मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीरामाचीं पदें - पद १ ते १० भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पद १ ते १० Translation - भाषांतर १ रामजन्माचीं पदेंअवतरला रघुपति जैं । आनंदली वसुधा तैं । गंधर्ववनिता मध्यान्हसमयीं । मंगल घोषें थैं थैं ॥१॥याचक वांछावल्या । साफल्या त्या फुलल्या । प्रसूत झाल्या श्रीकौसल्या । सरिता वाहती अमृततुल्या ॥२॥क्षीराब्धीसम वाडे । सुरतरूंचीं फुलझाडें । आंगणीं कुंकुमकेशरसडे । गुढिया मखरें चहूंकडे ॥३॥वाजंत्र्यांचे जोडे । वाजती द्वारापुढें । अरुंधती बाळंतिणीकडे । वाटितसे बोळविडे ॥४॥पाहुनी राममुख । राजा पावे सुख । जयजयकारें ब्रह्मादिक । गर्जती, त्रिभुवनी कोंदला हरिख ॥५॥ऋषिश्रृंगाकारनें । पूजुनियां सन्मानें । गजरथ तुरंगादिक गोदानें । राजा वाटी समाधानें ॥६॥देवाधर्मासाठीं । येवढी करणें आटाटी । मुक्तीच्या मस्तकीं देऊनि पाटी । मध्वमुनीश्वर साकरःवाटी ॥७॥पद २ पाहूं चला सावळा राम डोळां । समाधानें बोलती बारासोळा । रत्नताटीं हातवे दीपमाला । घेउनी बुंथी चालती चमकत बाळा वो ॥१॥कृष्णावेणी चंद्रभागा भीमरथी । ताम्रपर्णी नर्मदा सरस्वती । गंगा यमुना तापी शरयू भागीरथी । या हेलकरणी सुगंधें पाणी भरिती वो ॥२॥वाजत गाजत मिरवत आल्या राजद्वारा । म्हणती कौसल्या तूं धन्य राजदारा । अंकीं खेळविसी धणीवरी जगदाधारा । पायांवरी न्हाणसी दीनोद्धारा वो ॥३॥करतळकमळें कोमळ जावळ कुरवाळिसी । अंजन घालुनी निरंजना न्याहाळिसी । जांभई देतां चुंबन चुटकें चाळविसी । शतंजीव शिंकतां आळविसी वो ॥४॥क्षीराब्धीचा जांवई श्रीधर भूप । नित्य वत्सास पाजिसी दूध तूप । पाळण्यांत निजविसी सुखरूप । स्तन्य पाजुनी लुटिसी सुख अमूप वो ॥५॥म्हणती भाग्याचा होईल सूर्यवंशीं । परमात्मा अवतरला पूर्ण वंशीं । सनकादिकीं वंदिजे परमह्म्सीं । म्हणती कौसल्ये तूं माउली पोटहिंबसी वो ॥६॥रामजन्म ऐकुनी रावण रात्रीं कष्टी । सुर्वर विमानींहुनी करिती पुष्पवृष्टी । ब्रह्मानंदें कोंदली अवघी सृष्टि । मध्वनाथास पाहिलें कृपादृष्टी वो ॥७॥पद ३ धन्य दशरथ राजा दशरथ ॥ध्रु०॥ज्याचें पोटीं उपजला राम त्रैलोक्यनाथ ॥१॥मध्वनाथ म्हणे ज्याचे पूर्ण जाले मनोरथ ॥२॥४ पददशरथाघरीं आनंद होतोहे भारी ॥ध्रु०॥नानावाद्यें वाजताती नृत्यांगना नाचताती । सप्तस्वरें आळविती । थैय्यमानें तालधारी ॥१॥चैत्रमासीं गुणरासी । रामनवमीचे दिसीं । मध्वनाथ म्हणे माझा प्रगटला सहकारी ॥२॥५ पद दशरथराजके द्वारें ॥ध्रु०॥ताल पखावज ढोल बजंतर वाजत धों धों नगारे ॥१॥चंग उपांग रबाब मनोहर । करणे भेरी तुतारे ॥२॥कंचनी रामजनी नत धुंडी । ठाकुर आये दौरे ॥३॥अंदर महलमे गावत तरुणी । शंकरमानसपारे ॥४॥कहत है माधोनाथ गुसाई । राघोजी बलहारे ॥५॥६ रामाचा रात्रवर्ग ( चामर वृत्त ) शैव शाक्त आगमोक्त मोहबीज वर्जिती । ब्रह्मनिष्ठ अग्निहोत्रि काम्यधर्म वर्जिती । रात्रिवर्ग तो म्हणोनि रामचंद्र शिक्षिता । बूतपूतनादिकांस काळरूपि भक्षिता । शुद्ध सात्विकांसि राम सर्वकाळ रक्षिता । त्यास व्यास वाल्मिकादि देति मंत्रअक्षता ॥२॥इंद्रचंद्रमाविरंचि पंचमीस सेविती । पंचक्रोश वंचुनी सुधारसास जेविती । जन्ममृत्यु सांडुनी अखंडरूप नीवती । ते असो प्रसन्न मायलेंकरांसि जीवती ॥३॥इष्ट कामदायिनी अरिष्टसर्व नाशिनी । षष्ठि देवता वरिष्ठ पूजिती सुवासिने । गाति नारदादि सिद्ध शारदादि कामिनी । धन्य आजि रामजन्म पुण्यरूप यामिनी ॥४॥धन्यदन्य सूर्यवंश पुण्यवंत दंपती । बारसें करूनि नाम राम ठेवि भूपती । रामचंद्र देखतांच कोटि काम लोपती । रावणास प्राणनाश सर्व देव कोपती ॥५॥ब्रह्मपुत्र श्रीवसिष्ठ शिष्ट सर्व हर्षती । कौशिकासि पुष्टि फार पुष्पभार वर्षती । दुष्त दैत्य कष्टताति तुष्ट होति दिक्पती । मध्वनाथ रामदास नाचताति जुत्पती ॥६॥धर्म अर्थ काम मोक्ष ऐक्यता सुलक्षणा । शंखचक्र शेषविष्णु साम्य रामलक्ष्मणा । सद्गुरूस पूजुनी करूनियां प्रदक्षिणा । मध्वनाथ वांटतो सुवर्णपुष्प दक्षिणा ॥७॥७ पद रामाचे पाळणेयेगे येगे गाई येगे गाई । माझ्या रामाला दूध देई । बहू नवसाची हे सामाई माझी रामाबाई ॥१॥भरत सुलक्षण सुंदर लक्ष्मण । शत्रुघ्नासम पाही । बहुत गुणाची धार्जिणी आली घेउनि तीघे भाई ॥२॥भक्तजनाची सीतळ छाई । म्हणवीते जलशायी । सुरवर किन्नर विधि हर तुंबर लागती जीचे पाईं ॥३॥अगणित गुण वर्णुं मी काइ । इजला उपमा नाहीं । मध्वमुनीश्वर म्हणतो याला आहेत चौघे गाही ॥४॥८ पदजय जय दीनदयाळा । निज बाळा जो जो ॥ध्रु०॥रत्नजदित मुगुट जाण । त्याला जडिलें पिंपळपान । त्यासि देखुनी चंद्रसूर्य लाजो ॥१॥वनमाला वैजयंती । वाहिली जे भाग्यवंती । तेथें जीवती वाघनखें साजो ॥२॥करारविंदें पदारविंदा । मुखरविंदींघालितां । चरणीं बाळे वाकीं रुणझुण वाजो ॥३॥सत्रावी जे कामधेनु । तिचा महिमा काय वानूं । तेचि येउनि बाळा दूध पाजे ॥४॥मध्वनाथा आळवितें । पाळणा मी हालवितें । पतितपावन बिरुदावलि साजो ॥५॥९ पद राघोबाच्या मुखा । कौसल्या देते मुका ॥ अमृताचा रस फिका । रामकथारस निका ॥ बाळबोध करुनी टीका । व्यास पढवितो शुका ॥१॥लेंकुरबाळी आळवीते । जावळासी कुरवाळिते । मध्वनाथ म्हणे तिच्या । पार नाहीं सुखा ॥२॥१० पदमाझें अचडें बचडें छकडें वो ॥ध्रु०॥विकसितपंकजलोचन त्याला । जननी म्हणते चिपदें वो ॥१॥त्रिभुवनपाळा बाळांत्यासें । पांघरवी जे लुगडें वो ॥२॥मध्वमुनीश्वर खेळवी अंकीं । ब्रह्मसनातन उघडें वो ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP