मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १ ते १० Translation - भाषांतर पद १ लें श्रीपांडुरंगपदपंकजपूजकानें । केली हरीस विनती प्रभु केशवानें ॥ श्रीव्यंकटेश्वर उपासक पुण्यधामा ॥ तो पत्रिका परिसवी द्विज कृष्णनामा ॥१॥देवा गनेश करुणा बहु भाकियेली । ते पत्रिका गिरिवरी तिस ऐकवीली ॥ मागेतलें विमळ उत्तर पत्रिकेचें । आरंभिलें सकाळ सार्थक मैत्रिकीचें ॥२॥देवा गणेश कथिलें गुज व्यंकटेशें । देईन दर्शन रघूत्तममूर्तिवेषें ॥ स्वप्नामधें कथिन मी लिखितार्थ त्याला । ऐसा निरूपम निरोप तयास जाला ॥३॥श्रीमध्वनाथकविच्या घरिं रामचंद्रें । केली कृपा रघुविरें गुणरत्नसांद्रें ॥ श्रीलक्ष्मणासहित जानकीकांत आला । उत्साह मंगळतुरीं नगरांत जाला ॥४॥कन्याप्रदानविधि व्यंकतराजभक्तिं । केला महोत्सव यथोचित तो स्वशक्ती ॥ सीतास्वय्म्वर मनोहर लग्न केलें । वैकुंठराजभुवना कुळ सर्व नेलें ॥५॥श्रीमद्गणेशतनयेति मयाभिधानें । दिव्यांबरें कनकभूषण अन्नदानें श्रीव्यंकटेशभजनीं अति सावधानें ॥ ते पूजिली वधुवरें करुणानिधानें ॥६॥श्रीरामचंद्रपदपंकजसेवकांसी । उत्साह थोर हृदयीं अति भाविकांसी ॥ कोदंडपाणि चिमणा भवदुःख नासी । तो भेटला सगुण पंचवटीनिवासी ॥७॥श्रीमध्वनाथसदनीं प्रतिमा विराजे लावण्य देखुनि जिचें रतिनाथ लाजे ॥ पायीं सदैव बिरुदावळि दिव्य वाजे । भागीरथीपतितपावन कीर्ति गाजे ॥८॥श्रीमध्वनाथ रघुनाथ उपासकानें । हे श्लोक पैं विरचिले अति भाविकानें ॥ जो चित्त घालुनि सदा परिसेल कानें । तो वंदिजे सुरवरीं निजमस्तकानें ॥९॥पद २ रें जाणुनी वक्ता वक्ताहो । जाला पंडित वक्ता हो ॥ अखंड निंदी भक्ता हो । नेणे जीवन्मुक्ता हो ॥१॥ऐसा पंडित अभिमानी । आपली महिमा बहु वानी ॥ संतजनाला अपमानी । त्याचें लटकें तंव मानी ॥२॥अव्हेरूनी भगवंता । जी जी करिती धनवंता ॥ निंदीत फिरती बहु संता । पाडील त्यंच्या यम दंता ॥३॥विसरुनी बंधु शुक्राचा । विचार राशभचक्राचा ॥ न करी जय तो अकरांचा । स्वभाव सज्जनवक्रांचा ॥४॥समीप असतां अरविंदा । दुर्दर नेणें मकरंदा ॥ काय म्हणूं त्या विषयांचा । अखंड चिखलाचा धंदा ॥५॥पर्वत वन्हि धूमेसी । अखंड खटपट नेमेसी ॥ उपाधि इंधन भावेंसी । अंतीं बंधन जीवेंसी ॥६॥ऐसा पंडित बहु निका । पढवी चिंतामणिटीका ॥ मिळवी दानावरि शिबिका । श्रीहरिभक्तीवीण फिका ॥७॥आपली मिरवी चतुराई । कुटुंब पोसुनी उतराई ॥ मध्वनाथ वरदायी । जाणे पंडितजन घाई ॥८॥पद ३ रें लई लई लाकोटा । सांड चाळा तो खोटा ॥ बळकट खोऊन कासोटा । गे सोडूं नको आंगोठा ॥१॥नांव तुझें मोठें गे । आतां जासील कोठें गे । मोडूं नको बोटें गे । खाल्लें फार पोते गे ॥२॥चळें घेउनी काकीचे । मोतीं लेईं नाकींचे ॥ आईजीच्या लेकीचे । घर घेई येकीचे ॥३॥तुझी माझी गडी गे । खाऊं नको रडी गे ॥ खेटूं नको दरडी गे । बांधीन तुझी नरडी गे ॥४॥समजुन आपल्या ठायीं गे । खेळ मजसी डाई गे ॥ तरीच तुजला बाई गे । भाळल माझा भाई गे ॥५॥उभी माझे सवती गे । बघूं नको भंवती गे ॥ पडलीस माझे हातीं गे । रमवीन मध्वनाथीं गे ॥६॥पद ४ थें घाला बाई पिंगा वो । सांडुनी धांगडधिंगा वो ॥ सांडुनी कामसंगा वो । रामरंगीं रंगा वो ॥१॥अनुभव नाहीं निका हो । मान हालवूं नका हो ॥ रंग दिसतो फीका हो । पुढें आहे धका हो ॥२॥माज बरवा मोडी वो । राजाराम जोडी वो ॥ प्रपंच अवघा सोदि वो । याची काय गोडी वो ॥३॥होई मुक्तकेसी वो । माझा वेष घेसी वो ॥ चिद्रत्नाला लेसी वो । श्वेतद्वीपा येसी वो ॥४॥मध्वनाथीं खेळ वो । पिंगा अवघा वीळ वो ॥ स्वरूपीं माझ्या मीळ वो । होसी घननीळ वो ॥५॥पद ५ वें समजुनी घाली फुगडी वो । कोठें न दिसे उघडी वो ॥ विषसुखाचा विघडि वो । द्वैतपसारा नुघडी वो ॥१॥विधिनिषेध मांड्या झाकी वो । निर्हय पाऊल टाकी वो ॥ निजगुज आपलें राखी वो । होऊनी येकायेकी वो ॥२॥तृष्णापल्लव खोवी वो । हा बहुता ठायीं गोवी वो ॥ मीपण बुंथी ठेवी वो । निजगुज आपुलें सेवी वो ॥३॥गोष्टी ऐके निपुणाची । वेणी आवरी त्रिगुणाची ॥ भीड न धरी कवणाची । आण श्रीगुरुवचरणाची ॥४॥फुगडी घालुनी निरुती वो जाउनी बैसे वरती वो ॥ बाई घेई रति वो । नाहीं तरी होई परती वो ॥५॥मध्वनाथीं चतुराई । मिरउनी होई उतराई ॥ तेही नुरवी मग बाई । तूंच होसी जळशाई ॥६॥पद ६ वें कैकाय कैकाय बाई कोण कैंचा जाण । सद्गुरुक्रुपा होईल तेव्हां सर्व सुख बाणे ॥१॥घेई खुळ खुळ बाई विनलें राजसवाणें । देऊन सुपल्या कुरकुल्या मेळविते दाणे ॥२॥माझ्या रामाचे डोळे हरणी देखुनी डोले । माझ्या रामाईचें पोट गगनाहुनी मोठें ॥३॥माझ्या रामाईचे बोल समुद्राहूनी खोल । गोडबोली गुलगुली आवा आहेसी सगुण । वरमाय होसील वोहंमाय होसिल सांगते शकुन । फिरत फिरत याच गांवा आलें जैं आज । भाग्याची तूं आहेस बाई ठेवलीस वळखून ॥४॥जें जें रचल तें तें खचल होईल चकचूर । पुढील होईक भाकून जातें अवघें होईल भुर ॥ वरलीकडून आलें माझें घर आहे दूर । मध्वनाथस्वामी माझा धण्या भरपूर ॥५॥पद ७ वें काकीस वळखा काकीस ॥ध्रु०॥उफराटा पिंपळ त्यावरी येका कावळीनें केला खोपा रे । उफराटें बोलणें जाणे तो शाहाणा आहाणा नव्हे हा सोपा रे ॥१॥उफराट्या दृष्टीनें पहातां कैसा उफराटा चालतो वौश रे । कावळीचें अंडें फोडितां त्यांतुनि निघतो राजहंस रे ॥२॥उफराट्या हंसानें मानस भक्षुनि मुक्ताफळावरि लोळे । उफराटा मध्वनाथ निजेला गगनीं झांकुनि डोळे रे ॥३॥पद ८ वें फटसौरी फजीतखोरी नको करूं चाळे । काजळकुंकु तेलफणी दांत करुनी काळे ॥ध्रु०॥फळ नाहीं फूल नाहीं व्यर्थ जिणें बाळे । येणें वरपंगें कोण देखुनि तुला भाळे ॥१॥टाकमटीका करुनी किती घालसील डोळे । भगली ते फुगवीसी उरावरील गोळे ॥२॥येणें रंगें नागविले बहूत जन भोळे । वरल्या रानीं जासिल तेव्हां खासिल वर जरि टोले ॥३॥ठाकू नको आपल्या ठाईं करूनि चांगभांग । जनापुढें पोटासाठीं नाचविसी अंग ॥४॥सौरीयाच्या संगें तुझा फेटला नाहीं पांग । विनोदाचा सेवट गोड होईल कैसा सांग ॥५॥उपजूं दे त्रास नको फिरो दारोदार । नसते चार सिकुन किती करिसी कारभार ॥६॥भवसिंधु तरुनी कैसी जासी पैलपार । मध्वनाथ फजित करूनी सिकवी वारंवार ॥७॥पद ९ वें चांगभांग केला तो अवघा व्यर्थ गेला । ज्याचा हात धरला तो पहिला धगड मेला ॥१॥आतां बसून काय दुजा कोण्ही पाहे । तरुणपणचें काजळकुंकु व्यर्थ जातें माये ॥२॥शाहाणीस जाउनी भेटे निवडि खरेंखोटें । अवघ्यापरीस गाढवी तुझेंच आहे मोठें ॥३॥आतां कोण तुला जगवितो तुझे कोड उगवीतो । जो तो मेला देखुनिया पुढें आपलें फुगवितो ॥४॥येथें उदंड खेळे आले नाहीं कोण्ही ठेले । स्वजातीसी फिरोन पडुन काळें करून गेले ॥५॥चाल माझ्या गांवा नको घेऊं धांवा । जेथिल तेथें नेऊन घालिन राखीन तुझ्या नांवा ॥६॥मी निःसंग सौरी जालें निर्गुण रूपा आलें । लिंगदेह कापुनिया निजानंद व्यालें ॥७॥ज्ञानांजन ल्यालें नाहीं कोण्हास भ्यालें । सद्गुरुसी शरण जाउनी शांतिरस प्यालें ॥८॥सौरीसुर जाणा गेलें आपल्या राना । शुकादिक योगी जेथें जाउनि बसले ध्याना ॥९॥पहिलेंपण गेलें द्वैतलुगडें नेलें । सद्गुरुकृपें मध्वनाथीं खालील वरतें केलें ॥१०॥पद १० वें टिपरी गे सये टिपरी । गे वडील जाणुनी सांगतें जीचे ती परि गे ॥ध्रु०॥साधनदुर्ग मोडुनियां केलें तांस पाट । गौरी बोळउन येतां चुकलीस आपल्या घरची वाट ॥१॥ऐक पोरी खिजूं नको शिकविते सुबुद्धि । रंगीत टिपरी देखुन तुझी गेली पहिली शुद्धी ॥२॥ज्ञानगंगा सांडून गेलीस मायानदीच्या कांठीं । टाकमटीका देखुनी तुझ्या । लागले साजण पाठीं ॥३॥तिहीं तुज चालविलें देखुन दुजा रंग । बोल आपल्यास लाउनि घेसिल सोडि त्याचा संग ॥४॥इहलोकीं ऐसें कर्म करसील जें कीं । होईल तुझा बोभाट सावकाराचे लेकी ॥५॥आपल्या घराबाहेर बाई घालूं नको पाय । शांतगौर बोळविल्या मग सौख्य काय ॥६॥अनिवारा पोरीसवें घालुं नको वार । मध्वनाथें सोडिल्या मग कैची थार ॥७॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP