मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ श्रीकृष्णाचीं पदें - पदे १ ते १० मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी श्रीकृष्णाचीं पदें - पदे १ ते १० Translation - भाषांतर पद १ लें आनंद जाला । देवकीउदरा देवचि आला गे ॥१॥हरि खेलीं मायबापें ठाईंच्या ठाईं करपलीं महापापें ॥२॥वर्षती सुर सुमनें । योगीश्वर हर्षती सुरसुमनें ॥३॥नारद तुंबर गे । जयजयकारें नाचति सुंदर गे ॥४॥दुंदुभि वाजविती । मध्वनाथा देव नवाजविती ॥५॥पद २ रेंघेउनि पंजकनयना । दशशतफणिवरशयना ॥ जातो व्रजपती अयना । इतरांचें मज भय ना ॥१॥माया तूं माझी यमुना । तव पदीं वाहिन सुमनां ॥ होउनि स्वानंद भरिता । द्विधा जाली सरिता ॥२॥मध्वमुनीश्वर संगीं । असतां राखे प्रसंगीं ॥ म्हणोनि अंतरंगीं । भाव धरा श्रीरंगीं ॥३॥पद ३ रेंधन्य ते गोकुळ धन्य ते मथुरा । धन्य यशोदादेवी चतुरा ॥ध्रु०॥नंदाघरीं अवतरला कान्हा । द्वारीं वाद्यें वाजती नाना । गर्जती घंटा जगट झणाणा ॥ गंधर्व गाती करिती तनाना ॥१॥गौरवी गोपति दीना दरिद्रा गोवळ सिंपिती दधी हरिद्रा । अभ्यंग करूनी लाउनि मुद्रा । पाहती परमानंदसमुद्रा ॥२॥पूजुनि ब्राह्मण त्या नंदानें । दानें दिधलीं आनंदानें । गौळणी घेती देती मानें । वाटिती साकर फिकलीं पानें ॥३॥साधक सांडुनि देती भुक्ती । परिसती गोपिकांच्या उक्ती । तार्किकांच्या न चलती युक्ती । नाम स्मरतां चार्ही मुक्ती ॥४॥गोकुळगांवीं प्रगटली कमळा । दिनमणितनया वाहे विमळा । कुंजवनीं मधु मन्मथ जमला । मध्वमुनीश्वर ज्या स्थळीं रमला ॥५॥पद ४ थें पाहुं दे वो बाई तुझा कान्हा ॥ध्रु०॥उपजला मज स्नेहो । पायरव यासी न हो । न धरत आला पयपान्हा ॥१॥यासी झणिं लागो दिठी । नामरूपीं पडो मिठी । गुणवंत आहे भला तान्हा ॥२॥सांवळें हें जावळाचें । बाळ बहू नवसाचें । यासि परब्रह्म ऐसें माना ॥३॥आंगीं शोभें आंगलें वो । माथां कुंची चांगलें वो । मध्वनाथ आणी यासी ध्याना ॥४॥पद ५ वें तूं नंदगोपा संसारीं धन्य धन्य रे ॥ध्रु०॥त्रिभुवनीं तूंचि श्लाघ्य । उदित तुझेंचि भाग्य ॥ गेलें दिगंता दुःखदैन्य रे ॥१॥स्मरणें तुझ्या बापा । ठाव नुरेचि पापा ॥ धाकें निमालें दैत्यसैन्य रे ॥२॥यशोदेसी मायबाई । म्हणतो क्षीराब्धिशायी ॥ त्यासी पाजी निज स्तन्य रे ॥३॥मध्वनाथा आळवितें । वोसंगा खेळवितें ॥ काय वर्णूं मी तिचें पुण्य रे ॥४॥पद ६ वें पावन गुणगण हरिचे गाई रे ॥ध्रु०॥हलधर गिरिधर गोकुळीं जाले । बाळक नंदाघरिंचे ॥१॥उद्धरिले हरिनें पशुपक्षी । तरुवर यमुनातीरिंचे ॥२॥मध्वमुनीश्वर म्हणतो मनुजा । वर्णि तूं नाना परिचें ॥३॥पद ७ वें ब्रह्मसनातन ब्रह्मसनातन ब्रह्मसनातन शौरी ॥ध्रु०॥जाईल तो दुरि म्हणोनि यशोदा । पायांसि बांधिते दोरी ॥१॥निर्गुण व्यापक नित्यमुक्त मूर्ति । पाहाते गोरीमोरी ॥२॥स्वयंतृप्त जरि म्हणवितो तर्ही । करितो गोरस चोरी ॥३॥स्वनन्द ईश्वर अवाप्तकाम तो । चाळवी गौळ्यांच्या पोरी ॥४॥नित्य सदोदित नाम रूपातीत । आवडे राधा गोरी ॥५॥मध्वमुनीश्वर दिसतो लहान । कोण जाणे त्याची थोरी ॥६॥पद ८ वें नंदनंदन गोविंदा । दावी तव पदअरविंदा । मानस मधुकर मकरंदा । सेविल सुखकर मुकुंदा ॥१॥मारिसी माउसी विवसीला । अधरीं धरिसी वंसीला । पावन जाणुनि कुळशीला । भावें भुलली तुळशीला ॥२॥कुंजवनीं श्रीगोपाळा । देखुनी कदंब झोपाला । तेथें बांधुनी चौपाळा झुलविती गोपी कृपाळा ॥३॥हरिसी संचित गोरसा । हरि तूं न दिससी चोरसा । गोपीस त्राससी किशोरसा । मध्वमुनीश्वर थोरसा ॥४॥पद ९ वें सोडी तूं सावळ्या मैंदा । जनमनमोहना राजीवनयना नंदा रे ॥ध्रु०॥अलगटा गोवळा बाल मुकुंदा । नेणें कंदुक मी गोविंदा रे ॥१॥निर्दय माझ्या सासानणदा । देरभावे करिती निंदा रे ॥२॥बाहेरख्याली हा वोंगळ धंदा । मी त्या जाउनि सांगतें नंदा रे ॥३॥कांरे दाटुनी भोगिली वृंदा । कोण दंडील पैं तुज लौंदा रे ॥४॥मध्वमुनीश्वर सच्चिदानंदा । तुझ्या वंदितें चरणारविंदा रे ॥५॥पद १० वें हाले किसना सावल्या । ताक पीला बावल्या ॥ वेले वेले चाल कलिसी का ले वाकुलपावल्या ॥१॥आम्ही काली बलवंता । काले वोल्हिसी पलवंता ॥ देखल सासू कपाल फोलिल हातीं घेउनि बलवंता ॥२॥आंत बाहेल हिलवा तूं । दिससी बीदमिलवा तूं ॥ गोल्या भुलक्या पोली भुलविसी आहेस भोंदू बलवा तूं ॥३॥बोले खोबलें खालका । म्हणसी आम्हां फाल खा ॥ मध्वमुनीश्वर गलजू होसी बिजवल नवल्यासारखा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP