मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे ६१ ते ७० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट पदें - पदे ६१ ते ७० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पदे ६१ ते ७० Translation - भाषांतर पद ६१ वें घनाक्षरी देह नाशवंत जाण । देह अविद्येची खाण । देहास पडते घाण । येक दिन न धुतां ॥१॥देह विटाळाचें मूळ । देह मरणाचें कूळ । अंतकाळीं होते धूळ । न ये कांहीं साधितां ॥२॥देह नरकाचें भांडार । देह रोगाचें बिढार । देह रक्ताचा विकार । ऐसें जाण शोधितां ॥३॥देह आहे अमंगळ । देह शेवटीं भंगेल । ऐसें कळलें केवळ । मध्वनाथें बोधितां ॥४॥पद ६२ वें घनाक्षरी संसारीं विचार सार । सांडुनि प्रचार फार । विषयाचा कारभार । करूं नको भाई रे ॥१॥व्यर्थ तुझी येरझार । धरूं नको परिवार । ममता हे अनिवार । फार इची घाई रे ॥२॥रूप तुझें निर्विंकार । ब्रह्मपदीं अधिकार । असोनिया अहंकार । सोडुनिया पाही रे ॥३॥मध्वनाथ वारंवार । सांगतो प्रकार सार । सद्गुरु हा निर्विकार । लाग त्याचे पायीं रे ॥४॥पद ६३ वें घनाक्षरी धरुनि सात्त्विकाचा वेष । करिती सज्जनाचा द्वेष । हा येक देखिला विशेष । कलियुग लागतां ॥१॥उगाच वाजविती टाळ । कंठीं रुद्राक्षाची माळ । पीडदंड भगपाळ । उजगरीं वागतां ॥२॥भगलीचें निरुपण । कीर्तन करितों आपण । दुसर्याचें तें कृष्णार्पण । स्वयें कृपण मागतां ॥३॥मध्वनाथ म्हणे मत । घरोघरीं हे घुमत । भांग पिऊनि उन्मत्त । न ये कांहीं सांगतां ॥४॥पद ६४ वें घनाक्षरी मीच गोसावी सज्जन । माझें करावें पूजन । द्यावें मिष्टान्न भोजन । ऐसें शिष्यां उपदेशी ॥१॥मज घाला नमस्कार । करा पूजा पुरस्कर । ऐसा देतो तिरस्कार । जनालागीं विदेशी ॥२॥ऐका सांगतों साधन । मज द्यावें अवघें धन । करा आत्मनिवेदन तेंच पावल जगदीशीं ॥३॥आपला रडतें जें रड । त्याचें ज्ञान काय धड । ऐसें प्रस्थान अवजड । मध्वनाथ निरसी ॥४॥पद ६५ वें घनाक्षरी पहा कथेचा कल्लोळ । श्रोते मिळाले ते टोळ । मृदंगाचा टाळवोळ । रंग कोण मातला ॥१॥निर्भय बोलतो लोकांत । होतो नकलांचा आकांत । चित्तीं नाहीं रमाकांत । हास्यरती रातला ॥२॥आपण म्हणवितो हरिदास । करितो संतांचे उपहास । कांहीं केल्या न सुटे आस । हाच दुकान घातला ॥३॥ऐसा गायक अघोर । त्यासी न मानिती थोर । सभेमध्यें फजीतखोर । मध्वनाथ्हें नाथिला ॥४॥पद ६६ वें घनाक्षरी आतां असोत गुणदोष । न करावा कंठषोष । आपला आपण संतोष । मानुनि काळ क्रमावा ॥१॥दिसोन येतां दीर्घद्वेष । नाहीं आपल्यास विशेष । होती बहुतांला क्लेश । ऐसा वाद शमावा ॥२॥कैचा सज्जन दुर्जन । अवघा जनीजनार्दन । चिदानंदविवर्धन । सर्वाहूतीं नमावा ॥३॥करितां सकळांसी सख्य । तरीच पाविजेल सौख्य । मध्वनाथ म्हणे मुख्य । अहंकार दमावा ॥४॥पद ६७ वें घनाक्षरी करुनि वेदांतश्रवण । कळला माझा मी कवण । जैसें उदकीं लवण । तैसा स्वरुपीं मिळाला ॥१॥त्याची लीला अभिनव । जाला स्वरुपानुभव । भोगी साम्राज्यवैभव । सर्वांहुनी निराळा ॥२॥बरवें शोधुनि शास्त्रास । धरिला विषयाचा त्रास । केला मीपणाचा ग्रास । प्रपंचाहुनि वेगळा ॥३॥मध्वनाथा तो ब्राह्मण । जीवन्मुक्त त्यास म्हण । परमहंस शिरोमण । श्रीशुकयोगी चांगला ॥४॥पद ६८ वें घनाक्षरी जालें वेदांतांचें राज्य । छत्र उभारिलें आज । वरकड शास्त्रें आलीं वाज । जीव घेउनि पळालीं ॥१॥येवढा समर्थ प्रताप । केलें साधक निष्पाप । गेला प्रपंचविलाप । सर्व दुःखें जळालीं ॥२॥साधक फिरताति निर्भय । पद पावती अद्वय । अहंभावाचा विजय । करितां द्वंद्वें गळालीं ॥३॥श्रीशुकयोगी चक्रवर्ती । ज्याची लोकत्रयीं कीर्ति । शुद्ध जीवन्मुक्त मूर्ति । मध्वनाथीं मिळाली ॥४॥पद ६९ वें जाला गोसावी । इंद्रियें पोसावीं ॥ध्रु०॥कंथा गळांची । बहु थीगळाची । पंथ धरी वेगळांची ॥१॥माथां टोपी । मना नाटोपी । मोठा खटाटोपी ॥२॥हातीं काठी । कथा थाटी । शिष्य पदें पाठी ॥३॥लावी गाथा । हालवी माथा । न भजे मध्वनाथा ॥४॥पद ७० वें तेव्हां गोसावी । जेव्हां सुखदुःखें सोसावी ॥ध्रु०॥मानी प्रतिष्ठा शूकरविष्ठा । ध्यानीं अंतरनिष्ठा ॥१॥न धरी लोभा न करी शोभा । निंदितां न मनीं क्षोभा ॥२॥न धरी अहंता पूजी महंता । वर्णितो गुणवंता ॥३॥मध्वनाथा वंदी कोण्हा ना निंदी । मग तो परमानंदी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP