TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
भजभज भवजलधिमाजि मनुजा ...

रामजोशी - भजभज भवजलधिमाजि मनुजा ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

भजभज भवजलधिमाजि मनुजा शिवाला ॥ध्रु०॥

धरशिल दृढ चरणकमल ।

घडिभरि तरी करुनी विमल ।

तरीच सकल पाप शमल, त्यज रे भवाला ॥१॥

सांडुनिया विषयवमन ।

झडकरी करिं षडरिपु दमन ।

पूजि मन हे करुनि सुमन । गिरिजाधवाला ॥२॥

सावध हो करिशी काय ।

शंकर गुरु बाप माय ।

चिंतुनि कविराय पाय, ह्रदयीं निवाला ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-20T04:32:35.8970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तत्पदार्थ

  • पु. परमात्मा ; सर्वश्रेष्ठ ; सर्वज्ञ , सर्वशक्तिमान असा वाच्य ईश्वर व त्याचे लक्ष्य ब्रह्म . जैसे त्वंपद हे आघवे । तत्पदार्थी सामावे । - ज्ञा ११ . ६४८ . तत्पदार्थ तो परमात्मा । [ सं . तत = तो + पदार्थ ] 
  • m  A term for God. 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.