मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती खंडेरायाची

आरती खंडेरायाची

मध्वमुनीश्वरांची कविता


मस्तकिं मुगुट अंगीं सोन्याचा शेला । हस्तकिं खङ्गा घेउनी मारिसि मणिमल्ला ॥ कैलासाची प्रतिमा जेजुरचा किल्ला ॥ बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ॥१॥
जयदेव जयदेव जय खंडेराया ॥ अखंड भंडारानें डवडवली काया ॥ध्रु०॥
चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ॥ त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥ ज्यांना न कळे तूझ्या भक्तीचें वर्म ॥ त्यांचें तोडीत आहे कळिकाळ चर्म ॥२॥
तूझे भक्तिविन्मुख जे ते कौरव ॥ जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ॥ मध्वनाथ जपतो येळकोट भैरव ॥ निंदा करिती त्याला होती रौरव ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP