मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ७१ ते ८० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे ७१ ते ८० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पदे ७१ ते ८० Translation - भाषांतर श्लोक ७१ वा महात्मयामाजि महानुभाव । तैसेंच याला हरिदास नांव ॥ इहीं हरीचें गुणकर्म गावें । न दे तयाच्या वदना बघावें ॥१॥हे भाट होती धनदातयाचे । पाडील आधीं यम दांत यांचे ॥ ते दोष कांहीं न वदा तयांचे । लाजीरवाणें सुहृदांत याचें ॥२॥कथेमधें गाउनि ख्याल टप्पा । सेटी पुढें मारिती फार गप्पा ॥ व्याही मिळाला मजला तुकप्पा । देई तुपाचा मजला तुं कुप्पा ॥३॥तो देतसे हिंग जिरें सुपारी । पानें तमाखू जरदा अफारी ॥ धिक्कारुनी यांस म्हणे विकारी । गोसावी यांचे ध्रुपदें भिकारी ॥४॥अश्वास मागे जगघांत दाणा । सेटी म्हणे कां नगरास जाना ॥ उधार माझा अवघा आणा । मी येक देईन तुम्हांस आणा ॥५॥ऐशाच रीतीं हरिदास जीती । करूनि घेती अपली फजीती ॥ हें कर्म खोटें म्हणवुनि अंतीं । सांगीतलें मध्वमुनीस संतीं ॥६॥सभेमधें आपण येक थारे । कथेमधें लाउनि दे कथा रे ॥ जो दे तयाची करिती प्रथा रे । न दे तयाची म्हणती वृथा रे ॥७॥दांतावरी ज्यासि असे बुरा तो । वर्णीं तयाला अहु तूं बरा तो ॥ हातांमधें घेउनि तंबुरा तो । मानीच ना नारद तुंबरां तो ॥८॥जो रंजवी भव्यमृदंगनादें । त्यालागिं शय्या मृदु अंगना दे ॥ जेथें निजानंद अनंद ना दे । त्या मन्मथाच्या सदनांत नांदे ॥९॥सांडूनि देती चपला धवासि । त्या वोडविती आपल्या धवासी ॥ धिक्कारुनीया निज बांधवांसी । गोपी जशा भाळति माधवासी ॥१०॥यणी जशा सांडुनिया स्वरानें । धाऊनि येती मधुर स्वरानें ॥ विंधोनि घेती हृदयीं शरानें । हें यंत्र केलें जगदीश्वरानें ॥११॥जशी स्वैरिणी इच्छिते हाटका रे । तसा श्रीहरीदासही हाटका रे ॥ करूनी कथा माजवी हा ठकारे । परी ते वरी कांतिचा हाट कारे ॥१२॥दिसे श्रीहरीदास हा नेटका रे । करूनी कथा भोंदुनी नेट कारे ॥ घरीं कामशस्त्रामधें नेटका रे । धनाचा ठसा जेविं हा नेटका रे ॥१३॥अशा मोहिल्या कामिनी नाटका रे । न लागे कधीं यास ते नाट कां रे ॥ मिळे तो करूनी तनाना टका रे । गुणें वेधिलें दिव्य कर्नाटका रे ॥१४॥जया देखतां होय उच्चाट कां रे । जलाली फकीरापरी चाटका रे ॥ न दे त्या घरीं घालुनी खाट कां रे । निज लाज नाहीं तया खाटका रे ॥१५॥सभेमधें दाविति हावभाव । परोपदेशीं कुशल स्वभाव ॥ हे भतिये भक्तिस तो अभाव । हा मध्वनाथा कलिचा प्रभाव ॥१६॥श्लोक ७२ वा ( शार्दूलविक्रीडित ) करीं वैराटिका उद्धरी । ऐसें देखुनि मध्वनाथ वरदी तो मौनमुद्रा धरी ॥२॥जोगी जंगम सेवडे म्हणति ते आम्हांत यावें सुखें । आफू भांग तमाखु सेविति तयां तें तत्त्व बोधूं मुखें ॥ माहात्मे म्हणताति ब्रह्म सगळें आम्हांमधें ठाउकें । ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो केलें कलीनें मुकें ॥३॥वोव्या श्लोक पदें प्रबंध रचना हें तो निघाली नवी । टप्पे ख्याल कितेक गाति यमकें जाले फुकाचे कवी ॥ गीता भारत वेदशास्त्र न रुचे गेली जनाची चवी । ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो देवा मला वांचवी ॥४॥शृंगारप्रिय सर्व लोक विषयी जाले विलासी महा । राधामाधव नावडेच हृदयीं येकादशी नेम हा ॥ नाहीं भूतदया मनोजय कदा कोण्हा नको वेद हा । ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो वाटे मला खेद हा ॥५॥अभंग ७३ अवघ्यांमध्यें बरा फुलार्याचा धंदा । अखंद सुगंधा भोगीतसे ॥१॥आतार्याचें घरीं अर्गजाचें केणें । विकतांही घेणें सुवासासी ॥२॥सद्वस्तु न करी अवगुण सर्वथा । हरिनाम अन्यथा होईल कैसें ॥३॥हरिकथा करुनि सुखें पोट भरी । जनाची न धरी लाज कांहीं ॥४॥हरिदास ऐसें असो हरिनांवें । न लगे कोठें जावें तीर्थयात्रे ॥५॥तीर्थें पर्वकाळ कीर्तनाजवळी । आरती ओवाळी सायुज्जता ॥६॥मध्वनाथ म्हणे वैकुंठींचा हरि । वैष्णवांचे घरीं सुखावला ॥७॥श्लोक ७४ वा उदासीन होऊनियां वागणें रे । सदा सज्जनांच्या पदीं लागणें रे ॥ मना कामना सर्व हे त्यागणें रे । कथाकीर्तनीं आदरें जागणें रे ॥१॥उदासीन होतां बहू साधका तूं । न पावेसि कांहीं बहूसा धका तूं ॥ निरूपाधि जो सर्वदा भाव दावी । तया साधकालागिं शोभा वदावी ॥२॥असो वेध कांहीं बहू साधनाचा । नसो लाभ कांहीं बहूसा धनाचा ॥ घडो दास्य कांहीं सदा सज्जनाचें । मना कीर्तनामाजि तूं सज्ज नाचे ॥३॥अरे साधका त्वां मनस्वी नसावें । कळेना तर्ही सज्जनाला पुसावें ॥ सदा सर्वदा ब्रह्मचर्यें असावें । समाधिस्त येकांत ठायीं बसावें ॥४॥सदा मृत्युचा घाव गाजे निशाणीं । अकस्मात लागेल जावें स्मशानीं ॥ जेव्हां घालिती जीव अर्धोदकीं रे । करी कोण तेव्हां तुला बोध कीं रे ॥५॥अरे पांघरावी बरी शांत साठी । धरावी अरी हे विवेकाख्य काठी ॥ हरे राम हे घालूनी माळ कंठी । सुखें मध्वनाथा जनीं काळ कंठीं ॥६॥सुखें पांघरूनी तारी निवारी अनर्था । तया मना सज्जना मुक्तिपंथा । अनाथासि तारी निवारी अनर्था । तया सद्गुरूला भजावें समर्था ॥७॥वनीं कंदमूळें फळें भक्षणें रे । मनीं सच्चिदानंद तो लक्षणें रे ॥ जनीं धर्मसंस्थापना रक्षणें रे । अशी साधकाचीं खरीं लक्षणें रे ॥८॥वरी व्याघ्रचर्में बरीं पांघरावीं । वनीं चांगलीं वल्कलें अंथरावीं ॥ समाधीस साधूनि विज्ञानमुद्रा । सुखें मध्वनाथा करी योगनिद्रा ॥९॥जया वर्णिती वेदशास्त्रीं पुराणीं । तया राघवा चिंतितो शूलपाणी । असे जाणुनी नित्य ध्यानास आणी । न सोडि मना रामकोदंडपाणी ॥१०॥श्लोक ७५ वा परब्रह्म रे निर्गुणा तूं अलेखा । कळेना तुझा वेदशास्त्रास लेखा ॥ नसे ज्या स्थळीं वर्णना रूपरेखा । लिहावें कसें त्या स्थळीं पत्र देखा ॥१॥अधिष्ठान तें पत्र कोरें पहावें । वरी दृश्य मायीक कैसें लिहावें ॥ करी दौत भक्ताघरीं शेषशायी । म्हणोनी लया जाय निःशेष शाई ॥२॥स्वयें जाण ती जे कळा देखणी हो । कसें तीस लीहील ते लेखणी हो ॥ स्वसंवृत्तितें जाण ती पै खरी हो । स्वरूपीं लया जाय हे वैखरी हो ॥३॥तुझें नाम हे सद्गुरु दीनबंधू । अनाथांसि विश्रांति कारुण्यासिंधू ॥ दयाळा मला आपुलेसें म्हणावे । स्वभक्तांमधें रंक ऐसें गणावें ॥४॥चित्र कृत्रिम अकृत्रिम भीती । विश्व मायिक असे भगवंतीं ॥ यापरी मिरविसी तूं महंती । मध्वनाथ लिहि हेचि विनंती ॥५॥श्लोक ७६ वा सदय हृदय तूझें माउलीये मवाळे । निरखुनि तव पत्रा नेत्र माझे निगाले ॥ बहुत दिवस जाले दर्शनाची अपेक्षा । झणिं करिसि उदारे बालकाची उपेक्षा ॥१॥असुनि गगनलोकीं चंद्र पोसी चकोरे । जळधर जलधारा नाचवीती मयोरें ॥ दिनमणि निजतेजें रंजवी चक्रवाकें । अभिनव रसवृत्ती बोलवी प्रेमवाक्यें ॥२॥बहुत दिवस जाले पत्र कां धाडिनासी । क्षुधित अतिथि त्याला अन्न कां वाढिनासी ॥ अवगुण बहु माझें देखुनी त्रास आला । तर्हि मज कळलें हो स्नेह तो न्यून जाला ॥३॥जर्हि मज करुणाब्धी त्वां उदासीन केलें । तर्हि मज कळलें हो जन्म तें व्यर्थ गेलें ॥ बहुत दिवस जाले पत्र येतां न देखों । शिव शिव जिव आतां हा तृणप्राय लेखो ॥४॥नयनिं स्रवति धारा होतसे पत्र ओलें । स्वरुपिं मन विरालें सद्गुरूचेंनि बोलें ॥ लिखित लिहित होतों तें निरंजन जालें । विसरुनि क्षरभावा अक्षरत्वासि आलें ॥५॥कविवर विरची हो श्लोक हे पंचरत्नें । जतन करुनि ठेवा कंठदेशीं प्रयत्नें ॥ अनुदिनिं निजचित्तीं पत्र हें वाचितां हो । जतन करुनि ठेवा कंठदेशीं प्रयत्नें ॥ अनुदिनिं निजचित्तीं पत्र हें वाचितां हो । अधिकचि सुख वाटे अर्थ हा सांचितां हो ॥६॥ओव्या ७७ वी ( डफगाणें ) कठीण परमार्थाची वाट । चढणें वैकुंठींचा घाट । मार्गीं चालतां बोभाट । कांहीं करितां नये ॥१॥ठाईं ठाईं वाटपाडे । कामक्रोधा ऐसे गाढे । त्यांच्या पडलिया दाढे । मग तों सुटिका नाहीं ॥२॥देहगांवीं आहे पुंड । त्याची बाईल ते कलभंड । आपल्या जाळींत उदंड । तिनें नाडिले लोक ॥३॥ऐसीं गेलीं बहुत युगें । कोण्ही न राही पैं उगे । जो तो आपल्या ठाईं फुगे । आम्हीं देखिली वाट ॥४॥नको दुर्जनाचा संग । अखंड कलहाचा प्रसंग । तेणें होय मनोभंग । पांडुरंग आठवेना ॥५॥त्यासी देखुनी पळावें । त्याचे मिळणी न मिळावें । अपाल्या हृदयीं निवळावें । आळवावें गुरुचरणां ॥६॥ऐसा कठीण परमार्थ । बहुत पावले अनर्थ । ज्यावरी कृपा करी समर्थ । तरीच समजे कांहीं ॥७॥मध्वनाथाचिया संगें । जातां बरवें अंतरंगें । देहभाव समूळ भंगे । मग तों बोलणें कैचें ॥८॥पद ७८ वें घनाक्षरी कृष्ण म्हणे ऐके पार्था । कठिण परमार्थाची वार्ता । जैसा पतंग दीपावरता । तैसे विषयीं लोक ॥१॥सबळ विषयाची वासना । म्हणोनि परमार्थ भासेना । जवळ चुकले गरुडासना । हृदयीं वाहती शोक ॥२॥दूध सोडुनि गोचीड । मानी अशुद्धचि गोड । तैसें विषयाचें कोड । पाहातां विचार फोक ॥३॥ऐसें कळलें मध्वनाथा । विवेक आला त्याच्या हातां । करुनि संसाराच्या घाता । विषय मानिला वोक ॥४॥पद ७९ वें रसाळ रसाळ हरिचें कीर्तन रसाळ । नवरस कीर्तन करितां जनहो संसार जिरसाळ ॥ विशाळ विशाळ ऐसी परमार्थाची साळ । श्रीरामाची कीर्ती गातां सभाग्य दिसाल ॥१॥सप्तस्वरें गीत नाना संगीत रचना । मृदंग वीणे ताळबंद अवसान खचेना ॥ नामघोषें रंजवावें पंकजलोचना । आवडीनें गावें भावें प्रपंचमोचना ॥२॥संतसभेमध्यें कीजे ब्रह्मनिरोपण । वक्ता सांपडल्या स्वयें करावें श्रवण ॥ सारासार विचार करुनी दवडा मीतूंपण । मध्वनाथावीण तुम्हां सांगेल कवण ॥३॥अभंग ८० वा जीवन्मुक्ताचीं लक्षणें । जाणावीं तें विचक्षणें ॥१॥दृढ विश्वासें रक्षणें । साधकांनीं नुपेक्षणें ॥२॥ज्यासी नाहीं आपपर । तोचि जाणा परात्पर ॥३॥विश्व देखे चिदाकार । स्वयें जाला निर्विकार ॥४॥ज्याचा गेला भेदाभेद । त्यासी नित्य मानी वेद ॥५॥त्याचा असा तुम्हा वेध । सत्य माना माझा बोध ॥६॥ज्याचा गेला देहभाव । तोचि जाणा महादेव ॥७॥जेथें मीतूंपण वाव । मध्वनाथाचा तो ठाव ॥८॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP