मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ परिशिष्ट पदे - पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय परिशिष्ट पदे - पदे १ ते १० Translation - भाषांतर पद १ ले सांपडला बहुता दिवसा मज सेंदुरवाडीचा मंगळमूर्ती । सांग सख्या मग काय उणें घरिं बैसल्या होईल उदरपूर्ती ॥ देईल संतती संपत्ति सन्मति सद्गतिदायक निर्मळ स्फूर्ती । चिंतामणिविण आणिक दैवत चिंतिल्या होईल दुर्गति पुर्ती ॥१॥देव निरंजन मुनिजनरंजन भवभयभंजन सद्गुरुरूपा । भेदविनाशक शूद्रउपासक बुद्धिप्रकाशक द्विजकुलभूपा ॥ दिव्य चतुर्भुज तोचि तूं शंभुज दावि पदांबुज अनुकंपा । मध्वमुनीश्वर जाणुनि किंकर देव अभयंकर शांति अमूपा ॥२॥अभंग २ रा चला जनहो यात्रे जाऊं । पांडुरंग नेत्रीं पाहूं ॥१॥सामराजक्षेत्रीं राहूं । तया गंगेमध्यें नाहूं ॥२॥सुखदुःख दोन्ही साहूं । पद वैकुंठीचें लाहूं ॥३॥समपदकमळें ध्याऊं । भावें तुळशीदळ वाहूं ॥४॥नाम विठोबाचें गाऊं । मध्वनाथसी तेथेंच बाहूं ॥५॥अभंग ३ रा तारावया जढमूढ । स्वामी आला गरुडारूढ ॥१॥देवा आला गंगास्नाना । कारे जनहो यात्रे याना ॥२॥तुळसीमाळा घालुनि कंठीं । कथा करूं वाळवंटीं ॥३॥कळिकाळा उसीक । यमदूता न घालूं भीक ॥४॥दिंड्या पताकांचे भार । गरुड टके झळकती फार ॥५॥पुढें वैष्णव साबडे । गाती नामाचे पवाडे ॥६॥टाळमृदंग धुमाळी । रंगीं नाचे वनमाळी ॥७॥देव करिती पुष्पवृष्टी । अवघी आनंदली सृष्टी ॥८॥आखाडीच्या यात्रेमुळें । उद्धरती कोटीकुळें ॥९॥मध्वनाथ गंगातीरीं । जवळ आणिली पंढरी ॥१०॥अभंग ४ था ब्रह्मसुख प्रगटलें । भवदुःख निवटलें ॥१॥ईटेवरी उभें ठेलें । सेंदुरवाड्यांत भेटलें ॥२॥नंदघरिंचे नांगरगोडे । कव्हडे येथें आलें धेंडे ॥३॥मध्वनाथासी उपकार । केला पुंडलिकें फार ॥४॥अभंग ५ वा चंद्रभागा सरोवरीं । उभा होता ईटेवरी ॥१॥तो हा पंढरीचा राणा । गंगातीरीं आला जाणा ॥२॥गुप्त होता बहुत दिवस । प्रगट जाला जगदीश ॥३॥दीनजन तारावया । दया आली देवराया ॥४॥मध्वनाथाचा उद्धार । करील विठ्ठल उदार ॥५॥अभंग ६ वा बळकट बांधोनिया कास । जालों विठ्ठलाचा दास ॥१॥येव्हडा शिरावरी धनी । कळिकाळा कोण गणी ॥२॥गाऊ नामाचे पोवाडे । जिंकूं कामक्रोध गाढे ॥३॥कांहीं नाहीं भय शोका । जेथें जेथें आमुचा ॥४॥मध्वनाथ म्हणे आज । आम्ही करूं रामराज्य ॥५॥अभंग ७ वा ऐका जनहो निगम । सांगतों जें सुगम ॥१॥कर्म करुनी क्लेश । न मिळे सुखाचा तो लेश ॥२॥संततीचा सहसा । मानूं नका भरंवासा ॥३॥मेळविता धनमाल । तेणें काय निवाल ॥४॥कासी त्रिवेणी गया । बहुता दिवसां येईल दया ॥५॥प्राणायाम वायु योग । पूर्ण जाणावा तो भोग ॥६॥मनांतून संन्यास । करा घरींच वनवास ॥७॥मोक्षत्यागाविरहित । नव्हे तुमचें तें स्वहीत ॥८॥स्वयें होतांचि निःसंग । भेटेल तो श्रीरंग ॥९॥मध्वनाथ संन्यासी । जीवनमुक्त अविनाशी ॥१०॥अभंग ८ वा तुळसीमाळ घालुनि कंठीं । मी काळ कंठीं विठ्ठलें ॥१॥तुझें नाम घेतों मुखीं । नाहीं सुखी मन माझें ॥२॥वैष्णव म्हणवितों तोंडें । कानकोंडे वाटत ॥३॥तुझ्या वागवितों मुद्रा । भीक शूद्रा मागतों ॥४॥मध्वनाथ म्हणे आजी । माझी लाज राखवी ॥५॥अभंग ९ वा पुंडलीकवरदें कृपा केली मोठी । सामाविले पोटीं अपराध ॥१॥पंढरीचा राजा म्हणवी जगजेठी । त्यानें दिली भेटी अनाथासी ॥२॥अनाथाचा नाथ पतितपावन । तें केलें जतन ब्रीद देवें ॥३॥मध्वनाथ म्हणे स्वामी कृपासिंधू । म्हणवी दीनबंधु पांडुरंगा ॥४॥अभंग १० वा समपद विटेवरी । उभा होता भीमातीरीं ॥१॥दया आली त्या विठ्ठला । सेंदुरवाडा भेटला ॥२॥आला गोपाळाच्या संगें । माझे निववीलें आंगें ॥३॥मूर्ती सुंदर राजस । जीस वर्णीं वेदव्यास ॥४॥देव सांवळा सुंदर । कांसे बरवा पीतांबर ॥५॥शंखचक्रांकित कर । ठेवियेले कटिवर ॥६॥कंकण किंकिनी मेखळा । कंठीं पदकांची माळा ॥७॥काळी खांद्यावर घोंगडी । चिमणे गोपाळ संवगडी ॥८॥कर्णीं कुंडलांची दाटी । माथा मोरपिसा वेंठी ॥९॥केशर मळवट भाळीं । कृपादृष्टीनें न्याहाळी ॥१०॥मध्वनाथासी केले टोणे । त्यातें उतरा लिंबलोणे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP