मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| अभंग ३ रा मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट प्रकरणें - अभंग ३ रा मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट प्रकरणें - अभंग ३ रा Translation - भाषांतर ब्रह्मकपाटाची तुज नाहीं सये । अजुनी कां रे न ये दया माझी ॥१॥नाशिकत्रिंबकींचा आहें मी ब्राह्मण । यासी अभिमान करूं नको ॥२॥गौतमानें गंगा नेली जे सागरा । फिरवीन माघारा वोघ तीचा ॥३॥पाताळींची गंगा आणिन भूमीवरी । तरीच भूमीवरी दास तूझा ॥४॥तुझी ते प्रतिज्ञा करीन लटकी । प्रार्थीन नेटकी चंडिका ते ॥५॥माझ्या कूपामधें लोटी सवतीला । ऐसें पार्वतीला सांगेन मी ॥६॥प्रल्हादाची सत्य केली त्वां प्रतिज्ञा । स्तंभांत सर्वज्ञा प्रगटलासी ॥७॥आतां खडकींत होसील प्रगट । तरीच उत्कृष्ठ महिमा तुझा ॥८॥भस्मासुरापुढें सोडिली त्वां शस्त्रें । विकळ झालीं गात्रें तेव्हां तुझीं ॥९॥काय तूं विष्णूचा होसी उतराई । तुझी चतुराई कळली त्यासी ॥१०॥अल्प गंगोदक देतां अभिषेका । सांग रे त्रिंबका काय वेचें ॥११॥तुझें तुज देऊं आम्ही तें न घेऊं । नको कांहीं भिऊं मनामध्यें ॥१२॥उपमन्यूसी त्वां दिधला क्षीरसिंधू । मजला नीरबिंदु देइनासी ॥१३॥भुकेल्यासी अन्न तान्हेल्या जीवन । द्यावें हें वचन कवणाचें ॥१४॥शंभरासी शेळी लक्षासी ते गाय । हाही काय न्याय विसरलासी ॥१५॥तुज अभिषेक होय जेणें जळें । ऐसें हें मोहचळें तरी देई ॥१६॥आम्हासी कळलें उत्तम त्वां केलें । परिणामीं गेलें तुझें देवा ॥१७॥महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करूं कष्टी मुनीश्वरा ॥१८॥शुकयोगींद्राचा आहें मी अंकित । तुजला निश्चिंत राहों नेदी ॥१९॥तुझे देवपण सगळें गिळीन । टाकीन खिळून मनामध्यें ॥२०॥आत्मलिंगाचिया करीन स्थापना । ह्मणवीन आपणा देव ऐसें ॥२१॥जरी खरी भक्ति आहे ते शांभवी । घरींच जान्हवी आहे आह्मां ॥२२॥देवें ऐकियेली दीनाची विज्ञप्ति । कृपावंत चित्तीं झाला मग ॥२३॥म्हणे जेथें नित्य होती ब्रह्महत्या । अधर्मासी कृत्या आदरिती ॥२४॥तेथें गंगादेवी येईल कोण्या गुणें । मागील दुःख दुणें आठविलें ॥२५॥गौतमासी घडलें गोहत्येचें पाप । तेणें केलें तप बहुत दीस ॥२६॥तुझ्या पदरीं तों नाहीं पुण्यलेश । नको करूं क्लेश खडकींत ॥२७॥सेंदुरवाड्यामध्यें जेथें गणपती । तेथें भागीरथी प्रगटेल ॥२८॥ब्रह्म कमंडलु त्याचें नांव ठेवी । मनांत आठवी पाय माझे ॥२९॥स्नान करूनिया भाव धरी एक । करी अभिषेक मोरयासी ॥३०॥ऐसें म्हणुनी माझें केलें समाधान । दाविलें निधान वाटेमध्यें ॥३१॥या रे जन हो नका जाऊं दिगंतासी । भावें भगवंतासी शरण रिघा ॥३२॥जयाचिया पायीं प्रगटली गंगा । तया पांडुरंगा पूजा तुम्ही ॥३३॥मध्वनाथ येथें यात्रा भरितो नवी । भेटली जान्हवी जन्ममाता ॥३४॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP