मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कोणाची रमा हे मानवा र...

रामजोशी - कोणाची रमा हे मानवा र...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कोणाची रमा हे मानवा रे भुललाशी

अनुदिनी सांगतां तुज नुमजावें

हरिपद सेवनी वपुं हे भिजावें

कांहीं तरी आज वेड्या हित समजावें

असूनि तूं कैसा भरी भरलासी

कोणाची रमा हे मानवा रे भुललासी ॥१॥

टिळा टोपी गोमुखी देवांचें

गवाळें खालींवर आसनाचे घालुनी चवाळें

धनिकांचे भोंदुनिया काढिलें दिवाळें

कधीं तरी सांग कांहीं उरी उरलासी

कोणाची रमा हे मानवा रे भुललासी ॥२॥

कोणाची हे दासदासी कोणाची ही जाया

कोणाचीं ही पोरे बाळें कोणाची ही काया

प्रपंचाची ओढ सारी वाया हें न अणशी

कोणाची रमा हे मानवा रे भुललासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP