मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १३१ ते १४० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे १३१ ते १४० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी स्फुट पदें - पदे १३१ ते १४० Translation - भाषांतर पद १३१ वें संसार दुःखमूळ ॥ध्रु०॥तनमनधन हें ज्याचें त्याला । होतें हें प्रतिकूळ ॥१॥स्वजन सुतादिक इतरें याला । कैचि ते अनुकूळ ॥२॥विषवल्लीचीं मधुर फळें तुज । रुचती जैसा गूळ ॥३॥तस्कर न्हाला धाला त्याचा । खांद्यावरतां सूळ ॥४॥मध्वमुनीश्वर म्हणतो सखया । शेवटीं अवघी धूळ ॥५॥पद १३२ वें संसार छंद टाका टाका टाका संसार ॥ध्रु०॥कैचा आपा कैचा बापा कैचा कोठील काका । कैच्या बहिणी कैच्या विहिणी कैची आई आका ॥१॥विकळ शरीरा देखुनि पोरें रडती देती हांका । लेकुरवाळी बाइल म्हणते आतां याला झांका ॥२॥वैराग्याचें कारण येवढें सावध होऊनि ऐका । मध्वनाथा शरण रिघावें वांटुनि अवघा पैका ॥३॥पद १३३ वें सोडा सोडा दुर्जनसंग सोडा ॥ध्रु०॥संतसमागम धरुनी त्याच्या ऐका गोष्टी गोडा ॥ ज्ञानखङ्गेंकरुनी आधीं बंध जीवाचा तोडा ॥१॥सावध होऊनि या विषयाचा अवघा खेळ मोडा ॥ हरिभजनाचें आयुध होउनि काळाचें शिर फोडा ॥२॥मध्वनाथ म्हणतो आतां उरला अवसर थोडा ॥ येवढा होतो नाश जीवाचा नाहीं याला जोडा ॥३॥पद १३४ वें प्राण्या तूं सज्जनसंगति जोड ॥ध्रु०॥दुर्जनसंगति देईल दुर्गति । दुर्मद दुर्मति सोड ॥१॥मध्वमुनीश्वर साधुसमागम । सेउनि जाला गोड ॥२॥पद १३५ वें धन्य ते साधुसंत अति पुण्यवंत हो । घेतां भक्तांचीं नांवें पातका अंत हो ॥ध्रु०॥जयाची आवडि आहे सर्वोत्तमीं हो । तयाच्या तीर्था सेवी श्रीगौतमी हो । सुखरूप राहति जेथें ते पुण्यभूमि हो । जनहो तयाची करा सेवा तुम्ही हो ॥१॥महिमा सिद्धाचा वर्णिते वेदवाणी हो । मस्तकीं आज्ञा वंदी श्रीचक्रपाणी हो । सायुज्यमुक्ति वाहे घरांत पाणी हो । मुक्ताच्या दर्शनमात्रें तरताती प्राणी हो ॥२॥लीलाविग्रही माझा श्रीराम जैसा हो । सज्ञानी करिती अवघा वेवहार तैसा हो । श्रीमध्वनाथस्वामीस नलगे तो पैसा हो । ऐशाला समजेना जो तो मूर्ख म्हैसा हो ॥३।पद १३६ वें संतसंगें अंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगीं देवासन्निध सुखें डोलावें ॥ध्रु०॥सगुणचरित्रें परमपवित्रें सादर वानावीं । निरभिमानें सज्जनवृंदें आधीं मानावीं ॥१॥भक्तीज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या । मनोभावें वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥२॥जेणें चित्तीं मूर्ति ठसावें सत्वर श्रीहरिची । ऐसी कीर्तनमर्यादा हे संतांचे घरिंची ॥३॥श्रवणें मननें नामघोषें वाजवी करटाळी । मध्वनथ जीवन्मुक्त जाला कळिकाळीं ॥४॥पद १३७ वें किती येसी जासी प्राण्या गर्भवासीं रे ॥ध्रु०॥या भवपाशीं अवघें विनाशी । येथें नाहीं मिरासी ॥१॥धरूं नको आस उपजूं दे त्रास । काळ करितो ग्रास ॥२॥मध्वनाथ हित सांगतो बहुत । होतां बरें अवधूत ॥३॥पद १३८ वें देवाचिये पायीं भाव तुझा नाहीं रे ॥ध्रु०॥म्हणुनिया पाही पडसी अपायीं । फिरसी बहुतां ठाई ॥१॥संसाराच्या योगें विषयांच्या भोगें । पीडला जासी रोगें ॥२॥मध्वनाथीं तुज न पडे उमज । ऐसी नव्हे हे बोज ॥३॥पद १३९ वें किती गर्भवासीं । प्राण्या व्यर्थ येसी जासी ॥ध्रु०॥विषयाच्या सुखासाठीं । करिसी तूं आटाआटी ॥ त्याचि सुखा भुलतोसी । जैसी गुळावरील मासी ॥१॥माझें माझें म्हणतोसी । चौर्ह्यायसींत सिणतोसी ॥ मध्वनाथ म्हणे अंतीं । भोगिसी दुःखाच्या राशी ॥२॥पद १४० वें ऐसें कीर्तन काय रे । भिन्न अभिप्राय रे । सासू गेल्या सून जैसी मोकलीते धाय रे ॥ध्रु०॥कथेमधें लोळणें । प्रेमें डोळे चोळणें । भावाविरहित डोळणें तें अवघें पोकळ बोलणें ॥१॥सप्तस्वरीं गात रे । दावी धात मात रे । हृदयीं घातपात त्याला कैचा मध्वनाथ रे ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP