मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे २१ ते ३० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे २१ ते ३० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे २१ ते ३० Translation - भाषांतर पद २१ वें मोठें अनिवार तुझें लहान श्रीधर पोर ॥ध्रु०॥येक दिनीं माझ्या सदना आलें नाहीं कोणा भ्याले ॥ माझें संचित गोरस प्यालें ऐसें हें शिरजोर ॥१॥प्रातःस्नाना यमुनातीरा गेल्या सगुणानारी ॥ कळंबावरि वेंघुन त्यांचे लपविले परकोर ॥२॥मध्वमुनीश्वरहृदयविहारी गोपीमानसवचोर ॥ लाविल हें वो बोल कुळाला नंदाचें घर थोर ॥३॥पद २२ वें नाहीं अनिवार माझें तान्हें लहान बाळ ॥ध्रु०॥निजघरीं याला काय उणें मग बाहेर करितो चोरी ॥ सगुण गुणाचा लटिका यावरि घालितां हा आळ ॥१॥तलग्या तरण्या मिळुनी याचा करितां तंटपसारा ॥ गार्हाण्याची वेळ नव्हे हे जाला प्रातःकाळ ॥२॥मध्वमुनीश्वरहृदयविहारी अभिनव करणी याची ॥ शाहाण्या गरती समजुनि याला उगबिती मायाजाळ ॥३॥पद २३ वें आहा वो आहा वो बाई आहा वो । अवघ्यांमध्ये शाहाणी तुम्ही आहा वो ॥ध्रु०॥घडीचा नाहीं भरंवसा देवासाठीं सर्व साहा । यासी देती साक्ष चारी आणि साहा वो ॥१॥इंद्रियें जिंतुनि दाहा सत्रावीचें क्षीर दुहा । तेनें निववा अंतरींचा दाहा वो ॥२॥जो कां त्रैलोक्याचा बाहा तोचि येक अवलंबा हा । मध्वनाथहृदयभुवनीं बाहा वो ॥३॥पद २४ वें बोलूं नकक गे बायांनों उगल्या ॥ध्रु०॥वर्मा ज्या चुकल्या । त्या सर्वस्वा मुकल्या ममता धरूनी देहीं । उगल्याच फुगल्या ॥१॥वरपंगें सिकल्या त्या हरिरंगीं ठकल्या । मध्वनाथा नेणुनि संसारीं जगल्या ॥२॥पद २५ वें बोलूं नको जाय जाय मैंदा ऐसा काय विनोद रे ॥ध्रु०॥अचपळ अगुणी नाम तुझें तें लटिकें कोण म्हणे रे ॥ खटपट करिती त्यांला ठकविसी करिसी त्यांसि विरोध रे ॥१॥सासु अविद्या माझी मजवरी करील आपला नास ॥ अभिनव तुझ्या ऐशा गोष्टीनें जळती कामक्रोध रे ॥२॥परवनितांच्या हृदया झोंबसी अधरामृतरस घेसी ॥ मुरलीनादें मोहित करिसी नकळे तुझा शोध रे ॥३॥कुळवंताची क्कार मी भोळी नेणें कुड्या कपटा ॥ सद्गुरुकृपें मध्वनाथीं विपरीत अवघा बोध रे ॥४॥पद २६ वें जा जा जा जा वो जा जा करितां कां गाजावाजा । सोंडुनी दिल्ह्या तुम्हीं लाजा तारुण्यें माजा ॥ उदास गोळियांच्या हाजा गोकुळीं साजा । कांहीं केल्या हितगुज नुमजा अंतरीं समजा टाकुनि गमजा ॥१॥हरिला आणुनि हरि म्हणतां हा अनिवारी ॥ तलग्या तरुण्या तुम्हीं नारी कलयुगींच्या क्कारी ॥ कैशा नांदाल घराचारीं प्रपंचभारीं ॥ नेणा बाळक हें अवतारी सकळां तारी बहु उपकारी ॥२॥तुम्हीं बाळा आणिखां भाळा नसत्या घालितां आळा । गोष्टीस कांहीं नाहीं ताळा करितां चाळा ॥ देवें घातलें मायाजाळा नेणा या बाळा । जीवें भावें वोवाळा या मध्वमुनीश्वर दयाळा ॥३॥पद २७ वें अमलकमलदलराजसनेत्रारे ॥ध्रु०॥कर्णीं कुंदलांची दाटी । माथां मोरपिसा वेठी । शोभे चंदनाची उटी । शामळ गात्रारे ॥१॥मधुमुर झोडिसी । व्रजवदू वोढिसी । खासी दधि फोडिसी । गोरसपात्रा ॥२॥चोर जरि शिरोमणि । ऐशा तुजलागुनी । ध्यातो मध्वनाथमुनी सज्जनमित्रारे ॥३॥पद २८ वें ( गौळणी ) जात होतें मथुरेच्या हाटा । तेथें आला यशोदेचा गाटा ॥ याचा यास नाहीं दिल्हा वाटा । चोरींपोरीं लुटिला दहिमाठा ॥१॥कान्हो मोठा कपटी कानडा गे । गोकुळींचा गोवळ ठकडा गे ॥ घरीं नसतां लावितो झगडा गे । मध्यें होतो माझा रगडा गे ॥२॥अहंकार माझा धरधणी । पापरूपी सदा अवगुणी ॥ त्याची गोष्टी सांगो काय उणी । न मानी देवाधर्मालागुनी ॥३॥गांव जळे हनुमंत निराळा गे । आपण कौतुक पाहे वेगळा गे ॥ मध्वनाथस्वामी चांगला गे । कैसा मजभोंवता लागला गे ॥४॥पद २९ वें घरधणी गर्वनिधीताठा । येकायेकीं गेला धट्टाकट्टा ॥ करुनि संसाराच्या बारा वाटा । मग आला विश्रांतीच्या घाटा ॥१॥सर परता गोवळा अळगटा । घननीळा कान्हो हिरवटा ॥ आम्ही गोपी आहों बळकटा । न गणूं चोरा काळ्या कुणबटा ॥२॥ज्याचा हात अखंड खरकटा । तया कामा ठोकिलें मर्कटा ॥ तुझ्या नामें तोडी मणगटा । क्रोध देश दिल्हा देसवटा ॥३॥घरधनी कुळवंता क्कारी बरवंटा । त्यांच्या वोढुनिया परवंटा ॥ मध्वनाथा स्वामी निगरंगटा । काय झोंबलासी माझ्या कंठा ॥४॥अभंग ३० वा गोकुळांत कुडें सर्व चालें । अवघे बाजेगिरिचे ते चाळे ॥ कोण शाहणी नावरूपा भाळे । जिचे पूर्ण मनोरथ जाले ॥१॥कान्हो लागो नको माझें तोंडीं । मी तर नाहीं तुझी कानकोंडी ॥ असत्याची खाईल जे रोंडी । तिजवर पडो आकाशाची धोंडी ॥२॥तुझी प्रीतिपात्र चंद्रावळी । वृंदावनें भोगी वनमाळी ॥ राधिकेचा लळा आधीं पाळी । तिच्या घरा जाय संध्याकाळीं ॥३॥खेळ खेळुन न पडे जो डाईं । तोच उमजला आपल्या ठायीं ॥ मध्वनाथा नको करूं घाई । निरंजनीं वनीं चारी गाई ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP