मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १५१ ते १६० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १५१ ते १६० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १५१ ते १६० Translation - भाषांतर अभंग १५१ वा ( वैजयंती ) नमन माझें तुम्हां स्वामी जगदीश्वरा । माझी अवधारावी विनती येक ॥१॥तुम्हासि जिंकिलें भक्तिचिया गुणें । म्हणोनि न पडे उणें वैष्णवचिं ॥२॥प्रगट होतां जळीं स्थळीं अथवा काष्ठीं । सत्य वचनासाठीं भक्ताचिया ॥३॥तुम्ही आपल्याकडे आणुनि घेतां हारी । होतां आज्ञाधारी सेवकाचे ॥४॥पुराणप्रसिद्धा गोष्टी कोण मानी । करितां वर्तमानीं अभिनव ॥५॥ज्ञानेशाचा तुह्मी धरुनी अभिमान । आपणासमान केलें त्यासि ॥६॥प्रतिष्ठानीं केलें अद्भुत कौतुक । देखून वैदिक शरण आले ॥७॥नामदेवाहातीं उठविली गाय । विसोबाचे पाय पूजीयले ॥८॥कीर्तन करितां फिरविलें देऊळ । श्रवणीं राऊळ सादर जाले ॥९॥कूर्मदासावरि दया केली मोठी । सांवत्याच्या पोटीं लपालासि ॥१०॥दामाजीचा कोण करी पुण्यलेखा । रसीद नेली देखा बेदरासी ॥११॥रुक्मादेवीवरें घेतली रसीद । कथा हें प्रसिद्ध पंढरपुरीं ॥१२॥सुळासि पल्लव फुटले कोमळ । रक्षिला प्रेमळ भानुदास ॥१३॥येकनाथाचें तां फेडियलें ऋण । हरिला भवशीण जनार्दन ॥१४॥ज्यासवाल्मीकांचें अवतार निर्मळ । कृष्णदास मद्गल मुक्तेश्वर ॥१५॥जयासि प्रसन्न पूर्ण गजानन । धुंडीजनार्दन मुक्त केला ॥१६॥आदिपुरुष विठा रेणुकानंदन । तयाचें बंधन तोडियेलें ॥१७॥दासोपंतावरी पूर्ण केली दया । त्याच्या संप्रदाया चालविलें ॥१८॥महामुद्गलभटा दावियलें रूप । अयोध्येचा भूप द्वारकेसी ॥१९॥मेहतानरसिहाची हुंडी स्वीकारिली । जळीं मोट तारिली जसवंताची ॥२०॥रामदासाचें त्या देखुनि वैराग्य । आपलें तें भाग्य दिल्हें त्यासि ॥२१॥प्रचीत दाविली जनीं कबिराची । त्याच्या शरीराचीं फुलें केलीं ॥२२॥रंगरावाच्या दीपमाळे डोलविलें । मुके बोलविले मालोबाचे ॥२३॥बोराबाचें तप देखुनि उत्कट । जालासि तूं प्रगट त्याचे ठाईं ॥२४॥विष्णु सर्वोत्तम ज्ञानी तो सुंदर । दास पुरंदर मिरविला ॥२५॥कीर्तन करितां लळीत केलें गोड । पुरविलें कोड तुकोबाचें ॥२६॥विषाचं अमृत करुनि तत्काळ । रक्षिली वेल्हाळ मिराबाई ॥२७॥ऐसे उद्धरिले दास लक्ष कोटी । तुझी आवडी मोठी त्यांचे ठाईं ॥२८॥माझेविषयीं तुज पडलें संकट । विषयीं लंपट म्हणोनिया ॥२९॥हीन दीन तरी म्हणवी तुझा दास । न करी उदास पांडुरंगा ॥३०॥पूर्वीं केलें त्यांसि घालूं नको पाणी । सत्वर येथें आणी भागीरथी ॥३१॥नास्तीक लोकांचें कोण धरी तोंड । त्यावरि पडो धोडं आकाशाची ॥३२॥भाविका लोकांचा वाढवी भावार्थ । दाखवी सामर्थ्य कळयुगीं ॥३३॥मध्वनाथ म्हणे बौध्यरूप टाकी । माझी लज्जा राखी जनामध्यें ॥३४॥संतनामांची या गुंफोनि वैजयंती । अर्पिली भगवंतीं मुनीश्वरें ॥३५॥पद १५२ वें ( एकाखडी ) क क क क कळों देरे प्रपंच माईक ॥ क क क क कर्पूरगौर ध्याई तूं एक ॥१॥ख ख ख ख खरें तुझें स्वरूप ओळख । ख ख ख ख खटपट सांदुनि सेवी चित्सूख ॥२॥ग ग ग ग गलबल टाकुनि सन्मार्गी वाग । ग ग ग ग गंभीरपणें गुरुचरणीं लाग ॥३॥घ घ घ घ घननीळस्वरूपीं रीघ । घ घ घ घ घरघर सोडुनि बाहेरीं रीघ ॥४॥ङ ङ ङ ङ ङकार हा संसारींचा घेऊनी सार । ङ ङ ङ ङ ङकार हा संसारीं झीज ॥५॥च च च च चराचर समूळ दुःखाचें । च च च च चतुर्भुज स्वरूप सुखाचें ॥६॥छ छ छ छ छळुनी कामा करी रे तुच्छ । छ छ छ छ छत्रचामरीं शोभसी स्वच्छ ॥७॥ज ज ज ज जगदीशस्वरूप समज । ज ज ज ज जपतप करितां भेटेल सहज ॥८॥झ झ झ झ झणिं बापा विषयीं रीझ । झ झ झ झ झडकारे निजस्वरूपा बूझ ॥९॥ञ ञ ञ ञ ञावत गेलासी वाया । ञ ञ ञ ञ येउनि लागे सद्गुरुच्या पाया ॥१०॥ट ट ट ट टकमक पाहासी अंतरीं शेवट । ट ट ट ट टळों देरे दशा वाईट ॥११॥ठ ठ ठ ठ ठकले बापा उदंड कर्मठ । ठ ठ ठ ठ ठकूं नको बांधोनी मठ ॥१२॥ड ड ड ड डसला तुज काळ प्रचंड । ड ड ड ड डळमळ करितां गडबड उदंड ॥१३॥ढ ढ ढ ढ ढळूं नको ढकलीतां दृढ । ढ ढ ढ ढ सखया तुज सांगतों गूढ ॥१४॥ण ण ण ण नको करूं कोणें वणवण । ण ण ण ण निर्गुण रूपीं कैंचा तूं कोण ॥१५॥त त त त तरसिल बापा होतां गुणवंत । त त त त तळमळ गेल्या होसील संत ॥१६॥थ थ थ थ थकीत होउनि शोधी परमार्थ । थ थ थ थ थकुनी टाकी संसार व्यर्थ ॥१७॥द द द द दर्शनमात्रें होतो स्वानंद । द द द द दयानिधी भला गोविंद ॥१८॥ध ध ध ध धरूं नको स्वदेहसंबंध । ध ध ध धन्य होसी सांगतों बोध ॥१९॥न न न न नम्र होतां होईल सन्मान । न न न न नको करूं बहु तनन ॥२०॥प प प प अरदारेसी घेतोसी झोंप । प प प प परमेश्वर तुज करील कोप ॥२१॥फ फ फ फ फटकळ हे सोडुनि दे लाफ । फ फ फ फ फजीतीचा वाजेल डफ ॥२२॥ब ब ब ब बरवा बापा परमार्थी थांब । ब ब ब ब बळकट होउनि काळासी झोंब ॥२३॥भ भ भ भ भजनाविरहित चित्ताचा क्षोभ । भ भ भ भ भगवंताचा धरी रे लोभ ॥२४॥म म म म ममता ही न असतां उत्तम । म म म म मदनांतक सेवी परम ॥२५॥य य य य यदुवीराचे वंदितां पाय । य य य य यम तुझें करील काय ॥२६॥र र र र रघुनाथाला भजतां सत्वर । र र र र रतिपति तुझा किंकर ॥२७॥ल ल ल ल लज्जाविरहित हरिरंगीं डोल । ल ल ल ल लवकर बापा हरिनाम बोल ॥२८॥व व व व वचन माझें न मानी वाव । व व व व वरपंगाचा नको रे भाव ॥२९॥श श श श शतकोटीचा करितों उपदेश । श श श श शरयूतीरींचा भजरे जगदीश ॥३०॥ष ष ष ष षड्दर्शन बोधी निःशेष । ष ष ष ष षडरिपु जिंकील तोचि निर्दोष ॥३१॥स स स स सद्गुरुचरणीं धरितां विश्वास । स स स स सत्यस्वरूपीं होसी समरस ॥३२॥ह ह ह ह हळहळ करितां बहुत संदेह । ह ह ह ह हरिगुण गाउनि होई विदेह ॥३३॥ळ ळ ळ ळ आळस सांडुनि होई निर्मळ । ळ ळ ळ ळ अळवट चिंती हृदयीं गोपाळ ॥३४॥क्ष क्ष क्ष क्ष क्षणभरी मध्वनाथाला लक्ष । क्ष क्ष क्ष क्ष क्षरातीत होईल मोक्ष ॥३५॥पद १५३ वें गयाळा तूं अनुदिनीं भज भगवंत रे ॥ध्रु०॥सेवी साधुसंत रे । जेणें दुःख अंतरे । ऐसें हरिरूप चिंत रे ॥१॥मध्वनाथ म्हणे आतां । राहे तूं सचिंत रे ॥ देह नाशिवंत रे । याची काय खंत रे ॥२॥पद १५४ वें निजलिस काय गे हो जागी तमाखू खाय गे ॥ध्रु०॥चंचींत नाहिं तर बटव्यांत पाहि गे । बटव्यांत नाहिं तर गाडग्यांत पाहि गे । गाडग्यांत नाहिं तर फडक्यांत पाहि गे ॥१॥तमाखू आणून करतेस काय गे । माझ्या कोयींत चुनाच नाहिं गे । रात्रीं मजला झोपचि नाहिं गे ॥२॥पहांटेस उठून शेतांत जाई गे । बाईसी पदरांत घेऊन येई गे । बाइसी मध्वनाथाला देई गे ॥३॥पद १५५ वें घ्या तुम्ही गुर्गुडी गुर्गुडी । प्रपंच धूर हा सोडी ॥ध्रु०॥नारळ औट हाताचें । आंत जीवन सत्रावीचें ॥१॥धैर्य तोच मेरू म्हणती । शांति चिलीम शोभे वरती ॥२॥कामक्रोध तंबाखू । ह्याची जाळुन केली राखू ॥३॥ज्ञान घालुनि खडा । गुर्गुडी बोलतसे भडभडा ॥४॥अनुभव लावुन नळी । गुर्गुडी बोले वाणी मंजुळी ॥५॥ह्या गुर्गुडीच्या छंदें । मध्वनाथ झाला धुंदें ॥६॥पद १५६ वें ( जोहार ) जोहार मायबाप जोहार । माझें नांव बोध्या महार ॥ दारीं जोहार करितों हकिकत । नका करूं जी हरकत ॥ यांचें नांव देहपूर । हें परगण्या मशहूर ॥ वरी बुजूनी दारवटा । हमेश वाहती दशही वाटा ॥ तेथें भरतो बाजार । बरा नाहीं कारभार ॥ जहाराची घडामोड । नाहीं कवडीची जोड ॥ भांडवलासी घाला मोठा । येतो मुदलासीच तोटा ॥ ऐसें भूतझवीचें गांव । आहे महाजनासी ठाव ॥ येथील जिवबा पाटील भोळा । त्याच्या दिसत नाहीं डोळा ॥ बर्या वाईटाचा धणी । येथील मनाजी कुलकर्णी ॥ रोज घेऊन खातो करजा । त्यानें धुळीस मिळविल्या परजा ॥ नाहीं साहेबासी रुजू । मार खाईल तो उजू ॥ धण्याचा मर्दराज होतो । साहेबाचा रिजक खातो ॥ साहेबास हकीकत । सांगाया आलों येथ ॥ आली यमाजीबाजीची फौज । नका करूं जी मौज ॥ वरूनी उतरली शाई । पांढर्याची फिरली दाही ॥ जागा जागा सावधान । गांव राखा आबादान ॥ गांव बुडेल रे घडींत । जावें पळोन गढींत ॥ गढीमध्यें देवराय । त्याचे धरावे पाय ॥ तो सकलांचा म्हणवितो मायबाप । मागील गुन्हा करील माफ ॥ जबरदस्त आहे खावंद । त्यासी राखा रजाबंद ॥ नका करू तनाखोरी । बाहेर पडते हे चोरी ॥ मध्वनाथीं धरितां भाव । देईल तुम्हांसी सिरपाव ॥१॥पद १५७ वें न ढळे न चळे न जस्ळे न गळे न मळे न कळे कोणा मी ॥१॥न चढे न पडे न जडे न झडे न दढे न रडे कोणा मी ॥२॥ न सुटे न तुटे न फुटे न उठे न दटे न हटे दोना मी ॥३॥मुनिवर सुमती स्वपदीं रमती यतिपति विरमती ॐ नामीं ॥४॥रतिपति खपती पशुपति जपती फणिपति सुपती तो नामा ॥५॥पद १५८ वें वारकरी पंढरीचे । मुद्रांकित श्रीहरीचे ॥१॥तुम्ही हरिदास गायक । तुमचा पंढरीनायक ॥२॥हरीनाम तुमच्या मुखीं । श्रवणें जग करितां सुखी ॥३॥नित्य राहातां देवापाशीं । एवढी विनंति सांगा त्यासी ॥४॥मध्वनाथ तुझें दीन । त्यासी न करी पराधीन ॥५॥पद १५९ वें व्यर्थ नरदेहा आलों । भार भूमीवर झालों ॥१॥देहलंड पितरलंड । तो हा आहे माझा पिंड ॥२॥केली कुटुंबाची सेवा । मनोभावें श्रीकेशवा ॥३॥उडिदांत किती काळे । काळ निवडिसी निराळे ॥४॥मध्वनाथा मायबापा । गणित नाहीं माझ्या पापा ॥५॥पद १६० वें नमो कमठरूपधरा हरि मंदरधारका । सच्चित्सुखघन पूर्णा असुरजनविदारका ॥ध्रु०॥प्रथम नंदिकेशजनित रत्नें हीं सारीं । मग मुनी दुर्वासशाप अब्धी अधिकारी ॥ देव असुर एक होत मंथन बहु भारी । वासुकी हे रज्जुपरी मंदररवीकारिका ॥१॥दधी समुद्र मंथन हें करितचि ते काळीं । मंदर हा चालिलाची भारें पाताळीं ॥ देव सर्व चकित होत स्तविती वनमाळी । रक्ष रक्ष तारि आतां कुमति सर्वहारिका ॥२॥कमठ हरी होऊनियां मंथन हें होत । देव सर्व सुखी आणि रत्न ओतप्रोत ॥ जयजय हरि परात्पर कमठरूप परंज्योत । मध्वनाथ ध्यात तुला भवभयनिवारका ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP