TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
घडीभर या हो माझ्या घर...

रामजोशी - घडीभर या हो माझ्या घर...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

घडीभर या हो माझ्या घरासी राया ॥ध्रु०॥

कां मन आपुलें खवळुनि जातां ।

मी नव्हे कामिनी तसी गुणवंता ।

किती मज गांजावे सख्या गुणवंता ।

बिन अपराधें कां दुखवितां ।

मी वंदिते आणि तुमच्या हो पायां ॥१॥

टाकुनि देतां कां ममतेला ।

दीन जनावरी कां हट केला ।

कोप कशामुळें हा मनीं केला ।

नव तनुसंगमीं मदन भुलेला ।

रंग हा घ्या तुम्हा जोगा भोगा काया ॥२॥

संग न हो परि बोला मृदु वाणी ।

हास्य करुनि पहा मी तुमची राणी ।

माझ्या कधिं न तुटे डोळ्याचें पाणी ।

तव गुण गातें अभिनव गाणीं ।

या कि हो कविराया हा भ्याला वायां ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-17T04:08:51.6130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

म्हशी अशिल्ल्या दंड आसा

  • ( गो.) ज्याच्या म्हशी असतील त्यालाच त्या एखाद्याच्या शेतांत गेल्याबद्दल दंड भरावा लागेल 
  • ज्याच्याजवळ नसतील त्याला कांहीं नाहीं. ‘ कर नाहीं त्याला डर नाहीं ’ अशा अर्धानें ही म्हण वापरतात. 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.