TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
अरे मुखसारसाते दावुनिया...

रामजोशी - अरे मुखसारसाते दावुनिया...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

अरे मुखसारसाते दावुनिया जाय माते ॥ध्रु०॥

घेउं नको वेड रे ।

मनुष्याची जोड रे ।

सोसेना हे काळजातें ।

आपुलिया मार हाते । अरे मुख० ॥१॥

जळो तुझा योग रे ।

आमुचा हा भोग रे ।

उध्दवा तूं सांग त्यातें ।

तोडूं नको आज नातें । अरे मुख० ॥२॥

छळिसी हें काय रे ।

होसी कविराय रे ।

दासीमुळें या जनाते ।

मोडिसी तूं का मनाते ॥ अरे मुख० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-17T04:01:47.7730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उच्चातिउच्च

  • वि. श्रेष्ठांत श्रेष्ठ . तुमच्या मतें तुमचीं अनन्योपभोग्य सुधारणेचीं उच्चातिउच्च जीं तत्त्वें आहेत . - टि . ४ . ७९ . [ सं . उच्च + अतिउच्च ] 
RANDOM WORD

Did you know?

देवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.