मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ सद्गुरुचीं पदें - पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी सद्गुरुचीं पदें - पदे १ ते १० Translation - भाषांतर अभंग १ ला ( सासुरवास ) संसार सासरा अविद्या हे सासु । ईचा आला त्रासु मजलागीं ॥१॥वासना नणंद तोडि माझे लोळे । कोणें ईचे लळे पुरवावे ॥२॥कांहीं केल्या ईचें नव्हे समाधान । विषयाचें ध्यान करितसे ॥३॥निर्दय निष्फळ अहंकार भर्ता । करूं नेदी वार्ता माहेरींची ॥४॥सोडुनी मजला नव्हे पै वेगळा । यानें माझा गळा बांधियला ॥५॥कामक्रोध देर मारिती हे लाता । याची मज व्यथा अहर्निश ॥६॥अंतरींचें दुःख सांगूं कोणापासीं । आहे परदेसी येकली मी ॥७॥येई मज मूळ विवेकभाईया । गातसे वोविया तुजलागीं ॥८॥शांतिमाता माझी भेटविसी कधीं । अहिण सुबुद्धि अंतरलें ॥९॥स्वानंद हा पिता खंती याची वाटे । आठवितां दाटे कंठ माझा ॥१०॥क्षमा आणि दया सख्या दोघीजणी । माझ्या सांगातिणी परत्रीच्या ॥११॥स्वधर्मविश्वास हाचि निजसखा । पाहतां या सारिखा नसे कोण्ही ॥१२॥ऐसें माहेरीचें गोत आठवतें । हृदय फुटतें भेटीसाठीं ॥१३॥ऐकुनी करुणा धांवला सद्गुरु । जो म्हनवी कल्पतरु अनाथांचा ॥१४॥त्यानें मज केलें भक्तियोगारूढ । अनुग्रहें दृढ धरियलें ॥१५॥ज्ञानखङ्गेंकरुनी वधिली अवधीं । नेले मज वेगीं माहेरासी ॥१६॥माझी मज येणें भेटविली माय । उतराई काय होऊं यासी ॥१७॥श्रीगुरुसमर्थें दाविलें माहेर । स्वरूपाबाहेर जाऊं नेदी ॥१८॥स्वानुभवें दूर केला चिदाभास । कैचा सासुरवास मध्वनाथा ॥१९॥अभंग २ रा ( परीट )सद्गुरु परीट चोखट । तो मज भेटला अवचट ॥१॥माझा चिदाभास सेला । अविद्येनें मळीण केला ॥२॥रूप ज्याचें समपोत । नाहीं आणिकांचे हातें होत ॥३॥सद्गुरु मोठा गे पारखी । सेला अमोल निरखी ॥४॥धुनावळीचा नमस्कार । पाहून केला अंगिकार ॥५॥अनुतापाच्या उदकीं । घडी भिजविली निकी ॥६॥शुद्ध सत्वाचा साबण । श्रीगुरु लावितो आपण ॥७॥होता अहंतेचा डाग । तोही केला शुद्ध भाग ॥८॥शांतिशिळेवर धुतला । ज्ञानगंगेसी निर्मळ केला ॥९॥चिदाकासी वाळविला । घडी करूनि ठेविला ॥१०॥मध्वनाथें उकलिला । ज्याचा त्यास समर्पिला ॥११॥अभंग ३ रा ( रंगारी ) सद्गुरु भेटला रंगारी । साधकाला अंगीकारी ॥१॥माझें सुमन तिवट । होतें साधनें धुवट ॥२॥तेच रंगविलें येणें । रामरंगीं राजसवाणें ॥३॥रंग अविट पै ज्याचा । वर्णायास कैसी वाचा ॥४॥ऐसें पाहतां कोठें नसें । उमटविलें स्वरूप ठसें ॥५॥तेंचि बायलें आतां । मध्वनाथें माझ्या माथां ॥६॥लक्ष तुरा झळकतो । सिद्धजन वळखतो ॥७॥अनुभव आरसा पाहिला । नाथ तन्मय राहिला ॥८॥पद ४ थे ( आंधळा ) आंधळा मी जालों देवा नाहीं स्वरुपीं दृष्टि । जिकडे ज्यानें चालविलें तिकडे जातों त्याचे पृष्ठीं ॥ धावरे दीन बंधु । निरसी कल्पनासृष्टि ॥१॥वेंघता वेंघवेना जन्ममृत्यूचे कडे । ज्याचा टेका धरूं जातों त्यासि घेउनी पडें । गर्हवास दरींतूनि बाहेर निघतां रडे । शुद्धमार्ग सांपडेना जाऊं कोणीकडे ॥२॥विकल्पाच्या ठेचा खातों नेणें गिरिगडदरा । अकस्मात तिकडे जातों जिकडे चोरांचा थारा ॥ तेच मज नागविती आपल्या साधिती वैरा । निर्वैर करुनी कोण्ही जाऊं देईना सैरा ॥३॥अविद्येच्या मध्यरात्रीं अहंश्वापदभय । तारुण्यब्रह्मारण्यीं करीती प्राणविलय ॥ मध्वनाथा धांवरे देवराया स्वामी होई सदय । मध्वनाथा करिसी केव्हां बोध अरुणोदय ॥४॥अभंग ५ वा ( वेडा )गुरुरायें वेडा केला । प्रपंच अवघा विलया नेला ॥१॥क्ककय सांगूं महिमा याची । वळखी मोदिली मायेची ॥२॥बेडी तोडिली ममतेची । बुद्धि जाली समतेची ॥३॥आम्हीं जालों वेडेपिसे । कांहींबाहीच दृष्टीस दिसे ॥४॥कर्मवासना फेडुनी । नाचों उघडे होवोनी ॥५॥आम्हीं नागवे भोपळे । खेळों त्रिभुवनीं मोकळे ॥६॥सप्तभूमिकेसी धांवा घेतों । सोऽहं म्हणोनि हांका देतों ॥७॥वेडे जाले सनकादिक । योगी संसारी अनेक ॥८॥मध्वनाथीं वेडेपण । जीवन्मुक्तदशा घेणें ॥९॥पद ६ वें श्रीशुक योगींद्रस्वामी । तुझे सेवक आम्ही ॥ आवडे धरिली तव नामीं । न्यावें लवकर निजधामीं ॥१॥सद्गुरु करुणासमुद्रा । तुझी अतर्क्य मुद्रा ॥ न कळे कैलासीं रुद्रा । खेचरी भूचरी त्या क्षुद्रा ॥२॥जेथें आधि ना व्याधी । जन्म मृत्यु न बाधी ॥ तोडुनि अवघी उपाधी । लाविसि उघडि समाधी ॥३॥शोधुनि शास्त्रींच्या युक्ती । नलगे सायुज्यमुक्ती ॥ मध्वनाथ विरक्ती । मागतोहे गुरुभक्ति ॥४॥पद ७ वें विश्रांतीचें मूळ माझ्या सद्गुरुचे पाय । तिहीं मज सुखी केलें सांगूं मी काय ॥१॥तळमळ गेली चित्ताची तें जालें सीतळ । शरत्काळीं गौतमीचें जळ जैसें नितळ ॥२॥येकायेकीं तन्मय जालें कल्पनातीत । मिथ्या म्हणे जाणावा तो महापतित ॥३॥श्रीशुकयोगींद्राचा महिमा अगाध अभिनव । सनकादिक योगीश्वर जाणती अनुभव ॥४॥मध्वमुनीश्वर म्हनतो अवघी सांडा चतुराई । पंडित जनहो सांगा कैसा होऊं उतराई ॥५॥पद ८ वेंसद्गुरु कृपाळ गे । भेटविला यानें श्रीगोपाळ गे ॥ध्रु०॥प्रपंच फटकाळ गे । तटका त्याचा तोडिला तात्काळ गे ॥१॥दिधली अमराई । संशय नाहीं उरला तीळ राई ॥२॥अद्भुत चतुराई । होऊं मी कायि तयासी उतराई ॥३॥दिठी निवाली गे । मध्वनाथी नव्हे निराळी गे ॥४॥वृत्ति जिराली गे । जैसी जळीं गार विराली गे ॥५॥पद ९ वें सद्गुरु कृपाळ गे । भेटविला यानें श्रीगोपाळ गे ॥ध्रु०॥प्रपंच फटकाळ गे । तटका त्याचा तोडिला तात्काळ गे ॥१॥दिधली अमराई । संशय नाहीं उरला तीळ राई ॥२॥अद्भुत चतुराई । होऊं मी कायिं तयासी उतराई ॥३॥दिठी निवाली गे । मध्वनाथी नव्हे निराळी गे ॥४॥वृत्ति जिराली गे । जैसी जळीम गार विराली गे ॥५॥पद १० वें सद्गुरुराया रे दयानिधि सद्गुरुराया ॥ध्रु०॥या भवतापें तापली काया । यावरि करी तूं सीतळ छाया ॥ निरसुनि माया करुनि उपाया । चुकवी सर्व अपाया ॥१॥कामादिक रिपु मारिति घाया । लावुनि जाया साधिति डाया ॥ अवसर न देती तव गुण गाया । अथवा स्वरूप ध्याया ॥२॥पसरुनि बाह्या ये भेटाया । भेटुनिया मज ने निजठाया ॥ मध्वमुनीश्वरें घेतला थाया । दाखवी सत्वर पायां ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP