मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पद ५१ ते ६० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीरामाचीं पदें - पद ५१ ते ६० भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पद ५१ ते ६० Translation - भाषांतर पद ५१ वें बालम बालम बालम मोसो बोलोजी प्यारे बालम ॥ध्रु०॥ हु भई कमरी चरणकी दासी । धुंडत फिरती अलम ॥१॥निसीदिन तेरे दरशनको प्यासी । जबी रहे सजनको जालम ॥२॥मध्वमुनेश्वर तिहारे मिलनकु । खेलत पवनकी तालीम ॥३॥पद ५२ वेंदेवा गर्वाचा रावणाचा पर्वत रावण रे ॥ध्रु०॥पंचवटीमधें गोदातटीं जेणें । हरिलें जानकीकारणें रे ॥१॥कुंभकर्ण ज्याचा भाऊ दळाधिप । जैसा मदोन्मत्त रावण ए ॥२॥मंत्रशास्त्रें अति प्रविण म्हणविती । जाणती जारण मारण रे ॥३॥आह्मी रणांगणीं मारूं दोघाजणां । करूं भूताहातीं पारण रे ॥४॥रामा तुझें बळ पाहावया जाणें । धाडियले शुकसारण रे ॥५॥मध्वनाथा तुम्ही अवतार धरुनी । सर्वहि जग तारण रे ॥६॥पद ५३ वें रावण म्हणे जानके । आतां अंतरला राम वो ॥ध्रु०॥समुद्राचे परतीरीं राक्षसांनीं । त्याचें पुरतें केलें काम वो ॥१॥लक्ष्मणाची पुरती केली पाठी दुमती । त्याचें काढियलें चाम वो ॥२॥वानर येथें आलें होतें एक वेडें । त्याचें तोंड झालें शाम वो ॥३॥लंकेमध्यें अलौकिक राज्य भोगीं । तुझें सुवर्णाचें धाम वो ॥४॥मध्वनाथ स्वामीमहाराज । त्याचें येथें घेऊं नको नाम वो ॥५॥पद ५४ वें लंकापति रावण धरी आतां बरवा धीर ॥ध्रु०॥काळाभि हा रुद्ररूपी रामराजा । तुझा भाजिल हिरवा हीर ॥१॥पिसाळलें सुनें आलें यज्ञशाळे । त्याला प्राप्त कैची खीर ॥२॥सेतुबंधीं रामेश्वरीं कीर्ति केली । जाला महोदधि थीर ॥३॥वानरांचें बळवंत दळ भारी । यांत दोघे वीर भारी ॥४॥राजपुत्र तपोनिधि ब्रह्मचारी । योगी पांघरले चीर ॥५॥कुंभकर्ण इंद्रजित मारितील । तेव्हां नयना येईल चीर ॥६॥पद ५५ वें वणवण कां रे करितोसि बापा ॥ध्रु०॥जो करकमळीं धरी शरचापा । तो भज रघुवीर सोलीव चांपा ॥१॥या विषायांचा वोंगळ वाफा । त्यांत किती तूं पेरिसि पापा ॥२॥न करी कांहीं व्रततपजापा । येक पुरे तो गुरुनामाछापा ॥३॥मध्वनाथा धरी अनुतापा । भवजळीं तारी नरदेहतापा ॥४॥पद ५६ वें श्रीरामाचें स्वरूप आधीं चिंती । तेणेंकरुनी कामादिक वैरी जिंती ॥ हेंचि पुण्य कामासी येईल अंतीं । हाच पूर्वीं उपाय केला संतीं ॥१॥ऐकें ऐकें सावध हरिकथा । वय जाऊं देऊं नको वृथा ॥ येणें तुझी हरेल भववेथा । क्षणभरी आठवी रघुनाथा ॥२॥गर्भवासीं सोशिले बहु क्लेश । विषयांमध्यें कैंचा तो सौख्यालेश ॥ मूढा करितों उपदेश । मध्वनाथां न सोडी जगदीश ॥३॥पद ५७ वें श्रीरामाचें स्वरूप आधीं चिंती । तेनेंकरुनी कामादिक वैरी जिंती ॥ हेंचि पुण्य कामासी येईल अंतीं । हाच पूर्वीं उपाय केला संतीं ॥१॥ऐकें ऐकें सावध हरिकथा । वय जाऊं देऊं नको वृथा ॥ येणें तुझी हरेल भववेथा । क्षणभरी आठवी रघुनाथा ॥२॥गर्भवासीं सोशिलें बहु क्लेश । विषयांमध्यें कैंचा तो सौख्यलेश ॥ मूढा तुज करितों उपदेश । मध्वनाथा न सोडी जगदीश ॥३॥पद ५८ वें करो मन राघोजीसे प्रीत ॥ध्रु०॥तात मात सुत बंधु वनिता । इनकी उलटी रीत ॥१॥जो कोई आपनो आपनो गरजी । कोन कोईको मीत ॥२॥कहत माधोनाथ गुसाई । करले आपनो हीत ॥३॥पद ५९ वें रामाचें करूं ध्यान । मनामध्यें रामाचें करूं ध्यान ॥ध्रु०॥मानसपूजा ऐसी आहे तीचें हेंच विधान ॥ रम्य अयोध्यानगरीमध्यें पुष्पक दिव्य विमान ॥१॥नंदनवन उपमेस न राजे कामाचा अपमान ॥ मंद सुगंध सुशीतळ निववी शरयूचा पवमान ॥२॥कर्पूराचे दीपक जळती वरता श्वेत वितान ॥ सिंहासनी रघुवीर विराजे दाशरथे भगवान् ॥३॥चंदनचर्चित नील कलेवर पीतांबर परिधान ॥ मुगुट मनोहर कवच धनुर्धर तरकसी कांचनबाण ॥४॥श्रीवनमाळेवरते मधुकर कवच धनुर्धर ॥ कविगुरुंमध्यें मंगळ तैसे कुंडलमंडिते कान ॥५॥प्रसन्न देखुनि राममुखाला हिमकर जाला म्लान ॥ रघुनाथाची शोभा विलसे दिनकरकोतिसमान ॥६॥भरत सुलक्षण सानुज लक्षण जानकिचें सन्निधान ॥ छत्रें चामरें मेघडमरें मोर्छल सूर्यापान ॥७॥सुग्रीवादिक सेवक उभे सन्मुख तो हनुमान ॥ ज्याचें दर्शन होतां नाहें मुक्तिस तें अनुमान ॥८॥धन्य वसिष्ठ पुरोहित ज्याचा तो यजमान । कांचनपात्रीं वाढि अरुंधती सुंदर तें परमान्न ॥९॥सुरवर किन्नर आळविती स्वर दाविति तालज्ञान ॥ तुम्ग मृदंगध्वनि मृदुमंजुळ रंजवि पंचम मान ॥१०॥राजांगणीं करी कीर्तन नारद वाल्मिक दे अवधान ॥ शुकसनकादिक सादर करिती रामकथारसपान ॥११॥रघुपति विष्णुदासालागीं देत असे वरदान ॥ रामउपासक राजद्वारीं पावति ते सन्मान ॥१२॥मंगल आरति करिती त्याचा देवाला अभिमान ॥ घणघण घंटा त्या बरवंटा गाजत भेरी निषाण ॥१३॥जयकारें गर्जती वानर नाचत जांबवान ॥ अबीरगुलालें पालटवीला गगनाचा तो वान ॥१४॥वाजंत्र्यासम दुंदुभि वाजती मांगल्याचें निदान ॥ नाम स्मरतां कळिकाळानें खालीं केली मान ॥१५॥विश्वेश्वर निजहृदयीं जपतो रामाचें अभिधान ॥ अंतकाळीं उपदेशी तो तारक मंत्र प्रधान ॥१६॥रामार्चनविधिपद्धति पाहुनि केलें म्यां व्याख्यान ॥ मध्वमुनीश्वर म्हणतो माझा सद्गुरु सौख्यनिधान ॥१७॥पद ६० वें कोदंडपाणि लवकरि येई ॥ध्रु०॥तळमळ करितो जीव तुझ्या वियोगें । दर्शन देउन मजला सद्गति देई ॥१॥अनुदिनें हृदयीं रामा नामासि जपतो । मध्वनाथा आपुले जाणुनी नेई ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP