मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते ११ मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ पांडुरंगाचीं पदें - पदे १ ते ११ मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पांडुरंगाचीं पदें - पदे १ ते ११ Translation - भाषांतर पद १ लें पूर्वीं जो जाहला निशीथसमयीं कृष्णाष्टमी रोहिणी । मासीं श्रावण सौम्यवासरदिनीं हक्तारिसंहारिणी ॥ तो हा सिंदुरीं मध्वनाथसदनीं मार्गे बुधे रोहिणी । मध्यें शुक्ल चतुर्दशी प्रगटला गोपाळ चूडामणी ॥१॥पद २ रें देव घराप्रति आले ॥ भलें सार्थक जालें ॥ध्रु०॥दसरा आम्हां हीच दिवाळी ॥ प्रभुदर्शनें सण जाले ॥१॥कोटी जयंत्या आजि आम्हांसी ॥ अंतर सतत निवालें ॥२॥मध्वमुनीश्वरसंतकृपेनें ॥ माझें मीपण गेलें ॥३॥पद ३ रें येथुनि तुमचा भाग्योदय ॥ देव आला जी सदय ॥१॥हाचि दिवाळी दसरा ॥ दुःख मागील विसरा ॥२॥विठ्ठल मायबाप खरा ॥ त्याचें ठाईं भाव धरा ॥३॥लोभें आणितो माहेरीं । फिरूनि न घाली बाहेरीं ॥४॥मध्वनाथ निरंतरीं ॥ लळित गातो गंगातीरीं ॥५॥पद ४ थें माथां मुगुट झळाळी । केशर - कस्तुरी मळवट भाळीं । कुरळे जावळ सांवळी । रंगम्मा माझी ॥१॥मुक्ताफळनथ नाकीं । पीतांबरें अंग झाकी । चरणीं ल्याली वाळे वांकी । रंगम्मा माझी ॥२॥पिवळा झगा अंगीं ल्याली । त्यावर बाजूबंद घाली । सदा दिसे सालीधाली । रंगम्मा माझी ॥३॥खांद्यावरि कांबळी । पायघोळ लांबली । पांघरली धाबळी । रंगम्मा माझी ॥४॥गाईपाठीं लागली । पळतां नाहीं भागली । मायबहिण चांगली । रंगम्मा माझी ॥५॥वेणू आहे रंगीत । त्यांत गायन संगीत । दैत्य दानव भंगीत । रंगम्मा माझी ॥६॥तुळशीसुमनहार कंठीं । उभी भीवरावाळवंटीं । वेणुनादीं काळ कंठी । रंगम्मा माझी ॥७॥पुंडलीकें आळविली । मध्वनाथें चाळविली । शेंदुरवाडा स्थिरावली । रंगम्मा माझी ॥८॥पद ५ वें तीर्थें हिंडता वाटे । पायीं कांटे मोडती ॥१॥कोठें ऊन कोठें हींव । जाणें जीव आपुला ॥२॥कोठें आंगावई वृष्टी । व्हावें कष्टी शरीरें ॥३॥कोठें जावें दुरीच्या दुरी । महापुरीं बुडावें ॥४॥कोठें सोसावी तहान भूक । कैचें सुख यात्रेंत ॥५॥कोठें कर कोठें चौकी । कोण्ही ठोकी रानांत ॥६॥कोठें प्रवासमध्येंच । कोण्ही लुटी गरीबांसी ॥७॥कोठें संगती खोडीक । दंड भरी पदरींचा ॥८॥कोणी संगवास देती शिव्या । गाती ओव्या त्यावरी ॥९॥इतुके सोसुनी सायास । जगन्निवास भेटेना ॥१०॥उभा होता वेणुनादीं । तो सेंदुरवाडीं प्रगटला ॥११॥जवळ सांपडली माय । कोण जाय दिगंतीं ॥१२॥मध्वनाथासी दिली भेटी । पडली मिठी स्वरूपीं ॥१३॥पद ६ वें पांडुरंगे माझे मायबहिणी । तूं तरि सांगे कहाणी ॥ध्रु०॥जिकडे पाहे तिकडे तें दुःख । कोठें नाहीं तिळहरि सुख । मिष्टान्नांत कालविलें विख । तें अन्न खातां गेली वाटे भूक ॥१॥गिळिल्या उंडी तळमळी मासा । तैसा मज येतोहे उमासा । दयाळे किती पाहासी तमाशा । लहर आली जातो जीव माझा ॥२॥पायवणी तुझे मज पाजी । कांहीं आहे उतारा त्यामाजी । माझा देह झिजो तुझे काजीं । मध्वनाथ आहे यासि राजी ॥३॥पद ७ वें पांडुरंगीं धरा प्रेम ॥ वरकड नेम सोडुनिया ॥१॥व्रत करा एकादशी ॥ दिननिशीं कीर्तन ॥२॥हेंचि मुक्तीचें साधन ॥ आराधन विष्णूचें ॥३॥वरकड उपासना भ्रम ॥ तेणें श्रम पावाल ॥४॥मध्वनाथ सांगे खरें । जेणें बरें सकळांचें ॥५॥पद ८ वें परिसे परिसे करुणासिंधु ॥ तुम्ही आम्ही सखे बंधु ॥१॥कोणी कल्पियला भेद ॥ म्हणोनी वाटतसे हे खेद ॥२॥कर्में केला अंतराय त्यासी करावें म्यां काय ॥३॥दुरीं पडलों दिगंतीं ॥ आतां वाटताहे खंती ॥४॥मूळ पाठवावें हरुषें ॥ लोटून येती बारा वर्षें ॥५॥कल्प कोटी गेल्या युगें ॥ कैसें राहावेल उगें ॥६॥याचें करुनी विधान ॥ माझें करी समाधान ॥७॥देवालयीं द्यावी भेटी ॥ मध्वनाथ घाली मिठी ॥८॥पद ९ वें प्राण्या विठ्ठल विठ्ठल बोल ॥ध्रु०॥भीमातटिं कटि दावितसे नीट ॥ नाहिं भवांबुधि खोल ॥१॥पुंडलीकप्रिय कुंडलमंडित ॥ पाहुनि अंतरिं डोल ॥२॥मध्वमुनीश्वर सांगतसे येणें ॥ नाहिं तुला मग मोल ॥३॥पद १० वें जिवलगे मायबाप विठोबा मज तारी पांडुरंगा रे ॥ध्रु०॥नतलों नाहीं कीर्तनरंगीं घेउनि ताल मृदंगा रे । विटलों नामस्मरणीं हरिच्या घालुनि वीट पलंगा रे ॥१॥खाउनि जेवुनि विड्या सेवुनी पानसुपारी लवंगा रे । भुललों शृंगारादि सेवुनि अंगनेच्या रंगा रे ॥२॥अरविंदाच्या मकरंदाची आवडि जैशी भृंगा रे । दीपकलिका अलिंगितां न कळे मरण पतंगा रे ॥३॥संसाराच्या पायीं तो अवघा धांगडधिंगा रे । म्हणोनि शरण तुज या चरणा सोडुनि सर्वहि संगा रे ॥४॥गंगास्नान करूनी नेई लिंग भंगा रे । मध्वमुनीश्वर याची भावें पूजी ज्योतिर्लिंगा रे ॥५॥पद ११ वें जीवन पंढरिनाथ । माझें ॥ध्रु०॥कटिं कर ठेवुनि नीतचि उभा । जोडुनिया सम पाय ॥१॥भीमातीरीं कीर्तनिं नाचे । सज्जन वंदिती पाय ॥२॥मध्वमुनीश्वर जोडुनि पाणी । घेत अलाय बलाय ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP