TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
हरिच्या पायी गड्या न ...

रामजोशी - हरिच्या पायी गड्या न ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

हरिच्या पायी गड्या न करशिल किती प्रपंचामध्यें लगट ॥

नरपशु तनु मानसिल सगट । फट फट फट ॥ध्रु०॥

कोण कुणाचा प्रपंच वेड्या कां भरलासी उगाच भरीं ।

वंचक सारे दुर करी ॥

ही तुज अंती लोटुन देतिल यांत पडेना तुझी पुरी ।

हरिपद नौका जवळ करी ॥

या घोरानें फुकाच मरशिल कसें कळेना तुला तरी ।

कां घेशिल हा भार शिरीं ॥

संत जनाचे पाय धरी ।

बा हे देखत भूल खरी ।

बुडशिल माया काय बरी ।

अनुदिनीं कथितो तुला स्वहित मी मधुरिपु गुण कीर्तनी झगट ॥

तनुधन खोटें जरी नगट ॥फट०हरि ॥१॥

संत जनाचा संगम धरशिल ॥

तरि चौर्‍यायशी तुझी चुकल ॥

ना तरि सारेंच झुकल ॥

जोवरि मिळविशी पैसा तोवरि कुटुंब सारें तुझें बकल ।

परिणामी हें कसे विकल ॥

वृध्दपणामधिं अशक्त होशिल अंगावरला केंस पिकल ॥

रांड कशी मग जवळ टिकल ॥

कांहीं धरावी जरा अकल ।

कर बुध्दीला बरि शिकल ।

हे जग माया मधी नकल ।

यासाठी बा सावध करितों तुला कळेना आहे प्रगट ॥

वय गेल्यावरि होशिल मुगुट ॥

फट फट फट । हरि० ॥२॥

तूं म्हणशिल ही दौलत माझी सारे मज भोवतें कटक ॥

कां घेशिल ही करुन अटक ॥

स्त्रीच्या लोभें अनंत चकले तुल लागली इची चटक ॥

या मोहांतूनि दुर सटक ॥

दो दिवसांची जाइल भरभर ।

सारे होतील तुला तुटक ।

तोंड करीशी पांढरे फटक ।

हरिभजनाची लाव लटक ।

भगवज्जन यांमाजि घटक ।

त्याला जाऊन जरा हटक ।

तूं तरि डोळे झांक करिशि हे माया मोठी आहे चिकट ॥

कविरायाची तर्‍हा बिकट ॥

फट फट फट ॥ हरिच्या पायी

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-20T04:44:14.9930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

stingy

  • चिक्कू 
RANDOM WORD

Did you know?

relatives kiva veh itar lokanchya divsache bhojan ghyave ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.