TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
तुम्ही सजणा - सुजणा घ्...

रामजोशी - तुम्ही सजणा - सुजणा घ्...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

तुम्ही सजणा - सुजणा घ्या आदराचें पान ।

मज दुबळीचा राखा स्वाभिमान ॥ध्रु०

तुम्ही कां रुसला काय चुकले सेवेला ।

प्रतिपाळ आजवर तुम्ही माझा केला ।

नाहीं कधीं मल शब्द दु:खाचा दिला ।

एकएकी निष्ठुर कांहो झाला ।

म्यां धीर धरला कंठी प्राण उरला ।

ह्या प्रीतीचें दु:ख सांगूं कोणाला ।

तुजसाठी सख्या करीन जिवाचें रान । तुम्ही सजणा ॥१॥

त्त्वां सजणारे कशी लाविलीस माया ।

अर्पण तुम्हासी केली माझी काया ।

तुमची आमची झाली इमानक्रिया ।

अंतर नका मज देऊं स्वामिराया ।

तूप साखर भात वाढीन जेवाया ।

झड घातली राव मी तुमच्या पाया ।

धन संपत हा जीव करीन कुरबाण । तुम्ही सजणा ॥२॥

दो दिवसांत कशी तोडितां प्रीत ।

ही सज्जनपणाची अशी कांहो रीत ।

नरदेहांत या मनुष्यजन्मांत ।

न चिंतावा कोणाचा घातपात ।

धनसंपत देईल श्रीभगवंत ।

संसार घडीचा निर्जिव नाशवंत ।

हा मृत्युलाभ नाहीं कोणा अधीन । तुम्ही सजणा ॥३॥

जैसें यावें तैसें निदान जावें ।

या भ्रांत दशेची मोडावी निज राव ।

मन शांतीचा ऐकून बोधभाव ।

मग प्राणपतीचा गेला राग सर्व ।

बाळा बहिरु म्हणे आतां समजावें ।

हा राग घडीचा याचें काय घ्यावें ।

कविराजाशी नको होऊं बेमान । तुम्ही सजणा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-17T04:10:49.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आखणें

  • ( भि . कातकरी ) म्हणणें ; सांगणें . एहंकी आखताहा ! = असें म्हणतात . - भिल्ली भाषेंतील गोष्टी ३० . [ सं . आ + ख्या ] 
RANDOM WORD

Did you know?

वास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.