मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
रंग सांवळा सांवळा गडे ...

रामजोशी - रंग सांवळा सांवळा गडे ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रंग सांवळा सांवळा गडे अंगी । फ़िरस्ता किती हो बेढंगी ॥ध्रु०॥

वेणूच्या रवें,रवें ह्रद्य फ़ोडी । वदाव्या किति याच्या खोडी ।

कोवळ्या मुली मुली पाहून ओढी । गोवळ्यास जळो ही गोडी ।

हार कंठींचा झटून तोडी । मुलीच्या वर करतो कुरघोडी ।

आज होरीच्या शिरे रंगीं । अशाच्या बसुं नये असलंगी ।

रंग सावळा ॥१॥

नंद चांगला भला गाई । तशाला सुत असा काई ।

धुंद मातला कठिण बाई । खराबा किती याच्या पाई ।

फ़ंद पहातो करुन घाई । वळाव्या याणें गोकुळीं गाई ॥

नित्य भोंवरा जसा जंगी । रांड जातिच्या फ़िरे संगी ।

रंग सावळा ॥२॥

यादवामध्यें असा नव्हता । कुठून जन्मला आम्हाभवता ।

आमुच्या मुळिं बसला पुरता । कुळाला मेला बुडविता ।

नष्ट पाहिला न या परता । भला तो अबरुला भीता ।

वाट मी मला आलिंगी । कळा कविरायी श्रीरंगी ॥

रंग सावळा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP