मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| अभंग ५ वा मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ स्फुट प्रकरणें - अभंग ५ वा मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी धनेश्वरचरित्र Translation - भाषांतर इंद्रायणीतीरीं जैसा सिद्धेश्वर । तैसा धनेश्वर देव होता ॥१॥तयाचें देऊळ जुनाट पुरातन । तेथें धन होतें कुबेराचें ॥२॥कुबेरानें केली होती ते स्थापना । नांव त्याचें जाणा धनेश्वर ॥३॥धनावरी होती शाळुंका अढळ । तीहून सबळ पिंडी तीची ॥४॥देवालयापुढें होता नंदिकेश्वर । त्यावरी कुबेरें लिहिलें होतें ॥५॥महाशिवरात्री येईल माघमासीं । सोमवारदिवशीं सिंहस्थांत ॥६॥विप्रकुमाराचा बळी दीजे । त्याचें रक्तें कीजे अभिषेक ॥७॥पांचा वरुषाचें बाळक असावें । आणिक नसावें चवथें तें ॥८॥बापानें धरावें आईनें आवरावें । राजानें करावें छेदन त्याचें ॥९॥मध्यरात्रीं देवा देईल जो बळी । त्यासी चंद्रमौळी देईल धन ॥१०॥ऐसें बहुतांसी पूर्वीं होतें श्रुत । तरी हें अकृत न करी कोणी ॥११॥चाकणेचा राजा होता त्या प्रयत्नीं । त्यानें द्विजपत्नी देखियेली ॥१२॥देवालया आली होती अकस्मात । होता व्यतिपात पर्वकाळ ॥१३॥तिचे कडेवरी होतें एक बाळ । सगुण विशाळ डोळे त्याचे ॥१४॥त्याच दिवशीं राजा तिचे घरीं गेला । बुद्धिभेद केला दंपत्याचा ॥१५॥रायें दाखविला बहुत धनलोभ । न मानावा क्षोभ बोलण्याचा ॥१६॥ऐसें म्हणोनिया राजा गृहीं गेला । आला वर्षाभरा पर्वकाळ ॥१७॥बारा वरुषांचा पडला दुष्काळ । विकावया बाळ सिद्ध झाली ॥१८॥त्यासी होतीं बाळें तिघेचवघे । त्यांत मुंजीजोगें पांचवें हें ॥१९॥धनलोभियाची कथा ऐका कानीं । मध्वनाथ वाणी चरित्र हें ॥२०॥महाशिवरात्री आली सोमवारीं । रायें त्यांचे घरीं श्रुत केलें ॥२१॥मायबापें केला दृढ विचार । झाले ते उदार बाळकावरी ॥२२॥बाळें मोहन धरिलें मायेनें न्हाणलें । देवळा आणिलें धाल्यापोटीं ॥२३॥मायबाप राजा आले देऊळासी । कडेवरी बाळासी घेऊनिया ॥२४॥रायें पूजियेला देव मध्यरात्रीं । तांदूळ बेलपत्री वाहियेली ॥२५॥बाळ देवाप्रति दिधला मायबापें । बाप म्हण एकापी मान याची ॥२६॥रायें उपसिली आपुली तलवार । पुसियेली धार रुमालानें ॥२७॥तये वेळीं बाळ काकुलती रडे । पाहे मुखाकडे माउलीच्या ॥२८॥म्हणे माय मज घेईकडेवरी । चल घडीभरी बाहेर जाऊं ॥२९॥काढी नाकदुर्हाई पीईन मी आमा । लिहीन ॐ नामा पाटीवरी ॥३०॥सुरी घेऊनिया नको कापूं मान । देई जीवदान मजलागीं ॥३१॥कंठ हा सोकला लागलीसे तहान । लोटी भरून लहान पाणी पाजी ॥३२॥पशुपक्षी म्हणती बापमाय वेडीं झालीं । रडती वृक्षवल्ली पाषाण ते ॥३३॥कांहीं केल्या त्यांचें द्रवेना मन । बाळापरीस धन प्रिय झालें ॥३४॥बाळ म्हणे देवा आतां करूं काय । कैशी माझी माय उबगली ॥३५॥माय मारी तेव्हां बाप लळा पाळी । तो मारिता सांभाळी माय तेव्हां ॥३६॥मायबापाविण आहे जें लेंकरू । त्याचा अंगिकारू राजा करी ॥३७॥मायबापें माझे धरियेले पाय । राजा सिद्ध आहे वधावया ॥३८॥खङ्ग घेउनिया झाला तो सावध । करावया वध अनाथाचा ॥३९॥अनाथाचा नाथ पुराणीं वर्णिला । तो माझ्या तान्हेला रक्तसाठीं ॥४०॥देह देवाचे कारणींही पडो । मनोभावें घडो सेवा त्याची ॥४१॥हरहर महादेव वदतसे वदनीं । आत्मा नैवेद्य अर्पूनि सिद्ध झाला ॥४२॥मध्वनाथ म्हणे ऐकुनिया कींव । घामेलासे शिव डवडविन्नला ॥४३॥रायें शस्त्र उचलोनी लावी कंठनाळीं । तेव्हां चंद्रमौळी गजबजिन्नला ॥४४॥म्हणे माझ्या माथां आलें अपेश । धरिला आवेश महादेवें ॥४५॥त्रिलोचनें केलें प्रगट भीमरूप । छेदूनिया भूप पाडियेला ॥४६॥मायबापालागीं आलीसे मूर्छना । केली ते गर्जना पंचाननें ॥४७॥त्यांचें कुडें त्यास दाविलें पुढें । दिले चंद्रचूडें बळी त्यांचे ॥४८॥देवें बैसविला बाळ मांडीवरी । अभयहस्त शिरीं ठेवियेला ॥४९॥देव म्हणे बाळा झालों मी प्रसन्न । माग वरदान मज कांहीं ॥५०॥बाळ म्हणे देवा तुझें नाम काय । कोठें मायबाप महाराजा ॥५१॥देव म्हणे तुझी मायबापें मेलीं । राजासहित गेलीं नरकामध्यें ॥५२॥बाळानें ऐकिलें निराश वचन । दाटले लोचन अश्रुपातीं ॥५३॥बाळानें घेतली गडबडा लोळण । म्हणे माझी कोण करी मुंज ॥५४॥देव म्हणे आतां रडूं किंवा हसूं । तर्ही आलें असूं लोचनासी ॥५५॥देव म्हणे बाळा झालों मी प्रसन्न । माग वरदान कांहीं मज ॥५६॥बाळ म्हणे माझी उठवी मायबाप । कृपादृष्टि पाहे महाराजा ॥५७॥देव म्हणे शिंपी उदक न्हाणीचें । तेंचि निर्वाणीचें अमृताहे ॥५८॥बाळानें घेतलें जीवन चुळभरी । तिघाजणांवरी शिंपीयलें ॥५९॥सजीव ते झालीं उठलीं तात्काळ । हरिखें नाचे बाळ टाळ्या पिटी ॥६०॥मायबापें महाराजा देखोनि दिठी । चुंबुनि घाली मिठी त्याच्या गळा ॥६१॥मायेचिया थाना फुटला तो पान्हा । आडवा घेउनि तान्हा पाजियेला ॥६२॥माय म्हणे माझे घेऊं नये नांव । विणुन जाळें लावलें लेंकरासि ॥६३॥मध्वनाथ म्हणे देव दयानिधि । जाली महासिद्धी बाळकासी ॥६४॥तया तिघाजणां जाला अनुताप । म्हणती महापाप घडलें आम्हां ॥६५॥धनलोभासाठीं केली बालहत्या । अमुच्या असत्या जोडा नाहीं ॥६६॥जीवंतचि आम्हां होतील नरक । मारिलें बाळक देवालयीं ॥६७॥अहा देवा केवढें घडलें अनुचित । कैसें हें संचित वोडवलें ॥६८॥आम्हा तिघाजणा होती रौरव । नरकीं गौरव अंधंतमीं ॥६९॥त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टि पाहे । चुकवी अपाये गर्भवास ॥७०॥पतितपावना पार्वतीरमणा । तुझीया चरणा शरण आलों ॥७१॥वज्रलेपा पापा नाहीं प्रायश्चित्त । ऐसें माझें चित्त गाही देतें ॥७२॥ऐसी तिघाजणीं भाकली करुणा । मग दीनोद्धरणा दया आली ॥७३॥देव म्हणे मला होईळ संतोष । करणें प्रदोषा सोमवारीं ॥७४॥श्रावणमासीं घाला लिंगाच्या लाखोल्या । आणिखाच्या बोलीं लागूं नका ॥७५॥शिवपंचाक्षरी मंत्रासी स्मरणें । महोत्सवा करणें शिवरात्रीच्या ॥७६॥भस्म उधळणें रुद्राक्षधारण । मुक्तीस कारण शिवभक्ति ॥७७॥शिवभक्तियोगें उद्धारावें वंशा । न करावी हिंसा कोणाची हे ॥७८॥हरिहरामध्यें मानूं नये भेद । देव ब्राह्मण वेद गौरवावे ॥७९॥येणेंकरुनि तुमचा होईल उद्धार । ऐसें जगदाधार बोलियेला ॥८०॥ तिघाजणीं तिहीं केला नमस्कार । झाला विश्वेश्वर प्रसन्न तो ॥८१॥विश्वंभरें दिधलें धन बाळकासी । बाळनृपाळासी निरविलें ॥८२॥शिवरात्रदिवशीं केला उपदेश । मग जगदेश गुप्त झाला ॥८३॥शिवरात्रीदिवशीं परिसल्या कथा । भवभयव्यथा निरसी ते ॥८४॥मध्वनाथ म्हणे ऐकतां चरित्र । होतील पवित्र नरनारी ॥८५॥इहलोकीं पुत्रपौत्र धन भुक्ति । अंतीं होईल मुक्ती सायुज्यता ॥८६॥ऐसी कथा शिवरात्रीची संपूर्ण । केली समर्पण सिद्धेश्वरा ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : May 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP