मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १२१ ते १३० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १२१ ते १३० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १२१ ते १३० Translation - भाषांतर अभंग १२१ वा जैसें सुवर्णाचे असती अलंकार । पितळ्याचे प्रकार करिती तैसे ॥१॥वजनीं उतरती मोलानें अधिक । घेती गिर्हाईक पारखूनि ॥२॥ताई घाई कसीं उतरे जें बरें । म्हणती त्यासि खरे पंधरें तें ॥३॥मध्वनाथ म्हणे पितळ्याचा कलंक । काढिल्या कनक तेंचि होतें ॥४॥अभंग १२२ वा कागदाचीं करिती चतुर फुलझाडें । भ्रमर तयांकडे न पाहती ॥१॥चित्रकार लिही अवतारचरित्र । परि नव्हे पवित्र चित्त त्याचें ॥२॥जोहरी विकीती शाळीग्राममूर्ति । आपली उदरमूर्ति करावया ॥३॥महाभारताच्या करूनि चित्रकथा । मिरविती सर्वथा हरिदास ॥४॥तैसें कवित्वाचें भरितां काबाड । लटिकें बा हाड धातुविद्या ॥५॥मध्वनाथ म्हणे परिसाची परीक्षा । पालटवी दीक्षा लोखंडाची ॥६॥अभंग १२३ वा देखोदेखीं लोक करिती कवित्व । परि नये महत्त्व महंतांचें ॥१॥तिथें पुण्य जाय आंगीं जोडे पाप । अंतरीं संताप होय तेणें ॥२॥विष्णुपदाची त्या करितां नक्कल । हांसती पूर्वज सकळ ते ॥३॥तेथें पिंडदान केल्या कोण फळ । म्हणती गयावळ अवघें व्यर्थ ॥४॥मध्वनाथ शरण विष्णुपदा गेला । अक्षई तो केला गदाधर ॥५॥अभंग १२४ वा देवाच्या प्रतिमा वोतिती वोतारी । तेणें काय तारी देव त्यांसि ॥१॥तैसे कवित्वाचे रचितां प्रबंध । न तुटती बंध संसाराचे ॥२॥शृंगारिक प्रवीण विषयीं रसिक । नटवे आवश्यक मानिताती ॥३॥मध्वनाथ म्हणे वागेसरीपुढें । सोनें बरवें कुडें निवडतें ॥४॥अभंग १२५ वा पिंपळाचा पार हिंसकाचे द्वारीं । तेथें सोमवारीं जाऊं नये ॥१॥अंत्यजाचा जेथें पाणवथा जाणा । तेथें गंगास्नाना जाऊं नये ॥२॥श्वानाचे अस्थीचें जालें चक्रांकित । शाळीग्रामासहित पूजूं नये ॥३॥अमंगळ स्थळीं तुळसीचें झाड । नाहीं त्याची चाड वैष्णवांसी ॥४॥तैसे हीन जाति वदती ब्रह्मज्ञान । शास्त्रज्ञांसमान मानूं नये ॥५॥गुडगुडीचें पाणी नव्हे मंदाकिनी । जरि मेरुवरूनि उतरलें ॥६॥अपवित्र गांजातंबाखूचा धूम । धूपारतीसम लेखूं नये ॥७॥मध्वनाथ म्हणे तोहि चंद्रमौळी । त्यास पुष्पांजुळी कोण वाहे ॥८॥ अभंग १२६ वा कोळसा म्हणे मी कोकिळासारिखा । वसंतीं पारखा कंठ माझा ॥१॥बेटकुळी म्हणे मी गर्व्हार सुंदरी । मुख्य मंडोदरी सवत माझी ॥२॥ऐरावतासम म्हणेल कोण गा । पोसला टोणगा उदंडचि ॥३॥तयाच्याहि माथां देखोनिया चांद । चकोरा आनंद होईल काय ॥४॥मध्वनाथ म्हणे तोहि चंद्रमौळी । त्यास पुष्पांजुळी कोण वाहे ॥५॥अभंग १२७ वासांडुनि मच्छरा मदास । तोचि स्वच्छ रामदास ॥१॥हनुमंतासि आश्चर्य । ऐसें ज्याचें ब्रह्मचर्य ॥२॥जिंकी मनाची उर्मी जी । तेंच पागोटें हुर्मुंजी ॥३॥उपडुनि लाजेची मेखला । ल्याला शांतीची मेखला ॥४॥हातीं वैराग्याची छडी । कामक्रोधादिकां छडी ॥५॥संतांघरीं भिक्षा मागे । ऋद्धीसिद्धी लागती मागें ॥६॥जवळी कामधेनु माय । जिच्या पोटांत सर्व माय ॥७॥संत सनकादिक जेविं । तेविं ब्रह्मारण्यीं जेवी ॥८॥जें जें सांगितलें ग्रंथीं । तोचि अर्थ बांधी ग्रंथीं ॥९॥करी श्रीरामनवमी । म्हणे श्रीराम नवमीं ॥१०॥गुरुदर्शनीं पुण्यतिथी । मध्वनाथ पूजी अतिथी ॥११॥अभंग १२८ वा हिरव्या घागरीचें पाणी । पाझरत होते हानी ॥१॥तैसे नरदेहीं आयुष्य । जातें नमुजे मनुष्य ॥२॥जळीं पडला लवणरवा । हातां न ये जेंवि बरवा ॥३॥चोरा धावत्या पाउलीं । सूळ येतसे जवळीं ॥४॥दुष्ट हिंसक कान सेळी । धरुनि मारावया नेली ॥५॥तर्ही मे मे मे मे करी । गळा दाटिल्याही सुरी ॥६॥जन नमुजे जाल्यां घात । म्हणे साधक मध्वनाथ ॥७॥अभंग १२९ वा कडू भोपळ्याची खीर । त्यांत घातल्या साकर ॥१॥तर्ही न लागे जी गोड । न पुरे रसनेचें कोड ॥२॥तैसें संसाराचें दुःख । मेळविल्या विषयसुख ॥३॥तर्ही विश्रांती वाटेना । भवभ्रांति पालटेना ॥४॥जैसी बचनागाची कांडी । गोड गुळचट लागे तोंडीं ॥५॥परिणामीं प्राणघात । म्हणे साधक मध्वनाथ ॥६॥पद १३० वें अरिषडवर्गीं जिंकिलें काय सांगूं । आतां कैसा परमार्थरंगीं रंगूं ॥१॥माझ्या मजला नावरती षडही उर्मी । हरिजागरणीं येते घुर्मी ॥२॥निस्पृह म्हणतां वाटतें कानकोंडें । विषयतृष्णासर्पिण डंखी तोंडें ॥३॥लौकिकलज्जा रक्षुनि काळ कंठी । हुतुतु घाली प्रपंचवाळवंटीं ॥४॥मध्वनाथ सांगे रे सद्गुरुराया । कैसी तुझी निस्तरूं दुस्तर माया ॥५। N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP