मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
म्हणे रुक्मिणी सुदेव ब...

रामजोशी - म्हणे रुक्मिणी सुदेव ब...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


म्हणे रुक्मिणी सुदेव बाई पाठविला म्यां खरा ।

परि कधिं येईल वृध्द मित्र हा मनामधें खराखरा ॥ध्रु०॥

तो दिन गेला रात पातली काय सांगुं मी तुला ।

चैन पडेना असुग माझा कृष्णपदीं गुंतला ।

तातडि बहु दादाचि त्याणें हळदी लाविली मला ।

देऊं केलें मज त्या मेल्या चेदिपतीच्या मुला ।

म्यां त्या रात्रीं केला जीवितसंकल्पचि आपुला ।

दु:ख सांगतां नये मनांतील बापाला आईला ।

रात जातसें तों तों जीव हा धडपड करु लागला ।

अश्रु वाहतीं नयनीं सखये गळा भरुनियां आला ।

त्या मेल्याने लग्न समारंभाचा मंडप दिला ।

कुंडन नगरीं उत्सव मन्मनिं दु:खाचल वाटला ।

॥चाल॥

गडे काय सांगूं या कर्माची कहाणी ।

अवकाश थोडका दादा मज नाहाणी ।

परि समयीं झाली सुदैव गति लाहणी ।

मी पाय पहाया पहिल्यापुन शाहाणी ।

उघडून दृष्टी जों करुं गेले पाहाणी ।

अकस्मात तो दृष्टीस पडला जसा हरवला हिरा ।

विप्रमुखश्री कळवी मजला यदुवीर आले घरां ।

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP