलें निजसुख वो ॥३॥पद १४ वें पुरले माझे सकळ मनोरथ वो । जेव्हां नयनीं देखिले गुरुनाथ वो ॥ दर्शनमात्रें होतसे शक्तिपात वो । ज्याच्या भजनें जालें मी मायातीत वो ॥१॥गेली माझी संसार भवदशा वो । गुरुरायें दाविलें जगदीशा वो ॥ त्याचें रूप पाहतां दाहे दिशा वो । येकायेकीं पावलों अनिर्देशा वो ॥२॥साधुसंगें तो शांतिरस प्यालें वो । तेणें निजठायासी कैसी आलें वो ॥ गुरुकृपें अद्वैतबोधें धालें वो । मध्वनाथीं सहज मुक्त जालें वो ॥३॥पद १५ वें दुर्जन वोंगळ वोंगळ । आळशी अमंगळ ॥ विषयीं रंगल रंगल । परमार्थीं खंगल ॥१॥गुरुला धिक्कारी धिक्कारी । नरकाचा अधिकारी ॥ मानस विकारी विकारी । सदाचा भिकारी ॥२॥ऐसा पातकी पातकी । विश्वासघातकी ॥ अवगुण न टाकी न टाकी । कठीण परिपाकी ॥३॥स्वहितीं अंधक अंधक । मध्वनाथीं निंदक ॥ अद्भुत चुंबक चुंबक । फजीत करितो त्रिंबक ॥४॥पद १६ वे, सांडुनी आळसा आळसा । विषयीं धरुनि चीळसा ॥ न करा वळसा वळसा । साधन न्यावें कळसा ॥१॥नरतनु उपयोगी उपयोगी । सांगतो शुकयोगी ॥ जाणें यमापें यमापें । काळ गणितो मापें ॥२॥राघव भजावा भजावा । सांडुनी सर्व अभावा ॥ सद्गुरु उमगावा उमगावा । मध्वमुनीश्वर गावा ॥३॥पद १७ वें हा ठाऊ गुरुभेटाऊ चेला । दोघाजणीं बरा उदीम केला ॥१॥आवळा घालुनि काढितो बेला । गुरुनें शिष्य भोंदुनि नेला ॥२॥गुरु नव्हे तो केवळ हेला । शिष्य बोधावीण जीतचि मेला ॥३॥अविद्येचा वेल मांडवा गेला । त्याखालें सुखरूप कोण निजेला ॥४॥शिष्य विरक्तीचा नाहीं भुकेला । मुक्तीचा स्वयंपाक व्यर्थचि गेला ॥५॥शुद्ध परमार्थाचा फाटला सेला । मध्वमुनीश्वर विस्मित ठेला ॥६॥पद १८ वें ऐसा साधक पैं नाहीं । साधनमागीं चाले ॥ध्रु०॥शमदम उपरति नलगे कोणा कैसें कौतुक पाही । जें तें प्राणी इच्छितें हें प्रसाद कांहीं बाही ॥१॥विषयीं मानस बरवें रमतें फिरतें दिशा दाही । नामरसायन सेउनि कोण्ही न पडे याचे डाईं ॥२॥शांति तितिक्षा विषयविरक्ति हें तों कोठें नाहीं । मध्वनाथ म्हणे सिद्ध जो तो आपले ठायीं ॥३॥पद १९ वें ऐसा सद्गुरु पैं नाहीं साधनमार्गीं लावी ॥ध्रु०॥साधकाच्या हृदयसरोजीं सीतावल्लह दावी । ऐसा सद्गुरुराज तयाची लीला काय वदावी ॥१॥आपण इच्छी शिष्याची ते मूळ अविद्या जावी । निवृत्तिमार्गीं लावुनि त्याची सुबुद्धि अंतरीं भावी ॥२॥श्रीशुकयोगींद्राचा लीला नाहीं कोण्हा ठावी । मध्वनाथा भजेल त्याला उत्तम सद्गति द्यावी ॥३॥पद २० वें नाहीं नाहीं संसार खरा नाहीं । ऐसें जाणुनि सावधान राही ॥१॥कैचें रजत शुक्तिकेचे ठायीं । दृश्य मृगजळवत पाही ॥२॥अनिर्वाच्य आहे कांहीं बाहीं । तेंचि तुझें निजरूप पाही ॥३॥मध्वनाथा सद्गुरुचे पायीं । लीन होई लवणजलन्यायीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP