मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते ६ मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ नृसिंहाची पदें - पदे १ ते ६ मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी नृसिंहाची पदें - पदे १ ते ६ Translation - भाषांतर पद १ लें जय जय जय जय नरसिंहा । संशय माझा निरसी हा ॥ करुणाम्रुतरस वोरसी हा । मग्न करी जीव समरसीं हा ॥१॥सखया लक्ष्मीरमणा रे । किती तर्ही करूं मी भ्रमणा रे ॥ करितों नामस्मरणारे । चुकवी जन्ममरणा रे ॥२॥हिरण्यकशिपु उदरा तूं । दारिसी पूर्ण उदारा तूं ॥ मध्वमुनीश्वरवरदा तूं । राखि आपुल्या बिरुदा तूं ॥३॥पद २ रें श्रीसामराजा तूं स्वामी माझा ॥ध्रु०॥श्रीनीलकंठा जय व्योमकेशा । स्तंभीं प्रगट होसी नरसिंहवेशा ॥१॥सत्यज्ञानस्वरूपा लक्ष्मीनिवासा । क्षीरसागरामध्यें स्थळचिद्विलासा ॥२॥प्रल्हादवरदा भवबंधनाशा । मध्वनाथ विनवी करी पूर्ण आशा ॥३॥पद ३ रें वेगीं शामराज दीनबंधु । पावला कैवल्यसिंधु ॥ध्रु०॥कडकड स्तंभीं प्रगट होतां । त्रैलोक्यीं आक्रंद ॥१॥हिरण्यकश्यप वधुनी त्याचा । छेदिला भवबंध ॥२॥प्रसन्न होउनी प्रल्हादाला । दिधला परमानंद ॥३॥मध्वमुनीश्वर महिमा त्याचा । गातोहे स्वच्छंद ॥४॥पद ४ थें पावलारे महाराज सिंहासन । उग्ररूप देखुनी दचकला महेशान ॥ध्रु०॥कडकडाटें प्रगटला । दुष्ट दैत्य निवटिला । भक्तवत्सल भेटला । मोहछाव वाटला ॥१॥नखीं चंद्रकोटी तेज । पीतपटीं चमके वीज । चक्रपाणी चतुर्भुज । रक्षी प्रल्हादाचें गुज ॥२॥देव करिती पुष्पवृष्टि । ब्रह्मानंदें कोंदे सृष्टि । नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ॥३॥ज्याचें नांव लक्ष्मीकांत । निजरूप धरी शांत । मध्वनाथा विश्रांत । दिल्ही निरसली भ्रांत ॥४॥पद ५ वें जय जय नरहरि राया रे । आरत तुझिया पायां रे ॥ध्रु०॥नांदसी श्रीमणिपर्वतीं । जेथें मुनिजन मिरविती ॥ पद्मतीर्थाचे कांठीं । प्रगटसी श्रीरुचिरासाठीं ॥१॥मध्यगोदेच्या बेटीं । येती सनकादिक भेटीं ॥ काश्यपगोत्रींची सेवा । सदैव घेसी तूं देवा ॥२॥प्रसन्न विश्वेश्वर जाला । घेउनि गदाधरा आला ॥ श्रीशिवानंदासंगमीं । पूजुन झालों असंग मी ॥३॥सिद्धेश्वर नागेशा । अवघा आपण विश्वेशा ॥ विश्वेशावरि फणिवर । देखिला म्यां धणीवर ॥४॥एकादशीच्या दिवशीं । दर्शन जालें सर्वांसी ॥ दोन प्रहरपर्यंत । बसला होता अनंत ॥५॥कीर्तन ऐकुनिया गेला पूर्ण अनुग्रह केला ॥ छत्र देवावरि धरितों । प्रसाद देऊनी उद्धरितों ॥६॥मध्वनार्थीं साम्राज्य । करील विश्वेश्वर आजि ॥७॥पद ६ वें नरहरि थांब पाव रे । राजीवनयना राघवा रामा ॥ध्रु०॥तुजविण मला आतां कोणचि तारी । तारक हरि तूं आम्हां ॥१॥मी बुडतों भवसागरडोहीं । नेउनि पार आम्हां ॥२॥मध्वमुनीश्वर प्रार्थितसे तुज । आठवुनियां तुझ्या नामा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP