मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १०१ ते ११० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १०१ ते ११० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १०१ ते ११० Translation - भाषांतर श्लोक १०१ वा श्रीमध्वनाथ करितो सकळां विनंती । कीजे कृपा मजवरी गुरुराजसंतीं ॥ कोपों नये द्विजवरीं आणि भाग्यवंतीं । मी प्रार्थितों वदत जा हरि भोजनांतीं ॥१॥ऋग्वेदि आणि यजुसामअथर्वणादि । मैत्रायणी चरक काणव अप्रमादी ॥ कात्यायनी द्विज अपस्तम ते अनादि । श्रीशैव सौरगण वैष्णव तत्त्ववादी ॥२॥घालूनि आसन प्रशस्त बसा समस्तां । मी प्रार्थितों सलगिनें सुहृदां गृहस्था ॥ मागूनि घ्या तुम्हे अपोक्षित अन्न पात्रीं । सांडूं नका स्मरत जा हरि भूतमात्रीं ॥३॥श्रीशर्करेसहित पायस वर्पितां जी । का लाजतां हरिस अन्न समर्पितां जी ॥ गोष्टी अनेक विफळा परि जल्पतां जी । भक्षूनि शाकफळ आणिक कल्पितां जी ॥४॥मागूनि वोदन वरान्न सवेग घेतां । क्काथी पिऊनि मग ढेंकर फार देतां ॥ भक्षूं नका सगट पापड भोजनांतीं । गुंतोनि किंचित जडोनि बसेल दांतीं ॥५॥द्रोणे भरूनि घृत पुष्कळ सेवितां जी । पुर्णावळ्या गुळवर्या बहु जेवितां जी ॥ आणीख मागुनि कडेसहि ठेवितां जी । स्वार्थेंकरूनि वय व्यर्थ गमावितां जी ॥६॥स्वामी तुम्ही बहुत पोट भरूनि जेवा । कांहीं परंतु उदकासहि ठाव ठेवा ॥ जाऊनिया निजमठा मग चूर्ण सेवा । त्यानंतरें स्मरत जा गुरु वासुदेवा ॥७॥विद्यार्थिहो तुम्हि बहूतचि साबडे जी । मिष्टान्न तें निजमनांतुनि आवडे जी ॥ त्यामाजि केवळ तुम्हांसचि वावडे जी । भोजनामधुनि टाकुनि द्या वडे जी ॥८॥भक्षूनिया निज घरीं बहु तक्रपिष्टें । तें अर्भकें करिती जीं अशनें यथेष्टें ॥ एकावरी त्यजिति केवळ येक उष्टें । हीं मातलीं त्रिभुवनांत परान्नपुष्टें ॥९॥श्रीमध्वनाथ सकळांसहि हात जोडी । घ्या येक वेळ रघुनंदननामगोडी ॥ संसारंधन समूळ दयाळ तोडी । अंतीं सखा रघुपतीविण कोण सोडी ॥१०॥पद १०२ वें कोण्ही मागति लोणची रुचिकरें ते भोकरें आइतीं । कोण्ही मागति बाळबेल सुरणा कोशिंबिरी राइतीं ॥ कोण्ही मागति आवळेच सगळे निंबें तथा नेपती । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरले श्रीपार्वतीचा पति ॥१॥कोण्ही मागति दोडके पडवळें कासीफळें कारलीं । कोण्ही मागति पोकळा चमकुरा सेऊप स्वीकारली ॥ राहीली जरि येक शाक तरि ते पात्रांत पाचारिली । प्रार्थी मध्वमुनींद्र मूर्ति वदनीं कोण्ही न उच्चारिली ॥२॥कोण्ही मागति सांड्या कुरवड्या देखूनिया पापडा । कोण्ही मागति अर्भकें नवसिकें घारीपुरी चोपडा ॥ कोण्ही मागति वृद्ध वैदिक मुखें आणा मऊसा वडा । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरलीं श्रीशंभु तो साबडा ॥३॥पोळी भात कढी वरान्न करिता गप्पा वृथा मारिता । भक्षूनि घृत तृप्त होउन पुन्हां पात्रांत डोणा रिता ॥ कोण्ही येक खिरीस गूळ पुरता दुग्धाज्य पाचारिता । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरले सर्वांस जो तारितां ॥४॥स्वैपाकी श्रमले धुरांत भ्रमले जगरें कदा पेटना । स्वप्नामाजि परंतु येउनि कधीं मिष्टान्न तें भेटना ॥ नाकाला सुटली अखंड गळती पाणी तिचें आटना । रोटीभात वरान्न शाक हिरवी खातां बरें वाटना ॥५॥व्याही हो तुम्हिं सावकाशचि बसा घ्या भोजनाच्या रसा येथें भक्षुनि दूधतूप पहाटे पहा घरीं आरसा । मोठा घास भरूं नका निजमुखें बारीक तुमचा घसा । पक्वान्नें अवघीं त्यजा गटगटां आतां गिळा पायसा ॥६॥कोण्ही येक लुलीं कितेक तिरळीं ते आंधळीं पांगळीं । द्रोणे फाडिति ताडिती झगडती सर्वागुणीं आगळीं ॥ ऐसी ब्राह्मण मंडळीतिल मुलें पंगतीमधें चांगलीं । उच्चा देखुनि घाबरीं जसिं भुतें झोंबूं तसीं लागलीं ॥७॥पद १०३ वें बगळा नोहे बगळा नोहे ॥ध्रु०॥दोहीपक्षीं शुद्ध हंसाही वेगळा । एकापदीं राहे लीन ॥ अजी त्याची लीला बरवी बघा तुम्ही । परी तो भक्षिताहे मीन ॥१॥कृष्णमुख ज्याचें कृष्णपद त्याचें । बगळा नव्हे तो कैसा ॥ ऐसा सत्वगुण नाहीं जयामध्यें । केवळ जाण तो ह्मैसा ॥२॥बगळा श्रीशंकर बगळा । भवानी बगळा गोरख जोगी । बगळा मध्वनाथ मीनाच्या सेवनें । अखंड निरंजन भोगी ॥३॥पद १०४ वें देवचि मानव तो मानव तो । त्याला देवचि मानवतो ॥ध्रु०॥न धरी आवड जो वैश्रवणीं । निष्ठा वेदांताच्या श्रवणीं ॥१॥कामादिक रिपु सृष्टिंत मारी । दृष्टिंत उगवे बोधतमारी ॥२॥शांति जयाच्या आंगीं बाणे । वागविना जो आणिख बानें ॥३॥मारी जो यदु मल्ल मुराला । तत्पदीं मध्वनाथ मुराला ॥४॥ अभंग १०५ वा दीनानाथा नारायणा । परिसावी विज्ञापना ॥१॥तुझी जाते बिरुदावळी । सत्य जाण वनमाळी ॥२॥आम्हीं अपराध करावा । तुम्हीं राग न धरावा ॥३॥ऐसें तुम्हांसि उचित । आम्ही केवळ पतित ॥४॥बोलावितों चौघाजणां । माझा करी तूं उगाना ॥५॥मध्वनाथाची करुणा । येऊं द्यावी नारायणा ॥६॥अभंग १०६ वां धरितां नाडीय सावज । उद्धरिला पशु गज ॥१॥मुक्त केला अजामेळ । मी तों त्याहुनि चांडाळ ॥२॥गणिका घालुनी विमानीं । नेली वैकुंठभुवनीं ॥३॥हें तो अवघेंची लटिकें । कळूं आलें मज निकें ॥४॥मध्वनाथाचिये वेळे । कैसे झाकितां जी डोळे ॥५॥अभंग १०७ वा देव अरूप अनाम । मी तो पातकी सकाम ॥१॥अनाम का चांडाळाचें । नांव घेतां नये वाचे ॥२॥तुझे माझी बराबरी । जाली सहजचि हरि ॥३॥देव अगणित गुणवंत । माझे अवगुण अनंत ॥४॥तूं तो व्यापक सर्व देशीं । मी काय नरकांत परदेशी ॥५॥मज केलें जडमूढ । तुज केलें म्यां दगड ॥६॥मध्वनाथास कोण्या गुणें । तुम्ही लेखितां जी उणें ॥७॥अभंग १०८ वा तुजहुनि मी अधिक । वर्म जाणती साधक ॥१॥तुझें नांवचि तारक । मी तों म्हणवी प्रतारक ॥२॥तुझें नांव तें विशाद । माझें अंतरीं विषाद ॥३॥तुझीमाझी बराबरी । पाहतां मीच आहें भारी ॥४॥तुझा अर्धा दोशाकर । मी तों सगळा दोषाकर ॥५॥जीव शिव शब्द तोलूं । कोण पाहूं भरतें हळू ॥६॥मी तों आहे बुद्धिमंद । तुज कैचा हा समंध ॥७॥जीवपण डोईवर । घेऊन पाहे क्षणभर ॥८॥मध्वनाथासि कोण्या गुणें । तुम्हीं लेखितां जी उणें ॥९॥पद १०९ वें जननीजठरीं अग्निच्या दाथरीं कां रे तां भाजियलें । वैरिहि न करी ऐसें तां श्रीहरि परोपरी गांजिलें ॥१॥दयाळा॥ध्रु०॥ऐसा काय माझा अन्याय आहे तो विचारी रे मानसीं । वाळकाची चोरी बुक्क्याचा तो मार शासन हें देसी ॥२॥राईचा पर्वत करिसी ऐसें समर्थ्य तुजपाशीं । समर्थासीं जेणें भांडावें तयासि गोविसी भवपाशीं ॥३॥मध्वनाथ म्हणे संतसभेमधें पुसती जेव्हां कोण्ही । चरणींचीं बिरुदें सोडुनि त्यांपुढें जोडिसी हात दोन्ही ॥४॥अभंग ११० वा येकरूप नाहीं काळाचें बंधन । तुझें अनुसंधान काय राखो ॥१॥वेद शास्त्र नीति मर्यादा उडाली । धर्माची बुडाली नाव येथें ॥२॥तीर्थासि जाऊनि राहूं मी निवांत । तेथेंहि आकांत आरंभिला ॥३॥देऊळ मोडूनि मूर्तींचा उच्छेद । करिती गोवध चांडाळ ते ॥४॥माझिया डोळ्यांचें वोडवळें पाप । देव मायबाप बौध जाला ॥५॥राजिक दैविक येकवट जालें । स्वधर्मासी आलें विघ्न मोठें ॥६॥मध्वनाथ म्हणे सांग सीतापती । पुढील निश्चिती काय केली ॥७॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP