मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ६१ ते ७० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे ६१ ते ७० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे ६१ ते ७० Translation - भाषांतर पद ६१ वें पत्रिका यदुबरें लिहिली गे । मैत्रिकी स्मरुनि ते पहिली गे ॥ वंदुनी निजकरें शिरसा गे । चित्त घालुनि तुम्ही परिसा गे ॥१॥आत्मा असे व्यापक सर्व ठायीं । हें जाणुनी कां पडतां अपायीं ॥ तुम्हांस आम्हांस वियोग नाहीं । असोनि या काळनदीप्रवाहीं ॥२॥या गोकुळा टाकुनि कृष्ण गेला । अक्रूरजीनें मथुरेसि नेला ॥होऊनियां निर्दय फार ठेला । कां आमुचा नाश बहूत केला ॥३॥इत्यादि गोष्टी सकळा निरर्था । आरोपितां नेणुनियां समर्था ॥ हें तत्व त्या सद्गुरुलागिं प्रार्था । निरोपणीं वर्णिल सर्व वार्ता ॥४॥त्यजूना अहंता नमावें महंता । भजावा महाराज तो दैत्यहंता ॥ तुम्हां काय चिंता । असा पूर्ण सौभाग्यवंता जिवंता ॥५॥धरा दिव्य धैर्या वरा योगचर्या । करा अंतरीं श्रीहरीची सपर्या ॥ अमर्याद औदार्य गांभीर्य शौर्या । स्मरोनी भजा त्या चिदानंदसूर्या ॥६॥पद ६२ वें कानडा दगाबाज ॥ध्रु०॥रणसोडीनें मोहित केली । सुरत अमदावाद ॥१॥मथुरेमध्यें पावन केली । कुब्जेची ते बाज ॥२॥रतिसुखसागरिं बुडतां धरितो । चंद्रावळिचा माज ॥३॥मध्वमुनीश्वरवरद विनोदी । ठकडा यादवराज ॥४॥भूपाळी ६३ वीं उठुनी प्रातःकाळीं म्हणती गोपिका बाळा ॥ आमचा गळा कापुनि जावें होतें गोपाळा ॥ध्रु०॥तुझिया विरहानळेंकरूनि होतोहे उबाळा ॥ वसंत गेला मथुरे इकडे उद्धव आला उन्हाळा ॥१॥जळो जळो अमुचें जिणें धिगि धिगि लाजिरवाणें ॥ सेवट गोड न जाला सखया गेलें जीवें प्राणें रे ॥२॥पापी अक्रुर आला अमुचा जन्मांतरिंचा वैरी रे ॥ भुरळें घालुनि घेउनि गेला परमात्मा तो श्रीहरि रे ॥३॥भला अक्रूरा त्वां अपुला बोल स्थापिला ॥ आडामध्यें धालुनि बापा कैसा दोर कापिला ॥४॥अंधकूपामधुनि काढी देवा दीनोद्धारणा रे ॥ मध्वनाथा शरणागता चिंतूं नको मरणा रे ॥५॥पद ६४ वें हरिमागें मन लागलें माझें ॥ध्रु०॥ज्या दिवशीं हरिदर्शन जालें । तैहुनि मानसीं भरलें हासें ॥१॥कुंजवनीं येक्या घतिकेमध्यें । शतशत फेरे घातले दासें ॥२॥मुगुट मनोहर कुंडलमंडित । श्रीवत्सांकित हृदयीं विलासे ॥३॥मध्वमुनीश्वरस्वामीचें ऐसें । वर्णियलें यश वेदव्यासें ॥४॥पद ६५ वें सये काय करूं वो आवरी हा गोपाळ ॥ध्रु०॥दुडुदुडु धांवत चारीत गायी । वळखे आपला बाळ ॥१॥दहीं दूध चोरुनि चारी मुलांसी । सुनेवरि घाली आळ ॥२॥गोकुळ सांडुनि जावें आतां । श्रीहरि आमुचा काळ ॥३॥मध्वमुनीश्वरस्वामी म्हणतो । त्रैलोक्याचा पाळ ॥४॥पद ६६ वें सये बाई वो आला नाहीं वो । मोठा कपटी वौंसीवाला वो ॥ध्रु०॥वैरीण रजनी जातां जाईना । विरहें माझा दाहा जाला वो ॥१॥सुमनसेजेवरी नीज येईना । विंजणवारा झणीं घाला वो ॥२॥मध्वनाथें मज मोहित केलें । मारुनिया स्मरहाला वो ॥३॥पद ६७ वें अझुनि कां अझुनि कां साजणी कृष्ण न ये वो ॥ध्रु०॥नेणो कोण्या शाहाणीनें चाळविला ॥ जिवलग शोधोनिया आणि सये वो ॥१॥मध्वनाथस्वामीची वो जाली ॥ बहु अवसर अंतरीं ध्यान लय वो ॥२॥पद ६८ वें कधीं भेटेल मजला देव हरी ॥ध्रु०॥माझ्या अंगणीं हो का बाई । कोकिळा बोले मधुरस्वरीं ॥१॥ हातींचा माझ्या ग्रासचि पडतो । तळमळ तलमळ जीव करी ॥२॥डावा माझा डोळाचि लवतो । बाहु माझे स्फुरण करी ॥३॥मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । शकुन सांगा कोणि तरी ॥४॥पद ६९ वें हरिची मला लागली गोडी ॥ध्रु०॥सुंदर रूप पाहुनी डोळां जालें मी वेडी ॥१॥गृहधनआशा सर्वहि त्यजुनी कृष्णपदीं जोडी ॥२॥मध्वमुनीश्वर स्वामीदयाघन चरणसरोज न सोडी ॥३॥पद ७० वें सावळा गोविंद झडकरी आणा वो मंदिरा ॥ध्रु०॥वाजवी मंजुळ वेणु वृंदावनीं ॥ चारी धेनु चरणकमळीं ॥ ज्याच्या तल्लीन इंदिरा ॥१॥मध्वनाथस्वामीवीण ॥ शरीर हें झालें क्षीण ॥ विरहें व्याकुळ होते राधिका सुंदरा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP